भारताच्या सुरक्षेचे तीनतेरा - भाग ६

आज जेव्हा काँग्रेस विचारते की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इतर पक्षांचे योगदान काय? तेव्हा काँग्रेस हे विसरते की जे काही भारतात छोटे मोठे पक्ष संघटना त्या काळात होते त्यांनी काँग्रेस नेतृत्वातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. त्या काळातील काँग्रेस ही खरोखर मध्यममार्गी होती असे म्हणायला हरकत नाही. तत्कालीन काँग्रेसवर समाजवादाचा पगडा होता, सोबतच सौम्य हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी साम्यवादी यांचा आवडता पक्ष हा काँग्रेसच होता. त्या मुळे काँग्रेस अंतर्गत तसे गट तट पण पडले होते.

पण स्वातंत्र्या नंतर मात्र राजकारण बदलले, नेहरू स्वतःला वैचारिक दृष्ट्या समाजवादी दाखवत असले तरी साम्यवादाच्या प्रेमात पडले होते. त्याच्या अत्यंत जवळचे कृष्ण मेनन हे डाव्या विचारसरनिवाले ! त्याच मुळे तत्कालीन काँग्रेसमध्ये डाव्या विचारांच्या कंपू सत्तेच्या जवळ असल्याने बराच वरचढ झाला होता. सोबतच या काळात देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून देशात नेहरूंच्या मागे जनतेचा भावनिक पाठींबा होता. या परिस्थितीत काँग्रेसमध्ये नेहरू विरोध करायला कोणीही धजवत नव्हते आणि विरोधी पक्षाच्या विरोधाला नेहरू जुमानत नव्हते. हे चित्र बदलायला देशाला मोठी किंमत चुकवावी लागली, काश्मीर प्रश्नी जागी न झालेली जनता, १९६२ नंतर मात्र खडबडून जागी झाली आणि १९६२ नंतर नेहरूंना लोकशाहीची पहिली उणीव लक्षात आली, ती म्हणजे नेतृत्व टिकवून ठेवायला आवश्यक असलेले बहुमत! 

 

नेहरूंनंतर पंतप्रधान झाले ते लालबहादूर शास्त्री! शास्त्रीजिंनी नेहरूंच्या मंत्रिमंडळात पण वेगवेगळी मंत्रालय सांभाळली होती. उत्तर प्रदेशात गोविंद वल्लभ पंत सारख्या मातब्बर नेत्याच्या हाताखाली तयार झालेले नेते होते शास्त्रीजी! पण या मुळे कोणालाही वाटत असेल की नेहरूंना उत्तराधिकारी म्हणून तेच अपेक्षित होते तर ते चूक आहे. 

उलट नेहरूंनी "कामराज योजना" पुढे आणत काँग्रेस मधील वयोवृद्ध, अनुभवी आणि राजकीय आकांक्षा असलेल्या नेत्यांना संघटनेचे काम करा किंवा घरी बसा असा पर्याय दिला होता. या "कामराज योजने" अंतर्गत तत्कालीन काँग्रेस मधील मोठे प्रस्थ आणि नेहरूंना टक्कर देऊ शकेल असे मोरारजी देसाई, लालबहादूर शास्त्री यांच्या सारख्या डझनभर नेतृत्वाला शर्यतीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. कोणासाठी? तर आपल्या प्रिय मुलींसाठी ! इंदिरा गांधी यांच्या साठी !

 

पण १९६२ च्या चिनी आक्रमणानंतर परिस्थिती पालटली आणि नेहरूंना आपल्या अनेक राजकीय निर्णयांना मुरड घालावी लागली. तरी आपल्या शेवटच्या आजारपणात नेहरूंच्या वतीने त्यांचे काम इंदिरा गांधी सांभाळत होत्या, खरे तर ते काम शास्त्रीजींनी सांभाळावे असे काँग्रेस मधील अनेकांना वाटत होते. 

