यालाच म्हणतात पुरोगयामांची वैचारिक प्रेश्यागिरी

मराठी बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात "माझ्या देशावर माझे प्रेम आहे" या धड्यात ज्या देशाच्या स्वातंत्र्या करता फासावर जाणाऱ्या क्रांतिकारकांची नावे घेतांना "भगतसिंग, राजगुरू आणि कुर्बान हुसेन" अशी नावे घेतली आहे आणि नवीन वाद निर्माण झाला आहे. इथे महाराष्ट्रातीलच अनेकांना "कुर्बान हुसेन" नक्की कोण ? हे माहीत नाही, तर देशातील लोकांना या बद्दल माहिती असण्याचे कारण पण नाही. पण या वादामुळे स्वयंघोषित पुरोगामी कसा वैचारिक गोंधळ घालतात याचा उत्तम नमुना आहे.

या धड्याच्या सुरवातीला दिलेल्या पाठ्य परीचयात सदर उतारा प्रसिद्ध संपादक आणि साधना साप्ताहिकाचे संपादन करणारे यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा पुस्तकातून घेतल्याचे सांगितले आहे. पहिलेच नमूद करणे आवश्यक आहे की मी स्वतः हे पुस्तक वाचलेले नाही, त्या मुळे त्यात पण याच प्रकारे क्रांतिकारकांची नावे आली आहेत का हे माहीत नाही, पण अश्याच पद्धतीने ही नावे यदुनाथ थत्ते यांनी दिली असतील तर पापाचे भागीदार ते पण आहेत यात काही वाद नाही.

खरे तथ्य हे आहे की भारताला भगतसिंग - सुखदेव - राजगुरू ही क्रांतिकारक त्रिमूर्ती देशासाठी हसत हसत फासावर चढणारे क्रांतिकारक म्हणून प्रसिद्ध आहे. भारताच्या संसदेत बॉम्ब फोडण्यासोबतच लाला लजपत राय यांच्यावर अमानुष लाठीमार करत त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सहायक पोलिस अधीक्षक जे पी सॅडर्स यांच्या खुनाचा गुन्हा त्यांच्या डोक्यावर होता. विशेष लक्षात घेण्याचा मुद्दा हा की या तिघांनी पण आपले ब्रिटिश सरकार विरोधातील कोणतेही कृत्य हे अचानक किंवा कोणत्याही तत्कालीन कारणाने केले असे नाही, तर या तिघांनी अगदी नियोजनबद्ध रीतीने ब्रिटिश सरकार विरोधात पावले उचलली होती, तेही परिणामांची कोणतीही चिंता न करता! भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा जाहीर झाल्यावर आणि या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यावर संपूर्ण देशात ब्रिटिश सरकार विरोधात रोष उत्पन्न झाला होता, या रोषाचा ओघ तत्कालीन स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांविरोधात खास करून महात्मा गांधी यांच्या विरोधात पण गेला होता. याची परिणीती म्हणूनच महात्मा गांधी यांची इच्छा नसतांना त्यांना "संपूर्ण स्वराज" चा नारा द्यावा लागला होता.

अर्थात या धड्यात नाव आलेले कुर्बान हुसेन या महाराष्ट्रातील सोलापूर शहरातील सुपुत्र देखील फाशी दिल्या गेले होते. पण माझ्या माहिती प्रमाणे सोलापुरात कुर्बान हुसेन यांच्या सोबतच अजून तिघे फासावर चढले. ५ मे १९३० साली महात्मा गांधी यांना अटक केल्यावर सोलापुरात आयोजित सरकार विरोधी आंदोलन हिंसक झाले होते. त्या नंतर तीन दिवस सोलापुरातील परिस्थिती हाताबाहेर होती. याचा ठपका शहरातील स्थानीय वृत्तपत्र संपादक कुर्बान हुसेन यांच्या सोबतच मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा आणि जगन्नाथ शिंदे यांच्या वर पण आला, यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. या फाशी विरोधात अगदी प्रिव्ही कौन्सिल पर्यंत प्रयत्न केला गेला पण फोल ठरला. या सगळ्या फाशी विरोधातील प्रयत्नात केसरीचे तत्कालीन संपादक तात्यासाहेब केळकरांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखे बडे नेते समाजसुधारक पण अग्रेसर होते. मात्र दुर्दैवाने यांच्या प्रयत्नांना फळ आले नाही आणि कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा आणि जगन्नाथ शिंदे यांना १२ जानेवारी १९३१ रोजी पुणे येथील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.

