भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर, नेपाळने भरतासोबत नसलेला सीमा वाद उरकून काढत भारताची खोडी काढली. नेपाळचे भरतासोबत असलेले धार्मिक, संस्कृतिक, सामाजिक संबंध हे भारत नेपाळ राजनैतिक संबंधा पेक्षा वरचढ आहेत आणि भारतावर अवलंबून असलेला, भारताचा मित्रदेश अशी नेपाळ बद्दलची भारतीयांच्या मनात असलेल्या प्रतिमेला धक्का लागला. भारतीयांच्या मनात नेपाळ बद्दल शत्रू भावना तयार झाली. नेपाळच्या या वागण्यामागे चीन भक्कम पणे उभा आहे हे सगळ्यांना माहीत असलेले गुपित आणि याच मुळे भारतीयांचा नेपाळ बद्दलचा रोष अजून वाढला. याच बरोबर चीन सीमा संघर्षात चीनने भारताचा अजून एक मित्र देश बांगला देशाला आपल्या बाजूने वळविण्या साठी बांगलादेशच्या उत्पादित वस्तूंना चीन मध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापरिक सूट दिली. अर्थातच भारताने या निर्णयावर टीका केली, त्या मुळे बांगलादेशने नाराजी जाहीर केली.
पण या सगळ्याचा भारतातील डावे लिंब्राडु पत्रकार आणि काँग्रेस सारख्या चिनी साम्यवादी पक्षासोबत गुप्त करार करणाऱ्या पक्षांना आनंदच होत आहे. भारताचे आपल्या शेजारील राष्ट्रांशी असलेले चांगले संबंध अजून कसे बिघडवता येतील याची तजवीज अगदी मन लावून ही लोक करत आहेतच, पण ज्या राष्ट्रसोबत आपले संबंध बिघडलेले नाहीये त्या राष्ट्राबद्दल पण अतिरंजित बातम्या देत देशवासीयांचे मन त्या मित्र राष्ट्राबद्दल आणि आपल्या सरकार बद्दल कलुषित करायचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर करत आहे. याचा फटका बसला आपल्या शेजारील चिमुकला मित्र देश भुतानला !
देश स्वतंत्र झाल्यापासून ज्या देशांशी भारताचे राजकीय संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे राहिले आहेत त्यात भूतानचा क्रमांक अत्यंत वरचा आहे. भूतानच्या सीमांचे रक्षण करणे हे भारतीय सेनेची जवाबदारी आहे. २०१७ मध्ये भारत आणि चीन दरम्यान भूतान सीमेवर डोकलाम येथे तणाव निर्माण झाला होता, त्या तणावाचा फटका भूतानला पण बसला होता. चीनने भारताची साथ देणाऱ्या भूतानला पण धमकावले होते. पण तेव्हा पण भुतानने अजस्त्र चीनला भीक घातली नव्हती आणि आजही भूतानने भारताची साथ सोडली नाहीये.
पण भारताचे मित्र देशांशी संबंध बिघडवायचेच या एका अजेंड्या खाली काम करणाऱ्या चीन प्रेमी पत्रकारांनी एका सध्या घटनेचा असा प्रचार केला की जसे काही नेपाळ नंतर भूतान पण भारतासोबत वैर घ्यायला तयार आहे.
कारण होते भूतान मधील नदीतून भारताच्या आसाम राज्यात कालव्याच्या माध्यमातून सिंचना करता येणाऱ्या पाण्या विषयी. आसाम राज्याच्या भूतान सीमेवरील बकसा जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना १९५३ पासून भूतान मधील सिंचन प्रणालीतून कालव्या मार्फत पाण्याचे नियोजन होते. भूतान मधील हे बंधारे आणि कालवे हे दगडांनी बांधलेले आहेत. भूतान सरकार वेळोवेळी या बंधाऱ्यांची आणि कालव्यांची डागडुजी करते आणि भारतातील पाण्याचा प्रवाह सुचारु ठेवते. बंधाऱ्यांची आणि कालव्यांची ही योजना आहे त्याला "डोंग बंध" म्हणून ओळखल्या जाते.
मात्र या वर्षी चिनी कोरोना विषाणूच्या प्रकोपा मूळे संपूर्ण जग बंद पडले त्याला भूतान पण अपवाद नव्हता. या काळात भुतानच्या स्थानीय प्रशासनाला या "डोंग बंध" चे नियमित रखरखाव करण्यास आणि समस्या उत्पन्न झाली. या समस्येत वाढ तेव्हा झाली जेव्हा मान्सून भूतान पर्यंत पोहचला. या मुळे भूतानच्या पहाडी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला, आणि या पाई वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहा मूळे या "डोंग बंध" फुटले आणि भारताच्या सिंचना करता येणाऱ्या पाण्यावर याचा परिणाम झाला.
सिंचनाकरता पाणी मिळत नाही म्हणून आसामच्या डोंग बंध लाभार्थी शेतकऱ्यांनी "कालीपुर-बोगाजुली-कलानाडी आंचलीक डोंग बंध समिती" माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेतला. अर्थात त्यांची पण दिशाभूल अश्याच काही स्थानीय डाव्या लिंब्राडु लोकांनी केली होती. पण या सगळ्या प्रकरणात भुतानची बाजू लपवत, फक्त भारतातील काही शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला देशातील जनते समोर आणत आता भूतान पण भारता विरोधात गेल्याचे चित्र या लिंब्राडू पत्रकारांनी रंगवायला सुरवात केली. "भूतानने भारताचा दबाव झिडकारला", "भूतानने भारताचे पाणी तोडले" सारखे भारतीय जनतेला भडकवणारे शीर्षके देत आपल्या बातम्या आणि लेख खरडायला सुरवात केली.
या सगळ्याचा उद्देश एकच, भारतीय सरकारला बदनाम करायचे, चीनला वरचढ दाखवायचे. पण या लिंब्राडू पत्रकारांच्या उद्देशाला सुरुंग लावला तो भूतान प्रशासनाच्या एका स्थानीय अधिकाऱ्याने. शेरिंग नामगेल नावाच्या भूतान प्रशासनाच्या अधिकाऱ्याने आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून "शेजारधर्म पहिले" या शिर्षकाखाली एक लेख आणि काही छायाचित्र प्रसारित करून या लिब्रांडू पत्रकारांच्या दाव्यातील हवा काढून टाकली. त्यात त्याने स्पष्ट पणे या डोंग बंध ला झालेले नुकसान, त्याची सुरू असलेली डागडुजी बद्दल लिहले आहे. हे काम करतांना जोरदार पावसामुळे येणारा व्यत्यय सोबतच चिनी कोरोना विषाणू पाई निर्माण झालेल्या परिस्थितीत स्थानीय सरकारने केलेल्या २१ दिवसाच्या क्वारंटाइन नियमांमुळे मनुष्य बळ उपलब्ध व्हायला होणारा विलंब आणि त्या मुळे डागडुजी करण्यास होणारा विलंब या संदर्भात सविस्तर लिहले आहे. सोबतच त्याने भारतीय पत्रकारांनी याला दिलेल्या राजकीय रंगाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. फक्त या अधिकार्यानेच नाही तर भूतान मधील सर्वसामान्य जनता पण या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांच्या बातम्यांपाई आश्चर्यात आहे.
आताच आपल्या काही तथाकथित पुरोगामी मित्रांनी या लिब्रांडू पत्रकारांच्या बातम्या पसरवत भूतान विषयी आणि भारत सरकार विषयी चुकीची माहिती समोर केली आहे. तेव्हा सांभाळून लगेच प्रतिक्रिया न देता सत्य समजून प्रतिक्रिया द्या.
(सोबतच्या छायाचित्रात आपण सगळे वाचू शकता)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा