हेच डाव्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य

 

२०१६ मध्ये एक पुरोगामी सत्यशोधक पत्रकार राणा अयुब नावाच्या बाईने एक पुस्तक प्रकाशित केले, नाव होते "गुजरात फाईल्स" ! हे पुस्तक २००२ साली गुजरात मध्ये गोध्रा येथे झालेल्या हिंदू हत्याकांडातून उसळलेल्या दंगलीवर लिहले आहे. या पुस्तकात गुजरात दंगलीचे सत्यशोधन केल्याचा दावा केला गेला. बघा २००२ मध्ये गुजरात दंगल झाली, त्या नंतर तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गुजरातचे गृहमंत्री अमित शहा यांच्या वर या दंगलीच्या माध्यमातून मुस्लिमांवर अन्याय केल्याचा आरोप केला गेला. तत्कालीन केंद्रीय सरकारने CBI पासून अनेक तपास यंत्रणांद्वारे या दोघांची कसून चौकशी केल्या गेली, खटले दाखल करण्यात आले. या सगळ्या शुक्लकाष्ठ मधून नरेंद्र मोदी आणि अमित शहा सहीसलामत बाहेर पडले. या काळात केंद्रातील काँग्रेस प्रणित UPA सरकार पासून, भारतातील तमाम पुरोगामी पत्रकार, तथाकथित संविधनप्रेमी सर्वधर्मसमभाववादी नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दांचा मारा करत होती, "मौत का सौदागर" पासून "खून के दलाल" पर्यंत उपमा यांना देण्यात आल्या. 

पण या सगळ्यातून बाहेर निघत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजकारणात आपले बस्तान कायम ठेवले, इतकेच नाही तर गुजरात राज्यातून बाहेर निघत २०१४ देशाचे राजकारण ढवळून काढले, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून प्रचंड मतांनी निवडून आले. मग २०१६ साली या राणा अयुब नावाच्या पत्रकार बाईंनी गुजरात दंगलीचे सत्यशोधन म्हणून "गुजरात फाईल्स" हे पुस्तक प्रकाशित केले. देशातील तमाम लिंब्राडू पत्रकारांनी या बाईला आणि या पुस्तकाला डोक्यावर घेतले. आता सांगा की २००२ नंतर १४ वर्षा नंतर नानवटी आयोगा पासून डझनभर राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध तपास यंत्रणांनी गुजरात राज्याच्या सामान्य माणसापासून मुख्यमंत्र्या पर्यंत सगळ्यांचे जाब जवाब घेऊन, प्रदीर्घ न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून या दंगलीची आणि त्यात राज्य सरकारच्या भूमिकेचा सगळे सत्य जनते समोर २०१४ पूर्वीच वेळोवेळी आले होते, मग २०१६ साली या राणा अयुब बाईचे "गुजरात फाईल्स" नावाचे पुस्तक असे काय वेगळे सांगणार होते? तरी समस्त लिंब्राडू पत्रकार या पुस्तकाला आणि या लेखिकेला डोक्यावर घेऊन नाचत होते ते का? महत्वाचे म्हणजे या पुस्तकात हिंदुत्ववादी राजकारणावर आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सारख्या नेत्यांवर हेत्वा आरोप असतील हे माहीत असून सुद्धा कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनेने किंवा सरकार मध्ये उच्च स्थानावर असून भाजपच्या कोणत्याही नेत्याने या पुस्तकाच्या प्रकाशनाला आडकाठी आणली नाही किंवा या पुस्तकाच्या प्रचारावर बंदी आणली नाही, काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या पुस्तकातील आरोपांना उत्तर दिलीत, या पुस्तकातील असत्य कथन खोडून काढले, मात्र पुस्तकावर बंदी आणण्याची भाषा मात्र केली नाही. तरी काही लोकांनी या राणा अयुबला धमक्या या पुस्तकाच्या लिखाणा मुळे चिडून धमक्या वगैरे दिल्याचे रडगाणे गायला गेले, या खऱ्या खोट्या धमक्यांची जाहिरात लिब्रांडू पात्रकारांतर्फे केल्या गेली. तरी सरकारने आपल्या कडे नोंदवल्या गेलेल्या धमक्यांच्या तक्रारींवर योग्य कारवाही केली. कशासाठी हे जाहाल हिंदुत्ववादी, संविधानद्रोही सरकार असे वागले असेल? कश्यासाठी सरकारने या राणा अयुबच्या अभिव्यक्तीवर आपल्या कडे क्षमता असून बंदी घातली नाही? 

पण आज हेच पुरोगामी, संविधनप्रेमी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे भोक्ते असलेले ही लिंब्राडू पत्रकारांची जमात आणि इतर लिंब्राडू जमात मात्र आज एका पुस्तकाचा विरोध करत आहे. नुसताच विरोध केला तर काही हरकत नाही पण या पुस्तकाच्या प्रकाशनाला पण बंदी घातली, हे पुस्तक प्रकाशित व्हायला नको म्हणून प्रकाशन संस्थेवर दबाव आणल्या गेला आणि प्रकाशन समारंभच रद्द करायला लावला. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणारी ही लिब्रांडू जमात या पुस्तकाचा इतका प्रखर विरोध का करत आहे ? कारण हे पुस्तक आहे २०२० मध्ये झालेल्या दिल्ली दंगलीवर !  मोनिका अरोरा, सोनाली चितळकर आणि प्रेरणा मल्होत्रा या लेखिक त्रयीने CAA/NRC विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला देशाच्या राजधानीत लागलेले हिंसक वळण आणि त्यायोगे दिल्लीतील सामान्य नागरिकांना, विशेषतः हिंदूंना झालेला त्रास, मानहानी यावर सविस्तर भाष्य केले आहे. पुस्तकाचे नाव आहे "दिल्ली रॉईट्स २०२० - दी अनटोल्ड स्टोरीज" ! २२ ऑगस्टला या पुस्तकाचे आभासी प्रकाशन भाजपा नेते भुपेंद्र यादव यांच्या हस्ते करायचे आयोजित केले होते. मात्र या अगोदर भारतातील डाव्या तथाकथित बुद्धिजीवी आणि त्यांना साथ देणाऱ्या लिंब्राडू पत्रकार आणि जमातींनी या प्रकाशनाच्या विरोधात रणशिंग फुंकले. या पुस्तकाची प्रकाशक संस्था "ब्लुम्सबरी इंडिया" विरोधात शिमगा करण्यात आला. समाज माध्यमांवर #ShameonBloomsbury नावाने हॅशटॅग चालवत आघाडी उघडत या प्रकाशन संस्थेवर दबाव आणला गेला. परिणामी या प्रकाशन संस्थेने या पुस्तकाच्या प्रकाशनातुन अंग काढून घेतले. 

विचार करा हे सगळे डावे विचारवंत, लिंब्राडू जमात तीच आहे जी इतर वेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गुणगान करत फिरत असते, हिंदुत्ववादी विचारांवर नेहमी याच अभिव्यक्तीच्या संकोच करणारे विचार असल्याचा आरोप करत असतात. हे लिंब्राडू तेच आहे जे पद्मावत चित्रपटाच्या वेळेस याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत होते आणि चित्रपट न बघताच त्यात काही विवादित असल्याचे कसे कळले असा सवाल विचारत होते ! मग आता पुस्तक न वाचताच हे लिब्रांडू पुस्तकाला विरोध कसा काय करत आहेत? 

कारण सरळ आहे ! CAA/NRC विरोधात मुस्लिम धर्मांधांना हाताशी धरत, सामान्य लोकांच्या मनात या कायदा विरोधात चुकीची माहिती भरणारे हेच लिब्रांडू जमात होती. या चुकीच्या माहितीच्या आधारावर याच लिंब्राडूनी मुस्लिमांच्या मनात या सरकार विरोधात आणि हिंदू विरोधात द्वेष पेरायला सुरवात केली. दिल्लीतील CAA/NRC आंदोलन स्थान शाहीनबाग येथे भाषणे करत अक्षरशः देशविरोधी वक्तव्ये करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. डाव्या आंदोलनात सक्रिय उमर खालिद सारख्या चेहऱ्यांनी आपल्या मुस्लिम असण्याचा पूर्ण फायदा हे आंदोलन हिंसक करण्यास उचलला, त्याला द्यायला डाव्या कंपूतील खोटारडा इतिहासकार विल्यम डेलरिम्पन, आतीश तासीर, मीना कांदासामी, साकेत गोखले, पत्रकार आरफा खानम शेरवानी, कविता कृष्णन, अभिनेत्री स्वरा भास्कर आदींनी यात उत्साहाने पुढाकार घेतला. या आंदोलनाचा आयोजक असलेल्या शरजील याने तर उघड देश तोडण्याची भाषा वापरली. जाणूनबुजून अगदी लहान पोरांच्या तोंडून देश विरोधी आणि धार्मिक भावना भडकवणारी वक्तव्य करवली गेली. या सगळ्याचा उपयोग देशभरतात धार्मिक विद्वेष आणि देशविरोधी भावना वाढवण्यासाठी केल्या गेला, याचीच परिणीती २०२० ची दिल्ली दंगल आहे. या दंगलीत IB अधिकारी अंकित शर्मासह ५० पेक्षा अधिक बळी घेतले गेले. दिल्ली पोलिसांच्या तपासात आम आदमी पक्षाचा मुस्लिम नेता ताहीर हुसेन याने "पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया" या दहशतवादी संघटना आणि डाव्या विचारांच्या उमर खालिद सोबत या दंगलीचे संचालन केल्याचे समोर आले आहे. 

हे पुस्तक प्रकाशित झाले तर आपला देश विरोधी चेहरा लोकांच्या समोर येईल आणि आज पर्यंत आपण घातलेला संविधान प्रेमाचा बुरखा फाटेल ही भीती आता या डाव्या लिब्रांडूना सतावत आहे. आज पर्यंत हे लिंब्राडू अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अगदी देशविरोधी नक्षलवादी आंदोलनापासून काश्मीर मधील फुटीरतावादी चळवळींना पाठींबा देत होती आणि आहेत, मात्र आता राष्ट्रवादी विचारांच्या वाढत्या प्रभावाने आणि जनते समोर यांचे देशविरोधी मनसुबे उघड झाल्यामुळे यांचा जनाधार झपाट्याने खाली आला आहे. यावर मात करण्यासाठी आता हे डावे लिब्रांडू देशविरोधी इस्लामी दहशतवादी संघटनांना सोबत घेत आपला अजेंडा समोर रेटत आहे. शाहीनबाग आंदोलनाला मदत याच डाव्या विचारांच्या लिंब्राडूची होती. नेमके हेच वास्तव या पुस्तकातून बाहेर येईल याची जाणीव या लिब्रांडू जमातीला असल्यामुळे ही जमात या पुस्तकाच्या विरोधात उतरली आहे.

टिप्पण्या