दोन वर्षा पूर्वी जर्मनी मध्ये नववर्ष स्वागत करणाऱ्या जर्मन महिलांशी असभ्यपणा केल्या नंतर युरोप मधील निर्वासित मुस्लिमांचा प्रश्न पहिल्यांदा जगाच्या नजरेत आला. पण खरेच युरोप करता इस्लामचा प्रश्न पहिल्यांदा समोर आला होता का?
तर नाही युरोप मधील ब्रिटन, फ्रांस, स्पेन, पोर्तुगाल सारख्या देशांनी जगावर राज्य केले, वसाहती बनवल्या, त्यात या सगळ्यांच्या वसाहती त्यातही फ्रांस आणि ब्रिटनच्या मोठ्या प्रमाणावर आशिया आणि आफ्रिका खंडात होत्या जिथे इस्लाम मोठ्या प्रमाणावर आहे. या वसाहतीतील जनता मोठ्या प्रमाणात ब्रिटन आणि फ्रांस मध्ये स्थलांतरित झाले होते, अजूनही होत आहेत. ब्रिटन मध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्थान, बांगलादेश आणि भारतातून मोठ्या प्रमाणावर मुस्लिम ब्रिटन मध्ये स्थायिक झाले. हेच हाल फ्रांसचे पण ! पण जागतिक राजकारण, वाढणारा कट्टरवाद याचे परिणाम पण या देशांच्या इस्लामी जनसंख्येत पण दिसायला लागला. पण तथाकथित समाजवाद किंवा मानवतावादी डावा विचारांची नशेपाई आपल्या राष्ट्रवादी आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या इशाऱ्यांकडे कधीच लक्ष दिले गेले नाही. त्यातही फ्रांस ने तर अरब राष्ट्रातील यादविला कंटाळलेल्या अनेक मुस्लिम निर्वासितांना आपल्या देशात शरण दिली. या अधिकृत निर्वासितांनी नंतर अनेक अनधिकृत निर्वासितांना आपल्यात सामावून घेतले. जर्मनी, फ्रांस, ब्रिटन मध्ये मोठ्या प्रमाणावर हेच झाले.
उजव्या राष्ट्रवादी लोकांच्या इशाऱ्याला वंशवाद, इस्लामफोबिया, नवनाझी वाद सारखी नाव देत बदनाम केल्या गेली. पण गेल्या काही वर्षात याच राष्ट्रवादी लोकांची भीती आता खरी असल्याची परिस्थिती आहे. ब्रिटन, फ्रांस आणि जर्मनी मध्ये काही भागात बेकायदेशीर पणे आता "शरिया कायदा" लागू करण्यात आला आहे. तर काही भागात स्थानीय प्रशासनाने आपल्या लोकांनी तेथे आपल्या जवाबदरीवर फिरावे म्हणून पाट्या लावाव्या लागल्या आहेत. कारण सरळ आहे की समजा या शरिया कायदा लागू असल्याच्या भागात कोणी बाई आपले अंग न झाकता गेली तर तिच्या सोबत शरिया कायद्या प्रमाणे वागणूक केली जाते.जर्मनी मध्ये तर इस्लाम मधील कट्टर सलाफी विचारांच्या अनुनायची संख्या गेल्या सहा वर्षात दुपटीहून अधिक वाढली, इतकेच नाही तर जर्मनीमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यात या अनुयायांचा हात असल्याचे पुरावे मिळाले, त्यातही यातील अनेक अनुयायी सध्या गुप्त झाले आहेत असा जर्मन पोलीस गुप्तचर विभागाचा रिपोर्ट आहे. ही गायब संख्या छोटी नाही तब्बल २ हजार आहे. याच्या कारवाया जर्मन, फ्रांस सकट सम्पूर्ण युरोपात होतात. जर्मनीत तर शरिया कायदा व्यवस्थित पाळल्या जात आहे का तपासायला विशेष "शरिया पोलीस" पण अनधिकृतपणे फिरतात.पहिले जर्मनी, नंतर फ्रांस आणि आता स्वीडन, नार्वे येथील दहशतवादी कारवाया आणि दंगलीने पुन्हा येथील इस्लामी कट्टरतावाद आणि त्या मुळे येणाऱ्या समस्या जगासमोर आल्या आहेत. मात्र तेथील तथाकथित मानवतावादी डाव्या विचारसरणीच्या बुद्धिवादी मात्र या हिंसाचाराचे खापर त्या त्या देशातील बहुसंख्यांक लोकांवर, राष्ट्रवादी विचारांच्या नेत्यांवर फोडत आहेत. आपले खरे करण्यासाठी पुन्हा वंशवाद, इस्लामफोबिया सारखे शब्द भंडार त्यांच्या जवळ आहेच. पण आता या इस्लामी कट्टरतेला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.
या देशांच्या अवस्थेपाई काही युरोपियन देश या येणाऱ्या इस्लामी निर्वासितांबद्दल वेळीच सावध भूमिकेत आले. यात पोलंड हा सुरवातीपासूनच या बाबतीत आघाडीवर होता. विशेषतः पोलंडने फक्त ख्रिश्चन निर्वासितांना आश्रय द्यायचे धोरण अवलंबले होते, पोलंडच्या या भूमिकेचा बहुसंख्य युरोपियन राष्ट्रांनी निषेध केला होता आणि अजूनही करत आहे. युरोपात घडणाऱ्या घटना बघत हंगेरीने पण आता आपल्या सीमा या निर्वासितांना बंद केल्या आहेत. त्या मुळे हंगेरी पण आता या तथाकथित मानवतावादी लोकांच्या डोळ्यात सलत आहे.
भारतात सहिष्णू भूमिका घेणाऱ्या हिंदूंची जी कुचंबणा झाली तीच कुचंबणा सध्या युरोप मधील बहुसंख्य जनतेची होत आहे. तेव्हा तिथे पण पुढील काही दिवसात राष्ट्रवादी विचारांच्या कट्टर लोकांचे राज्य आले तर गळे काढणारे पण हेच मानवतावादी असतील.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत कसे आले याचे आश्चर्य वाटणार्यांनी एकदा यु ट्यूब वर फॉक्स चॅनलने "संविधान पहिले आणि चांगले की शरिया कायदा" या बाबत घेतलेला सर्व्हे आणि चर्चा बघा म्हणजे अमेरिकन जनता डोनाल्ड ट्रम्प का निवडून येतात किंवा वांशिक दंगली नंतर पुढे आलेले जो बिडेन यांचे काही राज्यात पुन्हा माघारतात याचे उत्तर मिळेल.
बाकी बंगळुरू असो की स्वीडन लिब्रांडू एकाच फर्मूल्यावर काम करत आहेत हे नक्की !
म्हणा जयहिंद.. जय शिवराय..
उत्तर द्याहटवाआता दुसरा कोणता नाही उपाय!!