दहशतवादी, माथेफिरू आणि गुन्हेगार



समाजात दहशत असते ती तीन प्रकारच्या लोकांची! यातील पहिला प्रकार भारतात ओळखतात दहशतवादी, आतंकवादी, नक्षलवादी म्हणून!

पण दहशतवादाची व्याख्या नक्की काय? आपण दहशतवादी कोणाला म्हणतो? तर, "आपल्या धार्मिक आणि राजकीय मागण्या पूर्ण करण्यासाठी वैचारिक बैठकीचा वापर करत नियोजित आणि संघटित पणे हिंसात्मक कृती करत समाजातील मोठ्या समूहाला प्रताडीत करणे, दहशतीखाली ठेवणे या कृतीला दहशतवादी कृत्य आणि हे कृत्य नियोजित पणे पूर्णत्वास नेणाऱ्या समूहाला दहशतवादी, आतंकवादी म्हंटल्या जाते." खरे तर दहशतवादाची ही खरी व्याख्या आहे. पण दुर्दैवाने आपापल्या वैचारिक दहशतीखाली लोकांना ठेवण्याची ज्यांना सवय झाली आहे त्यांना ही व्याख्या पसंत नाही म्हणून अजून याला "अधिकृत" अशी मान्यता नाही. पण दहशतवाद आणि दहशतवादी यांच्या मागे बरीच मोठी आघाडी समाजातील वेगवेगळ्या टप्प्यात काम करत असते. कधी उघड - तर कधी छुपे पणाने या दहशत पसर्वणाऱ्या विचारधारेचे समर्थक दहशतवाद्यासाठी काम करत असतात. यात मुख्यतः नियोजन करणारे, तत्वज्ञानाची बैठक देणारे वैचारिक नेहमीच उच्च शिक्षित असतात, तर मुख्य दहशतीचे कृत्य करणारे अशिक्षित, गरीब, शिक्षित असले तरी भावनिक असतात.

दुसरा प्रकार असतो "माथेफिरू"! 

खरे तर हे शिक्षित, वैचारिक असतात, यांच्या तीव्र भावना एखाद्या घटनेवर अनावर होत असतात. अश्याच अनावर क्षणी ते दुष्कृत्य करतात, एखाद्याचा खून करतात, मारझोड करतात, बलात्कार करतात, हे कृत्य करण्यामागे कधी धार्मिक कारण असते, कधी वैचारिक कारण असते, तर कधी राजकीय पण असू शकते, मुख्य म्हणजे कृत्य का केले ? या प्रश्ना साठी त्यांच्या जवळ तत्वज्ञानाने युक्त अशी वैचारिक बैठक असते, त्या मुळे कृत्य का केले हे पटत असले तरी केलेले कृत्य विवेकात बसत नाही, त्या मुळे समाजाचा प्रतिसाद अल्प किंवा नसतोच. साधारण २-४ जणांचा वैचारिक समूह किंवा एखादा वैचारिक विद्वान अशी "माथेफिरू" कृती करतो. 

तिसरा प्रकार असतो "गुन्हेगार"!

 टोळी बनवून खून, खंडणी, दरोडे घालणारे दहशत पसरवत असले तरी त्याला कोणतीही वैचारिक बैठक नसते, असते फक्त लालसा पैसे कमवायची आणि त्या पैशातून येणाऱ्या अधिकाराची भलेही मग रस्ता कितीही चुकीचा असो, याला म्हणतात "संघटित गुन्हेगारी" आणि यात असतात गुंड, बदमाश, मवाली कधी हे शिक्षित असतात कधी अशिक्षित. मुख्य म्हणजे यांचे लागेबांधे राजनैतिक लोकांशी असतात, दोघेही एकमेकांची मदत घेत असतात, एकमेकांना मदत करत असतात पण या मागे हिशोब असतो शुद्ध नफ्याचा! यात कोणतीही वैचारिक बैठक किंवा तत्वज्ञान नसते.
पण आपल्या देशात धार्मिक आणि राजकीय विचारधारेला वाहिलेले वैचारिक दहशतवादी मात्र आपली वैचारिक पिंक टाकून सामान्य जनतेची सतत दिशाभूल करत राहतात. मग त्यातून "भारत तेरे तुकडे होंगे" सारखे देशद्रोही घोषणा देणारे हे अन्यायाच्या विरोधात लढणारे म्हणून समोर आणले जातात, आपले राजकीय वैचारिक विरोधी आहेत म्हणून देशभरात गरीब आदिवासी, वंचितांचे खून पाडत हिंडणारे मात्र गरीब-वंचितांसाठी आवाज उठवणारे असतात, देशाच्या संविधाना अंतर्गत स्थापित सर्वोच्च संसद भावनावर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूच्या फाशीला "न्यायिक खून" म्हणणारे मात्र संविधानाचे रक्षक असतात आणि शहरात तेरा बॉम्बस्फोट करत हजारो निरपराध लोकांना मारणाऱ्या याकूब मेमन याला फाशी दिल्या नंतर त्याच्या अंत्ययात्रेला जमणारा जमाव हा याकूबच्या समर्थनासाठी नसतो, काश्मीर मध्ये धार्मिकतेच्या नावावर शत्रूराष्ट्राच्या मदतीने विरुद्ध धर्माच्या लोकांना मारणारा, देशाच्या लष्कराच्या जवानांचे जीव घेणाऱ्या बुरहान वाणी हा पीडित असतो, गरीब शिक्षकाचा मुलगा असतो, मुख्य म्हणजे या सगळ्यांच्या मागे धार्मिक वैचारिक समूहशक्ती असतो तरी आपण त्यांना दहशतवादी, आतंकवादी, नक्षलवादी म्हणायचे नाही. त्यांची निर्भरसना करायची नाही.
पण हे वैचारिक दहशतवादी मात्र कोणत्याही जाती, धर्माच्या, वैचारिक बैठकीच्या समूहाला दहशतवादी म्हणू शकतात. पण धर्माचे संस्कार असे असतात की चुकीची वागणूक करणाऱ्या, खून करणाऱ्या, अधर्म करणाऱ्या लोकांच्या मागे कुणी उभे राहत नाही, मग तो पोटचा मुलगा का असेना!

टिप्पण्या