काय म्हणतो गृहमंत्री कडक कारवाई करणार आहे? कुणावर रे....कोणत्या प्रकरणात? अच्छा कंगना राणावतवर....नवीन प्रकरण आहे....अरे वा....अच्छा कालच बाहेर काढलं....अच्छा काय प्रकरण आहे ? काय भाई ड्रग पार्टी...! केव्हा झाली ? काय २००६ मध्ये....आणि कळले कसे? ...कोण अध्ययन ? ...अच्छा शेखर सुमनचा मुलगा....! ओह त्यांनी सांगितले का काल.... नाही? मग कधी सांगितले .....अच्छा २०१८ मध्ये .....कुठे रे.....मुलाखतीत...?.....बेस्ट.....नाही .....कारवाई करायलाच पाहिजे या नवीन प्रकरणात.....
पण......... मग ठाण्याहून अपहरण करून नेलेल्या आणि नंतर मारझोड केलेल्या आरोपीवर केव्हा कारवाई करणार हो गृहमंत्री?...............कोणते प्रकरण?....आठवत नाही ना...?....हो....खूप दिवस झाले.....अच्छा सोड....
बर ते सोडा, ते पालघरला साधू हत्याकांड झालं होतं ! खूप दिवस झाले हो त्या हत्याकांडाला, ती कोणतीशी उच्चस्तरीय चौकशी वगैरे करून कडक शासन करणार होते गृहमंत्री....काय झालं हो त्या उच्चस्तरीय चौकशीच? ते चार्जशीट की काय म्हणतात ते दाखल केले का हो आमच्या देशी स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी?
काय म्हणता आरोपी जामिनावर सुटले? अरे मग तर प्रकरण CBI कडे द्यायला हवे, न्यायालयात जायला हवे या करता सरकारवर, गृहमंत्र्यांवर दबाव आणायला....नाही?
अच्छा त्या करता गेले आहे वाटते कोणी न्यायालयात, मग सरकार काय म्हणाले?
शपथपत्र सादर केले? काय लिहले आहे त्यात...काय सरकार म्हणते आहे की CBI कडे प्रकरण नका देऊ, अच्छा का? ओहो....कारवाई केली म्हणते....कोणावर?....काय फक्त पोलीस अधिकाऱ्यांवर ? तेही फक्त शिस्तभंगची कारवाई करत !....अरे पण ते पकडलेले जमावतील माणस होती ना....ज्यांनी पोलिसांवर पण दगडफेक केली होती?....त्यांच्यावर कारवाईचे काय? .......अच्छा त्या उच्चस्तरीय चौकशिवल्यानी सांगितले की अफवा पसरली म्हणून त्याच्या हातून चुकून घटना घडली !.....अच्छा मग अफवा कोणी पसरवली? ते तरी शोधले काय?......अरे शिव्या कशाला देतो सांग ना माहीत नाही म्हणून ...!
बरे ते जाऊ दे...ती वांद्र्याला एका एकी गर्दी जमली होती, गाडी निघणार अफवा पसरवली म्हणून ....आठवलं का? हो..खुप दिवस झाले याला पण.......हो....तीच ज्यात एका पत्रकाराला आणि एका छुटभैय्या नेत्याला अटक केली होती लगेच अफवा पसरवली म्हणून..! हो...हो...दुसऱ्या दिवशी न्यायालयाने जामीन दिला त्यांना २४ तासात बाहेर आले होते....तेव्हा गृहमंत्री म्हणाले होते प्रकरणाच्या मुळाशी जाऊ म्हणून.....भेटले का ते मूळ....? अबे......शिव्या काय देतो बे.....अबे...... नॉटि.....गिरी का करतोय.....सांग ना माहीत नाही म्हणून......हो ना यार.....उगाच....अच्छा सोड....हो..हो....नवीन प्रकणात लक्ष घालणार आहेत गृहमंत्री.....कंगना राणावत वर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे...ड्रग पार्टी करते म्हणजे काय? .....
हो....गृहमंत्री जोमातच आहे.....कामगिरी पण दमदार आहे गृहमंत्र्यांची......हे काय सांगणं झालं का .......भाई...! माहीत आहे ना आम्हाला...! आघाडी सरकार आहे भाई....मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत भाई.....स्कॉटलंड यार्ड...हो...हो....मुंबई पोलीस.....हो...हो....बरोबर ना भाई....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा