स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही

मे महिन्यात मुंबईतील चिनी कोरोना विषाणूचा हॉट स्पॉट ठरलेला परिसर धारावीतील शाहू नगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांचा मृत्यू कोविड - १९ मुळे झाला होता. तेव्हा या कोविडयोद्धयाचा मृत्यू हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे प्रतीक म्हणून समोर आला होता. स्व.अमोल कुलकर्णी यांच्या कोरोना चाचणीचा निकाल यायलाच तब्बल ३ दिवस लागले होते, त्या काळात त्यांना घरीच गृहविलगिकरणात राहण्यास सांगण्यात आले होते. चाचणीचा निकाल आल्यानंतर पण यात बदल झाला नव्हता. पण संध्याकाळी तब्येत जास्त खलवल्यावर जेव्हा त्यांना इस्पितळात नेण्याचा प्रयत्न केले तेव्हा त्यांच्या करता एक रुग्णवाहिका पण मिळाली नव्हती. विशेष म्हणजे पोलीस दलातील त्याचे सहकाऱ्यांनी थेट आपल्या उच्च अधिकाऱ्यांच्या मदतीने ही धावपळ केली होती तरी ही अवस्था होती. शेवटी पोलीस दलातील हा कोविडयोद्धा मात्र आपली जीवनाची लढाई हरला. पण निर्लज्ज प्रशासन मात्र या योद्धचा मृत्यू पण कोविडमूळ झाल्याचे मान्य करायला तयार नव्हते, त्यांच्या मृत्युदाखल्या वर तसा उल्लेख करायला पण तयार नव्हते, या करता पण बराच संघर्ष करावा लागला होता.

तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला या विषयी आणि ऐकूच राज्यातील चिनी कोरोना विषाणू विरोधात करत असलेल्या हलगर्जीपणा बद्दल पत्रही दिले होते. तत्कालीन काळात समाज माध्यमांवर या प्रकारणाविरोधात मोठा गदारोळ झाला होता. मात्र तेव्हा राज्यातील पत्रकारांनी म्हणा किंवा वृत्त समूहाने म्हणा घेतलेली भूमिका आर्तक्य होती. तत्कालीन काळात वृत्त समूह मात्र विरोधी पक्ष राज्याच्या या कठीण प्रसंगात सत्तेचे राजकारण करत असल्याच्या सरकारच्याच वक्तव्याची री ओढत होती. मालेगाव येथे होणारे मृत्यू लपवणे, राज्यात रुग्णांची होणारी हेडसाळ या बाबत वृत्त द्यायला ही वृत्त समूह उदासीन होती.
मात्र आज तीच वृत्त समूह एका वृत्तवाहिणीच्या पुण्यातील सहकाऱ्याच्या मृत्यूवर मात्र खडबडून जागी झाली असे दिसत आहे, निदान तसे दाखवायचा प्रयत्न तरी करत आहे. टीव्ही ९ चे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा या चिनी कोरोनाने बळी घेतला. पण स्व. रायकर यांच्या मृत्यूमागे प्रशासन तितक्याच भक्कमपणे उभे होते जितक्या भक्कमपणे मे २०२० ला ते मुंबईतील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्व. अमोल कुलकर्णी यांच्या मागे उभे होते !
मात्र "स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही" असे म्हणतात, या उक्तीला धरून आज राज्यातील पत्रकारांना तो स्वर्ग दिसला असे समजावे का? जेव्हा पासून चिनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे तेव्हा पासून आपले लढवय्ये मुख्यमंत्री घरात बसून असल्याची रास्त टीका होत आहे, मात्र वृत्त समूहातून त्यावर एका शब्दाने व्यक्त झाली नव्हती, ती मात्र आज त्यावर मत व्यक्त करीत आहे, मग आज पर्यंत हे काय झोपले होते काय? आजही काही पत्रकार बंधू पुण्यातील महानगर पालिका कोणत्या पक्षाच्या हातात आहे, या वर गदारोळ करत आहे. मात्र एकूण प्रशासन पालिका आयुक्त म्हणजेच राज्य सरकारचा प्रतिनिधी हाकत आहे या कडे दुर्लक्ष का करत आहेत? त्यात आरोग्य मंत्री "श्रीमंत लोक ICU चे बेड पैशाच्या जीवावर अडवतात" असे वक्तव्य करत आपली हतबलता दाखवतात त्या विरोधात पण पत्रकार बंधू मूग गिळून बसतात हे कसे? अर्थात ज्या आरोग्य मंत्र्यांचा फोन मुख्यमंत्री उचलत नाही, त्याचे बाकीचे प्रशासन ऐकणार आहे का ? हा पण प्रश्नच आहे.
एकूण राज्याची गंभीर परिस्थिती मग कोकणात आलेले वादळ असो, पूर्व विदर्भातील पूर असो किंवा राज्यातील वाढणारा कोरोनाचा विळखा असो, राज्य प्रशासन सांभाळण्यात सपशेल नापास झाले आहे. पण अजूनही पत्रकार आणि वृत्त समूह मुख्यमंत्री घरात बसून संपूर्ण राज्य कसे पालथे घालतात यावर स्वप्नरंजन करण्यात मश्गुल आहे.

टिप्पण्या