आता वरील सगळी माहिती वाचल्यावर या तथाकथित पुरोगाम्यांचा वैचारिक प्रेष्येपणा तुमच्या लक्षात आला असेलच. यात क्रांतीकारकांना फाशी देण्यात आली असली तरी घडलेल्या घटना, त्याचे परिणाम आणि घटनांमगील कारणे सर्वार्था वेगळी होती. सोबतच भगतसिंग - सुखदेव सोबत राजगुरू यांचे नाव ने घेणे जसा हा राजगुरू यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. तसेच सोलापूर घटनेत हुतात्मा म्हणून फक्त कुर्बान हुसेन यांचे नाव घेत इतर मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा आणि जगन्नाथ शिंदे यांच्यावर पण अन्याय करण्यासारखे नाही का? तरी अजून वाचन करता अजून एक आरोप वाचण्यात येतो की कुर्बान हुसेन यांचा या प्रकरणात सक्रिय सहभाग नसतांना पण कोण्या खान साहेब इमाम नावाच्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने खोटी साक्ष देत यांचे नाव या प्रकरणात गोवण्यात आले होते, पण वादाचा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा आणि जगन्नाथ शिंदे यांचे देशासाठी जीवदान करणे कमी नाही, विशेषतः हे चौघे पण सक्रिय जरी नसले तरी काँग्रेस आंदोलनात वेळोवेळी सहभागी होत देशभक्ती दाखवत होतेच.

आपली वैचारिक भूमिका लोकांच्या माथी मारण्यासाठी घटना आणि परिणाम लक्षात न घेता आपल्या वैचारिक प्रेष्येपणा साठी हवी तशी मांडणी करत लोकांच्या मनात संभ्रम तयार करणे ही यांची खासियत आहे. "ब्राम्हणाची तयारी शेंडी पासून" या उक्ती प्रमाणे यांचे कामही चालते. नवीन पाठ्य पुस्तकात हा धडा आल्यावर यावर वाद होतील हे माहीत असल्यामुळेच असेल कदाचित पण विकिपीडिया वर पण २०१८ मध्ये कुर्बान हुसेन यांची माहिती टाकण्यात आली, ती पण या प्रकरणातील उर्वरित तीन नावे वगळून!

तेव्हा या तथाकथित पुरोगाम्यांच्या, समाजवाद्यांच्या, साम्यवाद्यांच्या या वैचारिक प्रेष्येगिरीचा जोरदार विरोध करा आणि पाठ्यपुस्तकात योग्य बदल करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवा.


संदर्भ:

पुंडे, नीलकंठ (प्रथम आवृत्ती , मार्च २००९). मार्शल लॉ आणि सोलापूरचे चार हुतात्मे. सोलापूर: सुविद्या प्रकाशन. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

R. K. Paralkar : Solapur under martial law, A thesis submitted to Marathwada University, 1978

टिप्पण्या

  1. इतिहास खरा न लिहीता सोईने लिहीला जातो की काय असे वाटते.. नवीन माहिती कळली..चांगला लेख...

    उत्तर द्याहटवा
  2. भारताचा इतिहास स्वातंत्र्यानंतर सोईनेच लिहल्या गेला. यात "ऐतिहासिक मूल्या" पेक्षा "वैचारिक मूल्ये" अधिक होती जी सत्याशी प्रतारणा करणारी ठरली.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा