काल नेपाळचे पंतप्रधान के पी ओली शर्मा यांनी भारताचे आराध्य दैवत श्रीराम भारतात नाही तर नेपाळ मध्ये जन्माला आल्याचा आणि खरी अयोध्या भारत दावा करतो तशी भारतात नसून नेपाळमध्ये असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली.
अनेक भारतीय हिंदूंनी ओली शर्मा यांनी केलेल्या आर्तक्य दाव्यावर भारतीय हिंदूंनी येथेश्च चेष्टा केली, मी पण त्यातच जमा आहे. पण जरा विचार करा या मागे साम्यवादी विचारसरणीच्या ओली शर्मा यांना एकाएकी एकदम श्रीरामाच्या जन्मस्थळा वर दावा का केला असेल?
तसे तर भारतातील श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचा इतिहास हा १५२८ पासून म्हणजेच, जेव्हा आक्रमक बाबरने मंदिर तोडून तेथे विवादित ढाचा बांधला. तेव्हा पासून सुरू होत असला तरी, भारतीय राजकारणात या आंदोलनाने साधारण १९८९ पासून उलथापालथ केली. खरे तर बाबरने राम मंदिर तोडून तेथे बांधलेला ढाचा तिथे कधीही दुसऱ्या धर्माची धार्मिक कर्मकांडे कधीच झाली नव्हती. पण मुस्लिम लांगूचालन करणाऱ्या काँग्रेस आणि वामपंथी पक्षाने मात्र त्याला जबरदस्ती "बाबरी मशीद" संबोधत होते.
आंदोलन जसे उग्र स्वरूप धारण करत गेले तसे तसे काँग्रेस आणि वामपंथी पक्षाने हिंदूंची दिशाभूल करायला सुरुवात केली. पहिले तर विवादित ढाचाच्या ठिकाणी मंदिर नव्हतेचचा दावा करायला सुरुवात केली होती, जेव्हा तिथे मंदिराचे अवशेष सापडले तेव्हा तिथे मंदिरा सोबतच इतरही धर्माच्या प्रार्थना स्थळाचे पुरावे सापडल्याच्या अफवा पसरवायला सुरवात केली. जेव्हा यांचे हे दावे आणि अफवा याचा हिंदू मनावर काहीच परिणाम झाला नाही तेव्हा मात्र श्रीराम काल्पनिक कथा असल्याचा दावा करत हिंदूंच्या आस्थेवरच घाव घालायचा प्रयत्न केला.
याच सगळ्या अफवा, खोटेपणा याचा आधार घेऊन सुद्धा कायदेशीर रीत्या पण ही दुकली ना हिंदूंचा हक्क मारू शकली, ना हिंदूंचा धार्मिक मानभंग करू शकली ! या दुकलीच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदू एकीने यांचे सगळे मनसुबे धाराशायी केले.
पण वामपंथी वैचारिक बैठक अशी चूप बसणारी नाही. आज जेव्हा नेपाळी वामपंथी ओली शर्मा यांनी अयोध्या नेपाळमध्ये असल्याचा आणि श्रीराम नेपाळ मध्ये जन्माला आल्याचा दावा करत आहे तेव्हा आपल्या देशातील वामपंथी चूप बसणार नाही. आता ते पुन्हा श्रीरामाच्या हिंदूंच्या आस्थेबद्दल हिंदूंचा मानभंग करायला सुरुवात करतील. या साम्यवादी तथाकथित अभ्यासकर्त्यांना साथ द्यायला काँग्रेसी असतीलच.
तेव्हा ओली शर्माची जितकी मजा घ्यायची तितकी घ्या, जितकी उडवायची तितकी उडवा, मात्र हे करतांना आपल्या श्रद्धा स्थाना बाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या या वामपंथी विचारधारेच्या ओली शर्मा याला जितक्या जागतिक मंचावरून होता होईल तितका उग्र विरोध करा, लक्षात घ्या हे फक्त भारत सरकारचे काम नाहीये, तर आपले म्हणजेच हिंदूंचे कर्तव्य आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा