गृहमंत्री अमित शहा यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील कार्यकर्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली, त्या बैठकी मध्ये सरकारने आजपर्यंत केलेल्या कामात पाकव्याप्त काश्मीर मध्ये केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि थेट पाकिस्थान मध्ये केलेल्या एअर अटॅक बद्दल सांगितल्यामुळे काँग्रेसचे कोणतीही जवाबदारी नसलेले प्रमुख नेते खासदार राहुल गांधी यांना त्रास होणे सहाजिकच होते. तिकडे पाकिस्थान सुद्धा असा हल्ला भारताकडून केल्या गेला म्हणून आडुन कबूल करत असतांना काँग्रेसी नेते मात्र या हल्ल्याचे पुरावे मागत आपल्याच देशाच्या सेना दलावर शंका घेत होते. आपल्या याच त्रासातून राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर खात्या वरून वरील शयरीचा आधार घेत सध्याच्या चीन सोबत सुरू असलेल्या तनावाबाबत सरकारवर विनोद करायचा प्रयत्न केला.
अर्थात गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सरकारवर चीन सीमा विवाद प्रकरणावर घेरण्याचा सतत प्रयत्न करत आहे. पण मुळातच भारताच्या पाकिस्थान आणि चीन सोबत सुरु असलेल्या विवादाची सुरवातच चुकीच्या मानसिकतेच्या काँग्रेसी सरकार पासून सुरू होत, पुढे त्या चूका कायम ठेवणाऱ्या काँग्रेस सरकार पर्यंतच येते, या मुळेच राहुल गांधी यांचे ट्विट बालिश प्रकार वाटतो.
फार जुनी गोष्ट नाहीये पण तारीखच द्यायची झाली तर ८ जुलै २०१७ राहुल गांधी यांनी दिल्लीस्थित चिनी दूतावासाच्या सदिच्छा भेट दिली होती. बरे इतर वेळेस दिली असती तर काही हरकत नव्हते पण त्याच वेळी भारत चीन सीमेवर डोकलाम सारख्या भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाच्या भागात चीन लष्करी आगळीक करायचा प्रयत्न करत होता. त्या पाई भारत आणि चीन दरम्यान प्रचंड तणाव होता. चीन रोज भारताला आपल्या लष्करी सामर्थ्याच्या धमक्या तर देतच होता पण सोबत १९६२ च्या भारत चीन लढाईतील पराभवाची सतत आठवण करत भारतीय सरकार, सेना आणि जनतेचा अपमान करत होता.
जेव्हा भारतीय वृत्तवाहिन्यांनी राहुल गांधी यांच्या या चिनी दूतावासाच्या सदिच्छा भेटीचे वृत्त दिले तेव्हा सगळ्यात पहिले बातमीचे खंडन काँग्रेस कडून करण्यात आले. चिनी दुतावासाने जेव्हा त्याच्या अधिकृत वेबसाईट वर या राहुल गांधी भेटीचे वृत्त दिले तरी या वर काँग्रेसचा नन्ना चा पाढा तर कायम होता पण नंतर काय कळ फिरली काय माहित पण चिनी दूतावासाच्या वेबसाईट वरून ती बातमी काढल्या गेली. पण "सोशल मीडिया" वर त्या चिनी वेबसाईट चे स्क्रीन शॉट व्हायरल झाले आणि त्या मुळे मीडियाचा दबाव वाढला तेव्हा कुठे जाऊन काँग्रेसने मान्य केले की अशी भेट झाली म्हणून.
खरे तर विरोधी पक्षाच्या नेत्याने वादाच्या प्रसंगी दूतावासात जाऊन अशी भेट घेणे चुकीचे अजिबात नाही, उलट भारतासारख्या लोकशाहीवादी देशात हेपरिपक्व लोकशाहीचे प्रतीकच मानल्या गेले असते. पण गदारोळ या करता झाला कि या भेटी बाबत किंवा दूतावासातील चर्चेतील संभाव्य मुद्द्याबाबत भारत सरकारशी कोणतीही चर्चा काँग्रेसने किंवा राहुल गांधी यांनी केली नव्हती. पण या भेटी नंतर लगेच चीनने “काश्मीर मार्गे” भारतात घुसायची दिलेली धमकी त्या मुळे राहुल गांधी यांची ती लपत छपत केलेली “चीनी दूतावासाची सदिच्छा भेट” संशयास्पद नक्कीच होती. त्यामुळेच हि भेट कोणत्या सबबी खाली घेतल्या गेली? या भेटीचा भारत देशाला नक्की काय फायदा झाला ? हि भेट होणार आहे याची भारत सरकारला कॉंग्रेस पक्षाने दिली होती का ? या मुख्य मुद्द्यांना कॉंग्रेसने उत्तर द्यायचे टाळले होते पण आज पर्यंत पण दिले नाहीये.
२००८ मध्ये चीन जवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ जगातील सगळ्यात उंच दौलतबेग ओल्डी लष्करी विमानतळ सुरू झाले होते. खरे तर २००८ मध्ये काँग्रेस प्रणित सं.पु.आ. सरकार सत्तेत होते, त्यांनी पण आपल्या या कर्तृत्वाचा गाजावाजा करायला कोणाचीच काही हरकत नव्हती. जगातील सगळल्यात उंच भागात असे विमानतळ सुरु करणे हे आपल्या सेनेच्या आणि भारताच्या अभियांत्रिकी क्षेत्रात अभिमानाचा क्षण होता. पण सं.पु.आ. सरकारने तसे काही केले नाही, याचे कारण कामाचे श्रेय न घेण्याचा मोठेपणा नक्कीच नव्हता. पण भारतीय वायू दलाच्या माजी उप्रमुख पी के बरबोरा यांचे खरे मानायचे तर दौलतबेग ओल्डी लष्करी विमानतळ सुरू झाले तर चीनला आवडणार नाही म्हणून तत्कालीन सं.पु.आ. सरकार उदासीन होते. सं.पु.आ.सरकारने २००८ च्या आधी भारतीय वायू सेनेने हा विमानतळ सुरु करण्याचा केलेला प्रयत्न पाच वेळा हणून पडला होता. लडाख क्षेत्राच्या दुर्गम सीमावर्ती भागाला जोडणारे चांगले रस्ते नसल्याने शांतता काळात आणि तणावाच्या काळातही सैन्याला जलद रसद पुरवठा करायला होणारा त्रास वाचवायला आणि शत्रूवर वचक राहावा म्हणून हा विमानतळ बांधण्यात आला होता, पण सं.पु.आ. सरकार सेनेला हा विमानतळ वापरायलाच आडकाठी करत होते.
शेवटी २००८ मध्ये दौलतबेग ओल्डी लष्करी विमानतळावर सरकारच्या परवानगीची वाट न पाहता आपले लष्करी सामुग्री वाहून नेणारे विमान उतरवत या तळाचा वापर सुरु केला. तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटनी यांनी या विमानतळावर लष्कर आणि वायुदलांनी परस्पर वाहतुक सुरू केली म्हणून आगपाखड केली होती. हि माहिती जर खरी असेल तर हा विमानतळ न वापरता तसाच पडू देण्यात नेमका कोणाचा फायदा होता ? याचे उत्तर आता काँगेसने द्यायला हवे.
हे सगळे झाल्यावर पण २०१८ मध्ये राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाच्या सॉफ्ट हिंदुत्ववादी छवीला मोठे करण्यासाठी कैलास मानसरोवर या चिनी भागात असलेल्या हिंदूंच्या तीर्थक्षेत्राची यात्रा केली. अर्थात यातही वावगे असे काही नाही, पण काँग्रेसचे या नेत्याने या यात्रेच्या आड पण चिनी उच्च अधिकारी आणि नेत्यांसोबत चर्चा आणि बैठका घेतल्याच्या, किंबहुना स्वतः राहुल गांधी बीजिंगला गेल्याच्या बातम्या यायला लागल्यावर हि यात्रा पण वादाच्या भोवऱ्यात अडकली. मग काँग्रेसतर्फे समाज माध्यमांवर राहुल गांधींच्या यात्रेचा पुरावा म्हणून काही छायाचित्र प्रसारित मूळ वादालाच बगल दिली, पण उचलल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तरे काही दिल्या गेली नाही.
तेव्हा राहुल गांधी यांनी चीन विषयी बोलतांना, सरकारवर विनोद करतांना थोडा विचार करावा, आपण काय केले किंवा आपण काय करत आहोत याचा पण बोध घ्यावा आणि खरे तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची शायरी नेहमी लक्षात ठेवावी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा