राज्य सभेत कृषी विधेयक पारित होतांना झालेला गोंधळ, गोंधळ घालणाऱ्या सदस्यांचे केलेले निलंबन आणि या निलंबित सदस्यांनी केलेल्या आंदोलनाला आपल्या शरद पवार साहेबांनी दिलेला पाठींबा, त्या करता केलेली उपवासाची घोषणा हा एक "सेल्फ गोल" आहे. कसा? मग वाचा
९ एप्रिल २०१८ ला काँग्रेसने दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात तथाकथित पणे वाढणाऱ्या "दलित अत्याचारा" विरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण जाहीर केले होते. खरे तर काँग्रेसला पुन्हा उभारी देऊ शकेल असा हा कार्यक्रम होता.
सकाळ पासूनच काँग्रेस नेते उपोषण स्थळावर जमायला सुरवात झाली. जाहीर कार्यक्रमानुसार सकाळी १० वाजता राहुल गांधी कार्यक्रम स्थळी पोहचत उपोषणाला सुरवात करणार होते. मात्र काँग्रेसी संस्कृती प्रमाणे राहुल गांधी दुपारी १ वाजता उपोषण स्थळी पोहचले आणि आपला उपोषणाचा कार्यक्रम सुरू केला. काँग्रेसचे समस्त नेतेगण पण मांचावर विराजमान होत कार्यक्रमाला हातभार लावायला लागले.
पण तो दिवस काही काँग्रेसचा नव्हता. विरोधकांना टीका करायला जागा द्यायचीच हेच काँग्रेसने ठरवले होते. पहिले कोणाच्या तरी लक्षात आले की दलित अत्याचार विरोधी या आंदोलनात तर मंचावर १९८४ च्या शीख दंगलीत शीख समाजावर अत्याचार केल्याचा आरोप असलेले सज्जन सिंग अगदी सज्जना सारखे बसले होते. मग पुन्हा कोणी तरी त्यांची मनधरणी करत त्यांना मंचाच्या खाली उतरवले. हे होत नाही तर कोण्या वृत्त वहिनीने मंचावर उपोषणाला बसलेले काँग्रेसचे नेते काही वेळ पहिले दिल्लीतील प्रसिद्ध चांदणी चौकात एका उपहारगृहात बसून छोले भतुरे चापत असल्याची चित्रफीत फिरवायला लागले आणि पोटभर खाऊन उपोषण कसे करत आहे? असा प्रश्न विचारून खिल्ली उडवायला लागले. या सगळ्या प्रकारात देशाची जनता काँग्रेसने हे उपोषण नक्की कशा करता केले हेच विसरून गेली.
आज नेमकी तीच चूक शरद पवार सारख्या महाराष्ट्राचा आधारवड आणि कर्तृत्ववान राजकारणी म्हणून ज्यांचा गौरव होतो त्यांनी केली. खरे तर सकाळीच उपोषण करतो म्हणून समाज माध्यमांवर टाकले असते आणि नंतर पत्रकार परिषद घेतली असती तरी चालले असते. पण एक चूक लपवायला दुसरी चूक या पद्धतीने चुका होत गेल्या.
कृषी विधेयक राज्य सभेत पारित होतांना नेमकी राष्ट्रवादी पक्षाच्या खासदारांनी वाक आऊट केले. आता शरद पवार सारख्या जन्म राजकारणात वेगवेगळी पदे भूषवत गेलेल्या जाणत्या राजाला हे नक्कीच माहीत असेल की संसदेत आपली सदस्य मतदानाच्या वेळेस सभागृहा बाहेर राहणे म्हणजे अप्रत्यक्षपणे सरकारला मदत करणेच आहे. मात्र ताकाला जाऊन भांडे लपवण्याची ही शरद पवार यांची जुनी सवय ! त्याला ते तरी काय करणार ? मात्र नंतर लोकांना जेव्हा भांडे आणि भांड्यातील ताक दिसायला लागले, तेव्हा आपण विरोधकांसोबत ठाम आहोत हे दाखवायची खुमखुमी आली. मग गोंधळ घालणाऱ्या ज्या राज्यसभा सदस्यांवर निलंबनाची कारवाई केली होती, त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा द्यायची युक्ती त्यांनी केली. या करता शरद पवार यांनी पण उपोषण जाहीर केले, केव्हा ? तर दुपारी १ वाजता पत्रकार परिषदेत आणि किती वाजे पर्यंत तर रात्री ९ वाजेपर्यंत. ! कोणी पवार साहेबांना सांगा बरे राज्यात काय देशातील अर्ध्या पेक्षा जास्त जनता रोज दुपारी १ ते रात्री ९ काही खातच नाही म्हणून आणि त्यातील पण मोठ्या संख्येला रात्री ९ नंतर पण काही खायला मिळेलच याची शाश्वती नसते म्हणून !
केला ना राहुल गांधींच्या काँग्रेस सारखा सेल्फ गोल ! हे उपोषण पण तितकेच खोटे होते जितके खोटे शरद पवार यांनी छत्री असून पावसात भिजण्याचे नाटक केले होते !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा