नावे बदलून इतिहास बदलणार आहे काय?



उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथील वस्तुसंग्रहालयाचे नाम बदलून त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याच्या घोषणेमुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. या संग्रहालयाचे आधीचे नाव "मुघल संग्रहालय" होते. 


तसे नाव बदलणे आणि त्या वरून वाद निर्माण होणे आपल्या करता नवीन नाही आणि योगी आदित्यनाथ यांच्या करता पण! इलहबादचे प्रयागराज असो, की मुघलसराय जंशनचे नाव बदलून त्याला दिनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यासाठी घेतलेला पुढाकार असो किंवा फैजाबादचे नाव बदलून केलेले अयोध्या असो अश्या उत्तर प्रदेशातील त्यातल्या त्यात त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील अनेक मुस्लिम नावे बदलून त्याला त्याच्या मूळ हिंदू नाव किंवा नवीन हिंदू नाव देण्याचे अनेक प्रकार त्यांनी केले आहेत. 


अर्थात हे फक्त उत्तर प्रदेशात होत आहे असे नाही आणि मुख्य म्हणजे फक्त योगी आदित्यनाथ यांच्या मनात आले आणि त्यांनी बदलले असेही नाही. जनते कडून पण अशी नावे बदलण्याची मागणी येतेच. आपल्या राज्यात पण औरंगाबाद, अहमदनगर यांची नावे बदलून संभाजी नगर आणि धाराशिव करावे अशी मागणी जुनीच आहे. आपण पण बंबई किंवा बोंम्बेचे मुंबई असे नाव केलेच. अर्थात यातील नाव बदलाच्या काही मागण्यात तेथे घडलेल्या ऐतिहासिक घटनेचा दाखला असतो, तर काही मागणीत ऐतिहासिक काळात आक्रमकांनी पुसलेल्या जुन्या नावाचे पुनर्जीवन असते. 



तुर्की वरून आक्रमक म्हणून आलेल्या आणि नंतर जवळपास ८०० वर्षे देशावर राज्य केलेल्या, धार्मिक अत्याचार केलेल्या मुघल साम्राज्याला देशात मोठ्या प्रमाणावर आक्रमक म्हणूनच ओळखतात. ऐतिहासिक काळात अनेक हिंदू राजांनी या मुघलांशी त्यांच्या ताकदीपुढे शरण जात जुळवून घेतले असले तरी अनेक राजांनी, लोकांनी, छोटे - मोठे बंड केलेले आहेत. महाराणा प्रताप, राजा छत्रसाल, गुरू गोविंदसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले राज्य किंवा निर्माण केलेले राज्य कधीही मुघलांच्या अधीन  जाऊ दिले नाही. छत्रपती शिवाजी महारांनी केलेल्या बंडामुळेच आपल्याला मराठा साम्राज्याचा दौदिप्यमान ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तेव्हा अश्या आकर्मकांची नावे महत्वाच्या वस्तूंना ठेवण्यापेक्षा आपल्या करता, धार्मिक असो, क्षेत्रीय असो किंवा या भारत भूमीच्या स्वाभिमाना करता स्वाभिमाना करता मुघलांविरोधात ज्यांनी बंड केले अश्या पूजनीय लोकांची नावे या वास्तूंना देणे आवश्यक नाही काय? 


पण तथाकथित सर्वधर्मसमभाव किंवा ऐतिहासिक मिंध्येपणाची लागण ज्यांना झाली आहे ते मात्र या सगळ्यांच्या विरोध करतात. त्यांचा पहिला दावा असतो की मुघल भारतीय आहे, कारण ते नंतर भारतात राहिले आणि त्यांनी तुर्कांशी संबंध नाही ठेवला. अर्थात हा दावा अत्यंत खोटा आहे. मुघलांनी आपल्या समर्ज्याची ओळख नेहमीच मुघल सल्तनत ए हिंद, तुर्की अशीच ठेवली होती. होय तत्कालीन परिस्थितीत भारत आणि तुर्की मधील अंतर, त्यातही मधल्या रस्त्यात होणारा तत्कालीन अरबी टोळीवाल्यांचा त्रास आणि दळणवळणा करता लागणारा वेग लक्षात घेता मुघल साम्राज्य आणि तुर्की मधील येणे जाणे आजच्या सारखे सहज शक्य नव्हते. याच मुळे मुघल आणि तुर्क यांच्यात काहीसे अंतर तयार झाले. मात्र बादशहा बनल्यावर त्या बादशहाला तुर्की साम्राज्याची मान्यता मात्र मिळवावी लागत असे आणि मुघल ही प्रथा नियमित पार पाडत हे ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजेच मुघल इथल्या मातीशी नाही तर तुर्की साम्राज्याशी इमान बांधून होते. 


यांचा दुसरा आक्षेप असतो की, नाव बदलून इतिहास बदलणार आहे काय? हा आक्षेप तसा एकदम योग्य आहे. कारण नाव बदलून आणि इमारती पडून आपण इतिहासा पासून सुटका करून घेऊ शकत नाही तो भुता सारखा आपला पिच्छा पूर्वतोच. अगदी आता ताज्या राम जन्मभूमी मंदिर प्रकरणात तर खरे या तथाकथित लोकांना चांगलेच लक्षात आले आहे. तिथे मंदिर नव्हतेच पासून अशी काही घटनाच घडली नव्हती पर्यंत अनेक कथा काहण्या याच लोकांनी राम मंदिर विरोधात प्रस्तुत केल्या होत्या. पण ऐतिहासिक पुराव्याच्या जोरावर ५०० वर्षाची हि लढाई अखेर हिंदूंनी जिंकली. या वरूनच इतिहास तुमची पाठ सोडत नसतो हे नक्की ! पण आम्हाला पण इतिहास पुसायचा प्रयत्न थोडीच करायचा आहे. ना आम्हाला इमारती तोडायच्या आहेत, ना पुतळे तोडायचे आहे, ना इतिहास पुसायचा आहे. आम्हाला उलट या इमारती आमच्या मुलांना दाखवत इतिहासाची ओळख करून द्यायची आहे, त्यांना सांगायचे आहे कसे अत्याचार करत, आपले धार्मिक राज्य स्थापन केल्या गेले, कसे धार्मिक अत्याचार करत आपला धर्म लादला गेला, कसा आपल्या राजे पणाचा उपयोग करत आमची धार्मिक स्थळे उध्वस्त केली, कशी आमच्या शहराची जुनी नावे बदलवत आमच्या शहराला नवीन धार्मिक ओळख द्यायचा प्रयत्न केला गेला. सोबतच आम्हला आमच्या पिढीला हे पण शिकवायचे आहे की कुणी या धार्मिक अत्याचार करणाऱ्या साम्राज्याला प्राणपणाने विरोध केला आणि कसे संघर्ष करत तब्बल १२०० वर्षा नंतर आम्ही आमच्या शहराला त्याचे जुने नाव पुन्हा बहाल केले. 


इतिहास विसरण्यासाठी, पुसण्यासाठी नसतो, तो असतो लक्षात ठेवण्यासाठी, ऐतिहासिक काळात केलेल्या चुका पुन्हा आज वर्तमानात होणार नाही याची काळजी घेण्यासाठी !

टिप्पण्या