 

पण नेहरू वारल्यावर पंतप्रधान कोण? हा प्रश्न समोर आला, मोतीलाल व्होरा इंदिरा गांधी यांचे नाव समोर करत होते, मात्र मोरारजी देसाई आक्रमक पणे समोर आले पण कर्मठ गांधीवादी आणि समाजवादी मोरारजी कोणालाच नको होते, तर इंदिरा गांधी अनुभव हीन आहे असे मत पडल्यामुळे माळ लालबहादूर शास्त्री यांच्या गळ्यात पडली. शास्त्रीजी समाजवादी विचाराचे राष्ट्रवादी होते. याचा पहिला असर झाला तो काँग्रेस मधील साम्यवादी गटावर ! ते सत्तेच्या वर्तुळातून बाहेर फेकल्या गेले. त्याचा असर सरकारच्या ध्येय धोरणात दिसायला लागला. एकीकडे इंदिरा गांधी यांचे नेतृत्वाची तहान आणि साम्यवादी गटाची पुन्हा सत्तेच्या वर्तुळात यायची धडपड यात भारतीय राजकारण समोर जायला लागले. काँग्रेस मधील गटातटाचे राजकारण वर आले याच काळात. यातूनच मग शस्त्रीजींचे नेतृत्व दुबळे असल्याच्या वावड्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय राजकारणात पसरवल्या जाऊ लागल्या. त्याचे परिणाम काय झाले ते आपण १९६५ च्या लढाईच्या लेखात बघितले.  पण १९६५ च्या युद्धाने भारताच्या जनतेला सक्षम राष्ट्रवादी नेतृत्व मिळाल्याचा साक्षात्कार झाला. शास्त्रीजींची लोकप्रियता वाढायला लागली, पण हे सगळे खुपणारे अनेक काँग्रेसमध्ये होते. 

 ही होती काँग्रेसमध्ये असणाऱ्या साम्यवादी विचारांकडे झुकलेल्या कांपुची सुरवात, इंदिरा गांधीच्या काळात साम्यवादी विचार कसे फोफावले याचा मागोवा घ्यायचा, काँग्रेस मधील घरणेशाहीच्या मानसिकतेचा मागोवा घ्यायचा तर खोलात न जाता वरवर निदान इतका इतिहास तरी आपल्याला माहीत पाहिजे. पुढच्या लेखात आपण बघू इंदिरा गांधी यांचे साम्यवादी प्रेम!


टिप्पण्या


  1. समर्पक लेख आणि इतिहास, राजकारण याचे भान ठेवून लिहीला आहात.
    शास्त्रीजी कॉंग्रेसमधील दोनचार सोडल्यास कोणालाच नको होते. १९६५ च्या युद्धात त्यांनी त्यांचा कणखरपणा, नेतृत्ववगुण दाखवून दिले. देशात त्यांची लोकप्रियता वाढली, अशाने इंदिरा गट आणि साम्यवादी अस्वस्थ झाले असणार. युद्ध जिंकूनसुद्धा जेत्यासारखा तह न करण्यासाठी शास्त्रीजींवर दबाव आला असणार पण तो कोणाकडून? रशिया? की पक्षातील विरोधक? कारण असे सांगतात की ताश्कंद करार हा पाकिस्तानलाच फायद्याचा होता, आपण त्यावर अभ्यास केला असेलच, त्यावर पण भाष्य केल्यास बरे होईल.
    पण या सगळ्याचा दबाव शास्त्रीजींवर होता म्हणून त्यांना हार्टअँटँक आला का? की त्यावेळी शास्त्रीजींवर विषप्रयोग झाला, त्यांचा आचारी तेंव्हापासून गायब आहे अशा बातम्या पसरल्या होत्या त्या खऱ्या होत्या? काही असेल पण त्यामुळे इंदिरा गांधीचा मार्ग सुलभ झाला आणि म्हणून अजूनही त्यावेळचे कळत्या वयातील लोक अजूनही शास्त्रीजींचा खूनच होता असे सांगतात.

    उत्तर द्याहटवा
  2. शास्त्रीजींचा मृत्यू संशयास्पद आहे तो याच साठी....आता तुम्हाला इंदिरा गांधी यांचे काँग्रेस मधील भांडण, गांधी परिवाराचे काँग्रेसवर वर्चस्व आणि मुख्य म्हणजे छुप्या आणि उघड डाव्यांचा शासनातील सहभाग लक्षात येईल.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा