नकारात्मक GDP चा गवगवा

माझ्या तेरा वर्षच्या मुलाला लॉक डाऊन सुरू झाल्यावर मोठा प्रश्न पडला होता तो म्हणजे देशातले सगळे कारखाने, कार्यालय, हॉटेल्स बंद झाल्यावर लोकांची कमाई कशी होणार? आता तो लहान असल्यामुळे त्याला GDP वगैरे काही प्रकार असतो हे काही माहीत नाही. पण उत्पन्न होणार नाही आणि त्यामुळे लोकांचे खायचे वांधे होतील हे मात्र त्याला लगेच लक्षात आले. आता या वर उपाय काय? हे मात्र खरे तर मला पण त्या वेळेला माहीत नव्हते आणि आजही खरे माहीत नाही.

सध्या बिनजवाबदरीचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ मात्र गुलाम रोज प्रसार माध्यमांवर फिरवत आहे, विषय आहे भारताची सध्याच्या घडीला ढासळती अर्थव्यवस्था, हे महाशय अजूनही GST आणि नोटबंदीच्या दुःखातून बाहेर आले नव्हते, त्यात आता लॉक डाऊनच्या दुःखाची भर पडली. त्यातच एका इंग्रजी वृत्तपत्राने गेल्या तीन माहीचा देशाचा GDP -२३.९ असा दाखवला. त्या बरोबर आपले काँग्रेसी बिनजवाबदरीचे नेते आणि त्यांचे गुलाम हाय तोबा करत आहेत आणि पर्यायाने याची जवाबदारी सरकारवर टाकत आहे.
या चिनी कोरोना विषाणूचा मुकाबला करतांना केलेला "लॉक डाऊन" आपल्या अर्थव्यवस्थेला अश्व लावत आहे हे एकदम सत्य आहे, यात कोणतेही दुमत असल्याचे कारण नाही. पण यात दोन महत्वाचे प्रश्न आहेत.
१) जगात असे किती देश आहे ज्यांनी "लॉक डाऊन" न लावता या कोविड वर पुरता विजय मिळवला ?
२) आज जगातल्या कोणत्या देशाचा गेल्या तिमाहीचा GDP वर गेला आहे?
या प्रश्नांची उत्तरं शोधतांना आपल्याला लक्षात येईल की जगातील जवळपास सगळ्या देशांनी चिनी कोरोना विषाणू विरोधात लढा देतांना "लॉक डाऊन" चाच उपयोग केला आहे. होय,काही देशांना या "लॉक डाऊन" चा काळ कमी करता आला तर बोटावर मोजता येईल इतक्या देशांनी अंशतः "लॉक डाऊन" आमलात आणला. पण ज्या देशांनी कमी काळ किंवा अंशतः लॉक डाऊन लावला त्या देशातील कमी लोकसंख्या, तेथील अद्यावत इस्पितळे आणि तेथील जनतेत असलेली आरोग्य विषयक जागरूकता याचा मोठा हात आहे. मग भारतात जिथे आरोग्य विषयक सुधारणा कमी असतांना, जनतेमध्ये आरोग्य विषयक जागरूकता नसतांना कसे शक्य होणार होते. जिथे जपान आणि दक्षिण कोरिया या देशात कोरोना प्रादुर्भाव व्हायच्या अगोदरच जनता तोंडावर मास्क लावून फिरायची, त्यांना कोरोना काळात सरकारला मास्क लावण्या करता सरकारला सांगावे लागले नाही. पण भारतात सरकार कानीकपाळी मास्क लावा म्हणून ओरडत असतांना जनता मात्र त्याला नाकातोंडावर न लावता हनुवटीवर लावते! तेव्हा काही निवडक देशाची उदाहरणे दाखवत त्याची तुलना देशाच्या परिस्थिती सोबत करणे हे वेडेपणाचे आहे. जागतिक क्रमवारीत कोरोना प्रदूर्भावत तिसऱ्या नंबरवर देश दिसत असला तरी, सोबत असलेल्या देशाची आणि आपली लोकसंख्या याचा विचार तर आपण केला पाहिजे.
जे कोरोना प्रकरणाचे तेच GDP चे ! जागतिक स्तरावर एक चीन सोडला तर कोणत्याही देशाचा GDP सकारात्मक नाहीये. त्यातही मार्च महिन्यानंतर देशात आलेले चक्रीवादळ, पूर, सोबत चीन विरोधात सुरू असलेली युद्धक तयारी, जनतेने पण बाहेर खर्च करण्याच्या वृत्तीला लगाम लावला आहे, याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. हे सांगायला आपल्याला कोण्या राहुल गांधींची गरज होती का? कोरोना अगोदर काळात पण जग मंदी सदृश्य परिस्थितीत होते, आता तर मंदीच्या विळख्यात सापडले आहे. चीनने सगळ्या जगाला कोरोना वाटप करत आपले खिसे भरले आहे. तेव्हा उगाच नकारात्मक गेलेल्या GDP कडे बघत गळे काढण्यात काहीच हशील नाही.
सध्या इतर देशांच्या GDP चे आकडे
अमेरिका - (-) ३२.९
ब्रिटन - (-) २०.४
फ्रांस - (-) १३.८
इटली - (-) १२.४
कॅनडा - (-) १२
जर्मनी - (-)१०.१
जपान - (-) ७.६
या सगळ्यात फक्त चीनचा GDP वर आहे....३.२
आता हे सगळे आधीच सांगितले होते म्हणत बिनजवाबदरीचे नेते आणि त्याचे गुलाम थयथयाट करत असतील तर नक्की काय करावे?

टिप्पण्या