मुस्लिम मनाची दांभिकता



सध्या युरोपात वाढत चाललेल्या मुस्लिम कट्टरपंथीयांच्या कारवाया हा चर्चेचा विषय झाला आहे. नॉर्वे मधील झालेल्या दंगली, इंग्लंड मध्ये उभे राहिलेले "शरिया कायदे प्रशासित" भाग आणि जर्मनीत वाढत चाललेली कट्टर "सलाफी" या इस्लामी विचारधारेतून उचल खाणारा आतंकवाद हा एकीकडे युरोप करता डोकेदुखी वाढवत आहे. तर दुसरी कडे इस्लामी देशातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित येत आहेत आणि युरोपातील देश त्यांना शरण देत आहेत. त्यातून अजून नवीन सामाजिक प्रश्न उभे राहिले आहे. 




याचाच भाग म्हणजे सध्या युरोपियन देश फ्रांस मध्ये उभे राहिलेले वादळ आहे. फ्रांस मधील एका शिक्षकाने "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे" उदाहरण देतांना तेथील प्रसिद्ध शार्ली हेब्दो या व्यंगचित्र प्रसिद्ध करणाऱ्या मासिकाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवल्या मूळे त्यांचा गळा कापून खून करण्यात आला. दोन वर्षापूर्वी याच कारणामुळे शार्ली हेब्दोच्या कार्यालयावर इस्लामी आतांकवाद्यांनी गोळीबार करत अनेकांचे प्राण घेतले होते आणि आता हा प्रकार. अर्थात या मुळे फ्रांस मधील समाजमन ढवळून निघाले आहे. जगाला व्यक्ती स्वातंत्र्याची मूल्ये देणाऱ्या फ्रांस मध्ये अश्या घटना घडणे हे फ्रांस वासीयांना खपणारे नक्कीच नाही. त्या मुळे फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रोन यांनी या सगळ्या घटने विरोधात कडक विधाने करत जागतिक मुस्लिमांचा द्वेष अंगावर ओढवून घेतला आहे. खास करून स्वतः ला मुस्लिम देशाचे तारणहार म्हणून उभे करणारे तुर्कस्थानचे राष्ट्रपती एर्दोगान यांचे वाकयुध्द जोरात सुरू आहे. समस्त मुस्लिम जगत फ्रांस विरोधात एकवटले आहे, फ्रान्सच्या समानावर बंदी वगैरे टाकायला सुरवात करत आहे, तर काही फ्रांस सोबत राजनैतिक संबंध पण तोडत आहे. 

या सगळ्यात भारतीय मुस्लिमांमध्ये पण फ्रांस विरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे. फ्रांस जाणून बुजून मुस्लिमांच्या धार्मिक भावनांसोबत खेळत असल्याचा हा रोष आहे. पहिल्या महायुद्धात इंग्रजांनी रद्द केलेल्या खिलापत पुनर्स्थापित करायची या विचारांवर चालत असलेल्या तुर्की राष्ट्रपती साहजिकपणे भारतीय मुस्लिमांचे नवीन हिरो म्हणून समोर येत आहे. तर भारत सरकार दहशतवाद विरोधी लढाईत फ्रांस सोबत उभे असण्याची ग्वाही देत आहे. 



मात्र मुस्लिम आणि मुस्लिमत्तर मतांच्या या गदारोळात अजून एक देश आपली इस्लामी दहशतवाद विरोधातील लढाई जोरकस पणे समोर नेत आहे, इतकेच नाही तर ही लढाई पूर्णत्वास नेण्यासाठी मुस्लिम देशच त्या देशाची मदत करत आहे. हा देश म्हणजे चीन !

मूळ तुर्की वंशाचे आणि आता चीनच्या शिजियांग प्रांतात राहणारे उइघर मुस्लिमांना चीन त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य देत नाही. चीन विरोधात या उइघर मुस्लिमांनी केलेले बंड चीन सरकारने निर्दयपणे मोडून काढलेच. पण अनेक उइघर मुस्लिमांना प्रशिक्षण केंद्राच्या नावाखाली, शिबिरात बंद केले आहे. खरे तर शिबिराच्या नावाखाली ते कारागृहात बंद आहेत. तेथे त्यांची धार्मिक ओळख पुसण्याचा, चीन सरकारला हवा आहे तसा इस्लाम त्यांच्यावर थोपवण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. अर्थातच जे मुस्लिम या सगळ्याचा विरोध करत आहे त्यांचा अतोनात छळ पण केल्या जात आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील मुस्लिमांचा ठेका घेतलेले पाकिस्थान, सौदी सारखे देश पण या विरोधात एक शब्द बोलत नाहीये. उलट चीनला आपल्या देशात सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी ही दहशतवाद विरोधी कारवाई करणे आवश्यक असल्याचा पवित्रा या देशांनी घेतला आहे. 



इतकेच नाही तर आता अजून पुढची पायरी म्हणजे चीन मधून पळून मोठ्या आशेने आपल्या धर्माचे देश म्हणून या उइघर मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर इजिप्त, सौदी आणि इतर आखाती देशात शरण घेतली होती, की निदान आपण येथे सुरक्षितपणे आपला धर्म जोपासू शकू. मात्र इथेही यांचा भ्रमनिरास झाला आहे ! कारण या सगळ्या देशातून या शरण घेतलेल्या उइघर मुस्लिमांना शोधून स्थानीय सरकार पुन्हा चीन मध्ये वापस पाठवत आहे. या विरोधात फक्त एकच देश आहे तो म्हणजे तुर्कीस्थान !



बाकी देश चीन विरोधात जायला तयार नाहीत. त्या देशांचे आर्थिक हितसंबंध चीन सोबत गुंतले असल्याने त्यांचा हा निर्णय काही प्रमाणात समजून घेता येतो. मात्र भारतीय मुस्लिम पण चीन विरोधात काहीही वक्तव्य करायला का घाबरत आहे हे काही कळत नाही. जे भारतीय मुस्लिम ब्रम्हदेशात होणाऱ्या मुस्लिम अत्याचाराचा विरोध इथे जाळपोळ करून, ज्यांचा त्या अत्याचारशी संबंध नाही अश्या भारतीयांना मारझोड करून करतात, जे भारतीय मुस्लिम अर्थाअर्थी काहीही संबंध नसलेल्या फ्रांस वर व्यापरिक निर्बंध आणायची वकिली करतात, ते मात्र भारताचा शत्रू असलेल्या चीन मध्ये होणाऱ्या मुस्लिम अत्याचारविषयी एकही शब्द बोलत नाही हे आश्चर्य आहे. इतकेच नाही तर काश्मीर मधील मुस्लिम नेते याच चीनची मदत घेण्याचे आपले मनसुबे जाहीर करतात हे कसे? 

टिप्पण्या