"राम जन्मभूमी मंदिर" - भूमिपूजनचा वाद कशाला ?

राम मंदिराच्या भूमीपूजनाची तारीख ठरली आणि अनेकांना उलट्या व्हायला सुरुवात झाली. अर्थात या उलट्या होणारच होत्या कारण हि उलट्या करणारी जमात भारतातील अशी जमात आहे कि, मक्का - मदिना मध्ये गैर इस्लामींना प्रवेश नाही म्हणून ठीक आहे, नाही तर सैतानाला दगड मारायला होणाऱ्या चेंगराचेंगरीत पहिले नाव यांचेच आले असते. त्याच मुळे अपेक्षे प्रमाणे पहिला आवाज राज्यातून निघाला. शरद पवार यांनी,"मंदिर बांधून कोरोना जाणार का?" असा प्रश्न विचारत ठिणगी टाकली.

पण शरद पवार आणि देशातील तमाम तथाकथित पुरोगाम्यांचे खरे दुखणे हे आहे की, कायदेशीर रित्या आता कोणत्याही पद्धतीने राम मंदिर बांधकाम हे लोक थांबवू शकत नाही. मग लोकसत्ता सारखे वृत्तपत्र खोडसाळ पणे "बाबरी मशिदीच्या जागेवर" अशी सुरवात करत भूमीपूजनाची बातमी देणार आणि शरद पवार सारखे नेते अशी वक्तव्ये!

आधी पवार वक्तव्य करणार आणि संध्याकाळ पर्यंत त्यांच्या पक्षातील हुसेन दलवाई मात्र पंतप्रधानांनी या भूमीपूजनाला उपस्थित राहू नये असे आवाहन करणार आणि त्या करता नेहरूंचा सोमनाथ मंदिराच्या बाबतीतील पुरावा समोर करणार.

पण लक्षात घ्या...राम जन्मभूमी मंदिर प्रकरण हे जगातील सगळ्यात मोठ्या संघर्षानंतर मिळालेला न्याय आहे. बाबरने मंदिर पाडून, बांधकाम करून सुद्धा त्यावर हक्क प्रस्थापित करू शकला नाही, कोणीही कितीही त्या बांधकामाला "बाबरी मशीद" म्हणून नाचले तरी कायदेशीर रित्या ते बांधकाम हे "विवादित ढाचाच" राहिले. आपल्या ज्ञात-अज्ञात पूर्वजांनी वेगप्रसंगी आपले रक्त सांडत हिंदूंचा दावा त्या जागेवर पक्का ठेवला होता. त्यांनी फक्त मंदिराचे बांधकाम पाडले, पण मंदिर कायम होते....नवीन बांधकाम केले पण ते बांधकाम कधीच मशीद झाली नाही हे खरे वास्तव होते.

अजून महत्वाचे म्हणजे याच राम जन्मभूमी करता आवाज उठवत भाजप सत्तेत आला हे खरे आहे. हेच विरोधक काही वर्षांपूर्वी भाजप वर सत्ते करता राम जन्मभूमीचा वापर करतो असा आरोप करत होते, कारण भाजप आपल्या प्रत्येक जाहीरनाम्यात राम मंदिर बांधण्याचे आश्वासन देत होता. "मंदिर वही बनायेगे, पण तारीख नही बतायेगे" सारख्या घोषणा देत भाजप आणि हिंदुत्ववाद्यांना खिजवत होते, पण आज खजील व्हायची पाळी विरोधकांची आहे. त्यातही भूमिपूजन सरकारी कार्यक्रम नाही तर "रामजन्मभूमी न्यासाचा" कार्यक्रम आहे, भाजपने आपले राजकीय भविष्य या वादात पणाला लावले होते, म्हणून सध्या भारताच्या पंतप्रधानपदावर असणाऱ्या नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे, भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी हे निमंत्रण स्वीकार करणे आवश्यक आहे कारण हा देशातील जनतेला निवडणूक जाहीरनाम्यात वचन दिलेले एक महत्वाचे काम पूर्ण होत आहे.

काय आहे की, जाळीची टोपी घालून इफ्तार पार्टी करून समाज एक होतो ही जशी अंधश्रद्धा आहे, तशीच चायनीज कोरोना विषाणू काळात रमजान मध्ये सकाळी तीन ते दुपारी बारा सूट देऊन किंवा आता बकऱ्याची कुर्बानी देऊन पण कोरोना जाईल ही पण अंधश्रद्धाच नाही का? हे पण राज्यात सरकार चालवत असलेल्या शरद पवार यांनी लक्षात घ्यायला हरकत नाही.

टिप्पण्या