तुम्हाला "सहरद गांधी" आठवतात काय?
खान अब्दुल गफार खान म्हणजेच बच्चा खान किंवा बादशहा खान ! महात्मा गांधींचा प्रभाव असलेले आताच्या पाकिस्थान मधील पेशावर येथे जन्मलेले पठाण ! आपल्या जीवनाच्या अंता पर्यंत पाकिस्थान निर्मितीचा विरोध केला, पाकिस्थान मधील स्वतंत्र पख्तुनिस्थान चळवळीला सक्रिय पाठींबा दिला आणि त्या पाई १९८८ पासून स्वतःच्याच घरी नजरबंद झाले आणि २० जानेवरी १९८८ साली निधन झाले.
फाळणी नंतर जरी त्यांचे भारताशी संबंध कमी झाले असले तरी १९७० साली ते भारतात आले देश फिरले, १९८५ साली झालेल्या काँग्रेस शताब्दी कार्यक्रमा करता ते भारतात आले होते आणि या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पण ठरले होते, १९८७ साली भारत सरकारने त्यांना भारताचा सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
या खान साहेबांच्या रक्तातच लढाऊ बाणा होता, त्यांचे आजोबा आणि वडील यांनी जन्मभर इंग्रजांविरोधात लढा दिला होता. खान साहेब मात्र महात्मा गांधी यांच्या अहिंसा तत्वावर भाळले आणि त्यांनी आपल्या लढ्या साठी सत्याग्रह आंदोलनाचा वापर करण्यास सुरुवात केली. १९३४ साली ते आपल्या भावा सोबत गांधीजींच्या वर्धा येथील सेवाग्राम मध्ये काही दिवस राहिले, देशाचा दौरा केला. १९४२ च्या "चले जावं" आंदोलनात पण सक्रिय सहभाग दिला आणि कारागृहात गेले. त्यांची सुटका थेट १९४७ साली झाली.
पण महत्वाचे म्हणजे खान अब्दुल गफार खान हे गांधी भक्त असून, त्यांच्या कथित सर्वधर्मसमभावचे चाहते असून, अहिंसा वादी तत्वावर विश्वास असून, काँग्रेसच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभागी असून सुद्धा ते काँग्रेस मध्ये नव्हते. त्यांनी आपली वेगळी संघटना तयार केली होती "खुदाई खिदमतगार" नावाची ! १९३० साली स्थापन केलेल्या या संघटनेव्दारे ते काँग्रेसला आपले बळ पुरवत. या संघटनेला "सुर्ख पोष" म्हणजेच "लाल कुर्ती" वाले संघटन म्हणून ओळखल्या जायचे.
पाकिस्थान मध्ये हे संघटन आजही खुदाई खिदमतगार फॉऊडेशन पाकिस्थान नावाने काम करत आहे. पण मूळ खुदाई खिदमतदार संघटनेचे अस्तित्व पाकिस्थान मध्ये १९७२ लयाला गेले आहे. तसेही आपल्या फाळणी विरोधी भूमिकेमुळे तसेच स्वतंत्र पख्तुनवा करता दिलेल्या समर्थनामुळे ही संघटना पाकीस्थानी राज्यकर्ते आणि जनतेच्या डोळ्यात खुपत होतीच.
मग आज पुन्हा या संघटनेचे नाव समोर आले. जवळपास ७३ वर्षांनी इतिहासाच्या पुस्तकातून बाहेर निघत या संघटनेने आपले अस्तित्व दाखवले आहे, तेही अत्यंत विवादित पद्धतीने !
मथुरा येथील नंदाबाबा मंदिरात फैजल खान आणि चांद मुहम्मद या दोघांनी २९ ऑक्टोम्बरला नमाज पठण केले आणि त्याचे छायाचित्र आणि चलचित्र समाज माध्यमांवर टाकून खळबळ उडवून दिली. या घटनेमधील दोघेही आरोपी हे स्वतः याच "खुदाई खिदमतगार" संघटनेचे सदस्य म्हणून समोर आणत आहेत. यांच्या म्हणण्यानुसार भारतातील सतत बिघडत जाणारा सर्वधर्मसमभाव बघता देशाला महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानाने प्रेरित खान अब्दुल गफार खान यांच्या विचारांची अत्यंत आवश्यकता आहे. त्या मुळे २०११ साली दिल्ली मध्ये या खुदाई खिदमतगार या संघटनेची पुनर्स्थापना याच फैजल खान याने केली. भारतभरात सध्या ७० सदस्य असल्याचा त्यांचा दावा आहे. फैजल खान शरयू आरती करता पण चर्चेत आले होते. सोबत मध्यंतरी आपल्या कार्यक्रमात इस्लामी घोषणा देत विवादात सापडलेले मुरारी बापू यांचे पण नाव या फैजल खान सोबत जोडल्या गेले आहे. विशेष म्हणजे या फैजल खान यांनी पाकिस्थानला आपल्या सद्भावना यात्रेनिमित्त अनेकदा भेटी दिल्या आहेत.
आता तुम्ही स्वतः विचार करा की देशात इतकी वर्षे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे आतंकवादी हल्ले झाले, काश्मीर मधून हिंदू विस्थापित झाले तेव्हा कोणालाही या सर्वधर्मसमभाव वाल्या सहरद गांधी यांची आठवण का आली नाही? ज्या पाकिस्थानने फाळणी विरोधी आणि भारत प्रेमी म्हणून शेवट पर्यंत त्रास दिला त्या पाकिस्थानचे दौरे या नवीन खुदाई खीदमतगारच्या स्वयंसेवकाने का केले असतील आणि पाकिस्थानने पण इतके वेळा त्याचे स्वागत कसे काय केले असेल? महत्वाचे म्हणजे मंदिरात नमाज करण्या ऐवजी फैजल खान यांनी २०११ पासून एका पण मशिदीत पूजा अर्चा किंवा कीर्तन कथा का आयोजित केली नाही ? की हा सगळा पुन्हा सर्वधर्मसमभावच्या नावाखाली हिंदूंना मूर्ख बनवण्याचा डाव आहे ? महात्मा गांधींचे या बाबतीतील महात्म्य संपले म्हणून आता त्यांचे नवीन पिढीला फारसे माहीत नसलेले शिष्य सहरद गांधी म्हणजेच खान अब्दुल गफार खान यांच्या चेहऱ्याचा उपयोग तर करत नाहीये?
तेव्हा पुन्हा विचार करा..!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा