नेपाळने चीनच्या नदी लागून आपल्या देश सोबत सीमा प्रश्न उभा करत डीचवले, नेमके तेव्हाच गेल्या दोन महिन्यांपासून चीन सीमेवर वाढलेल्या तणावाचा स्फोट झाला. आपल्या देशाच्या वीस जवानांचा मृत्यू झाला. देशात चीन आणि नेपाळ विरोधात वातावरण तापायला लागले.
भारताचे नेपाल बरोबर राजकीय संबंधापेक्षा पण जास्त सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध आहेत हे आपल्या लक्षातच राहिले नाही. अगदी "क्वोरा" सारख्या समाज माध्यमांवर नेपाळी करनाम्या मूळे, "भारत आणि नेपाळमध्ये युध्द झालं तर गोरखा रेजिमेंट कुणाला मदत करेल?" सारखे प्रश्न विचारला जाऊ लागला. खरे तर असले प्रश्न जरी देशप्रेमातून समोर येत असले, तरी असे प्रश्न विचारून आपण आपल्याच देशातील लोकांना परके करत आहोत का? असा प्रश्न समोर येतो.
"गोरखा" हा समाज मुख्यत्वे नेपाळ मधील आहे असे आपल्याला वाटत असले तरी भारतात पण गोरखा समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. तुम्हाला भारतातील आंदोलनांचा इतिहास माहीत असेल तर "सुभाष घिसिंग" आणि "गोरखा लँड" आंदोलनाला तुम्ही विसरू शकत नाही. देशातील सिक्कीम आणि पश्चिम बंगाल मधील तराई क्षेत्रात हे आंदोलन बरेच गाजले आहे आणि अजूनही सुरू आहे. पश्चिम बंगाल मधील जगप्रसिद्ध दार्जिलिंग हे या गोरखा समाजाचे आणि या "गोरखा लॅंड" आंदोलनाचे महत्वाचे क्षेत्र.
म्हणजेच गोरखा तितकेच भारतीय आहेत जितके तुम्ही आणि मी, ते तितकेच देशप्रेमी आहेत जितके तुम्ही आणि मी.
हे खरे आहे की भारताच्या तत्कालीन रॉयल ब्रिटिश सेनेत नेपाळ मधील पण गोरखा समाजाची भरती होत असे. मी चुकत नसेल तर आजही ब्रिटिश सेनेत गोरखा रेजिमेंट आहे आणि आजही त्या रेजिमेंट करता नेपाळ मधून ब्रिटिश सेना खास भरती प्रक्रिया राबवते. पण मला नाही वाटत की भारताला आपल्या सेनेच्या गोरखा रेजिमेंटच्या भरतीसाठी नेपळवर अवलंबून राहावे लागत असेल.
नेपाळ मधून काही भरती होत असेल तरीही, भारतीय सेनेचे प्रशिक्षण इतके व्यवसायिक आहे की नेपाळी गोरखांमध्ये तितकी व्यवसायिकता तितकीच भरली असेल की आपण शस्त्र नक्की कोणावर चालवत आहोत आणि कशा करता चालवत आहोत हे नक्कीच माहीत असेल.
तरीही भारतीय सेनेला अंतर्गत "बंड" कोणताही गाजावाजा होऊ न देता यशस्वी पणे थंड करायचा पण चांगलाच अनुभव आहे आणि अश्या कोणत्याही समस्येला भारतीय सेना नक्कीच योग्य पद्धतीने हाताळेल याची खात्री आहे.
हे झाले गोरखा किंवा वंशाने आणि सांस्कृतिक दृष्ट्या नेपाळी पण जन्माने भारतीयांच्या बाबतीत. पण चीन विरोधी रोष व्यक्त करतांना आपण आपल्याच देशाच्या उत्तर पूर्व भागातील नागरिकांना आपल्या अज्ञानातुन छळतो हे पण आपण लक्षात घेत नाही.
मणिपूर, नागालँड, त्रिपुरा येथील नागरिकांची चेहरापट्टी ही चिनी वंशाच्या लोकांशी मिळती जुळती असली तरी ते पण अस्सल भारतीयच आहे. होय, हे खरे आहे की बाह्य शक्तीच्या बहकाव्यात येत तेथील काही लोकांनी देश विरोधी कारवाया करायचा प्रयत्न केला होता आणि अजूनही काही प्रमाणात करतात. पण त्याचे प्रमाण फार नगण्य झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतरही राष्ट्रवादी विचारांच्या संघटनांनी या भागात सेवा कार्य करत , तेथील अनेकांना भारताच्या मुख्य प्रवाहात आणायचा प्रयत्न केला आणि आनंदाची गोष्ट अशी की त्या प्रयत्नांना चांगले यश पण गेल्या काही वर्षात मिळाले आहे. अश्या वेळेस आपण तेथील लोकांना आपल्या राज्यात, शहरात आपल्या अज्ञानातून वाईट वागणूक देऊ तर या "राष्ट्रवादी" संघटनांची सगळी मेहनत वाया जाईल.
तेव्हा चीन आणि नेपाळ विरोधात रोष नक्कीच दाखवा पण त्या करता आपल्याच नागरिकांना त्रास देऊ नका
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा