रामजन्मभूमी मंदिर भूमिपूजन - आनंद आणि जवाबदारी


आज ५०० वर्षाच्या अविरत संघर्षाचे फळ मिळत आहे. आयोध्यायेथील रामजन्मभूमीला आक्रमकांकडून लागलेला कलंक मिटला जाइल. आज रामजन्मभूमी मंदिराचे भूमीपूजना सोबतच मंदिर बांधकाम सुरू होईल, पुढच्या ३ वर्षात बांधकाम पूर्ण पण होईल. पण महत्वाचा प्रश्न हा आहे की तुमचा संघर्ष संपला का?


आजही अनेकांना वाटते की रामजनभूमी संघर्ष हा १९९० साली संघ आणि भाजपने राजकारणा साठी सुरू केला. अनेकांना आजही वाटते १९९२ साली तेथील "विवादित ढाचा" पाडला गेला, म्हणून न्यायालयात हिंदूंना पुरावे देता आले. अनेकांना असेही वाटते की न्यायालयाने दिलेला निकाल हा पुराव्यांवर नाही तर श्रध्येवर आधारित आहे. ही जी काही वक्तव्ये येत आहेत ती दिशाभूल करणारी आहेत.


आणि म्हणूनच आज सांगावे वाटते की आपला संघर्ष संपला नाहीये, तर अविरत चालणाऱ्या संघर्षात मिळालेला एक मोठा, नेत्रदीपक विजय नक्कीच आहे. या विजयाचा आनंदउत्सव साजरा करणे स्वाभाविक पण आहे आणि आवश्यक पण! पण संघर्ष संपला असा विचार करत थांबू मात्र नका, लक्षात घ्या विजय मिळवणे जितके कठीण असते, तितकाच तो सांभाळणे आणि सातत्याने विजयी होत राहणे हे पण तितकेच गरजेचे असते. त्या साठी आवश्यक आहे सजग राहणे, सतर्क राहणे!



कारण आपल्याच धर्मातील काही "जयचंद", रामायणातील काही मायावी राक्षस "मारीच" ची रूप आपल्याच आजूबाजूला वावरत आहे. आज रामजन्मभूमी मंदिराच्या भूमीपूजनाच्या वेळी आपली प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावरच शंका घेणारे, सतत "तारीख नही बतायेगे" चा नारा देणारे, आज राम वस्त्र अंगावर ओढून मायावी मारीचचे काम समोर नेत आहे. याच सोबत सतत देशाच्या संविधानाचे, न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास ठेवण्याचे आश्वासन देणारे मात्र आज बिथरले आहेत.


तेव्हा लक्षात घ्या.....संघर्ष संपला नाहीये! "विजय" सांभाळून ठेवत तो पुढील पिढीला हस्तांतरित करण्याची जवाबदारी वाढली आहे, हा संघर्ष कशा करता याची योग्य माहिती आपल्या पुढील पिढीत संकरित करा, नाहीतर "सर्वधर्मसमभावाचे" विष पाजायला हेच "मारीच" राम नामाची वस्त्र घालून तयारीत आहेच. तेव्हा गाफील राहू नका, आपल्या पुढच्या पिढीला जवाबदरीने संघर्षाची सगळी माहिती द्या, त्यांना हा अट्टाहास नक्की कशासाठी याची योग्य माहिती द्या! आता जवाबदारी संपली नाहीये उलट वाढली आहे याची जाणीव हा विजयोस्तव साजरा करतांना सदैव मनात ठेवा.

टिप्पण्या