नागपुरात चिनी करोना विषाणू वाढता प्रकोप नागपूरकर आणि नागपूर स्थानीय प्रशासना करता डोकेदुखी वाढवणारा आहे. बधितांची वाढणारी संख्या बघता नागपूर महानगर पालिकेने अधिका अधिक चाचण्या करण्याचा मार्ग निवडला, जेणे करून संशयित रुग्णाची वेळीच तपासणी होत रोगाच्या प्रसाराला आळा बसेल, परिणामी मृत्यू पण कमी होतील.पण बधितांची आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची वाढती संख्या बघता स्थानीय प्रशासन यंत्रणा या अकल्पित संकटासाठी अपुरी पडत आहे, अर्थात हे साहजिक आहे आणि याला प्रशासन यंत्रणेचा दोष म्हणून बघता येणार नाही. या समस्येवर मात करण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लोक समस्या संशोधन व लोक कल्याण समितीच्या सहकार्याने "मिशन विश्वास" हे अभियान सुरू केले आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव जागृत करणारी "सेवांकुर" या संस्थेचे कार्यकर्ते सुद्धा या कामात आपला वाटा उचलत आहे.महापालिकेच्या प्रत्येक झोन मधील अधिकाऱ्यांसोबत समन्वया ठेवत हे काम समोर सरकत आहे. बधितांच्या संपर्कात आलेल्यांच्या याद्या बनवत, त्यांना चाचण्यांकरता प्रोत्साहित करणे, करोना बाधित कुटुंबियांना आवश्यकता वाटल्यास त्यांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणे, गृहविलगिकरणात असलेल्या लोकांची मानसिक स्थिती ढळू नये म्हणून त्यांचे समूपदेशन करणे, कोरोना बाधित व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत, तसेच त्याच्या नातेवाईकांद्वारे बधितांच्या संपर्कात आणलेल्यांची माहिती काढणे, यादी बनवणे आणि या याद्या महानगर पालिका अधिकाऱ्यांच्या हवाली करणे, विलगिकरणात गेलेल्यांना मानसिक धक्का बसला असतो, तेव्हा ते यात एकटे पडले नाहीत, समाज त्यांच्या सोबतीला उभा आहे याचा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करणे, घरचा कर्ता समजा या कोरोनाच्या फेऱ्यात अडकला असेल तर त्याच्या माघारी घरची घडी विस्कटणार नाही याची काळजी घेणे, त्याच्या माघारी असलेल्या वृद्धांच्या मानसिक आधार देणे, त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था करणे असे सर्वंकष सेवाकार्य या "मिशन विश्वास" च्या मदतीने सुरू आहे.जवळपास ७ हजार पेक्षा जास्त कोरोना बधितांशी आतापर्यंत संपर्क साधला गेला आहे. महापालिकेच्या १० झोन मध्ये समितीचे २० कार्यकर्ते या अभियानात सहभागी आहेत. हे सेवाकार्य करतांना मुखोच्छादन व भौतिक दुरतेचा पुरेपूर उपयोग करत कार्यकर्ते सेवा कार्य पुढे नेत आहे, मात्र ही भौतिक दुरवा सामाजिक दुराव्यात बदलणार नाही याची काळजी पण घेत आहेत.आता लक्षात घ्या की देशात कोरोना विरोधात दिलेला लढा यशस्वी झाला आहे तिथे सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणावर प्रशासनाच्या मदतीला उभ्या होत्या, मग राजस्थान मधील भिलवाडा पॅटर्न असो की मुंबई मधील धारावी पॅटर्न! मात्र नागपुरात एक वेगळाच पॅटर्न जन्माला आला आहे तो म्हणजे, "आम्ही काही करणार नाही आणि तुम्हाला काही करू देणार नाही पॅटर्न"नागपूर महानगर पालिका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोक कल्याण समितीने सुरू केलेल्या "मिशन विश्वास" विरोधात स्थानीय काँग्रेसचे प्रवक्ते संदेश सिंगलकर यांनी कोरोना रुग्णाच्या खाजगी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला आहे. आता फक्त आरोप करून थांबले नाहीत तर राज्य मानवी हक्क आयोगा कडे तक्रार पण दाखल केली आहे. महानगर पालिका उपयुक्त श्री. राम जोशी, उपयुक्त श्री. प्रकाश वरखेडे तर लोक कल्याण समितीचे श्री सुमधुर गोखले यांना मुख्य आरोपी ठरवण्यात आले आहे.राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सय्यद यांच्या समोर याची सूनवाई होणार आहे. मदत करण्याच्या बहाण्याने राजकीय दृष्टीने प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करण्या सारखा हीन आरोप या हीन मानसिकतेतून करण्यात आला आहे. तक्रारदार संदेश सिंगलकर यांच्या मार्फत तथाकथित पुरोगामी असीम सरोदे यांनी वकीलपत्र घेतले आहे.
तेव्हा विचार करा, आम्ही म्हणू तेच समाजसेवक आणि आम्ही म्हणू तीच समाजसेवा अशी विचारसरणी असणारे आता आम्ही म्हणू त्याच लोकांनी समाजसेवा करावी असा सूर काढत आहे. या कोरोना काळात भारतात अनेक समाज उपयोगी कामे भारतातील अनेक समाजसेवी संस्थानीं केली आहे, करत आहे. धारावी येथे पण संघा सोबत अनेक समाजसेवी संस्था काम करत होत्या, धारावीच्या यशाचे श्रेयावर संघाने स्वतः कधीच घेतले नाही. मात्र काम केल की योग्य फळ मिळते आणि काम करण्यासाठी लागते कार्यकर्त्यांची ताकद ! जी जवळ नसली की मग इतर जे काम करतात त्यांचे लोकउपयोगी काम थांबवण्याचे विचारच काम करतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा