बातमी आहे चिनी कोरोना विषाणू मुळे जिथे कहर झाला त्या इटली देशातून. या देशाची सिल्वानो रोमानो नावाची मुलगी केनिया देशातील दुर्गम भागातील शकमा नावाच्या गावात एका ख्रिस्ती मिशनरी संस्थे तर्फेगरीब लोकांचाही सेवा करत होती. तर तिचे सेवाकार्य सुरु असतांना त्या भागात कार्यरत असलेल्या सोमालियात अल शबाब या इस्लामी अतिरेकी संघटनेने तिचे अपहरण केले.
आता हि अल शबाब संघटना सोमालियात सगळ्यात मोठ्या भूभागावर सत्ता गाजवणारी आतंकवादी संघटना आहे. सध्या जरी तिचे शहरातील आस्तित्व धोक्यात आले असले तरी देशाच्या ग्रामीण भागात अजूनही चांगली पकड ठेऊन आहे. या संघटनेचे कुप्रसिद्ध इस्लामिक स्टेट आणि नायजिरिया मधील क्रूर बोको हराम या इस्लामी अतिरेकी संघनेसोबत पण घनिष्ठ संबंध आहेत. विशेष म्हणजे भूभागाचे नुकसान होऊन सुद्धा संघटनेची अतिरेकी भरती जोरात सुरु आहे, फक्त आफ्रिकेतूनच नाही तर अमेरिका, इंग्लंड, युरोप मधून पण या संघटनेला अनुष्य बळ आणि पैसे मिळत आहे. सोबतच सोमालियाच्या शेजारी देशात मोठ्या प्रमाणावर आतंकवादी कारवाया करणे सोबतच अपहरण करून खंडणी वसूल करणे हा या संघटनेचे मुख्य काम. जगातील अनेक देशांनी या संघनेवर इस्लामी आतंकवादी संघटना म्हणून बंदी घातलेली आहे.
तर या अल शबाब संघनेने अपहरण केलेल्या इटालियन सिल्वानो रोमानो या मुलीची इटालियन सरकारने जवळपास १.५ मिलियन युरो खंडणी देत सुटका केली. या करता गेले १८ महिने या वाटाघाटी सुरु होत्या. पण हि २४ वर्षीय सिल्वानो रोमानो इटलीत पोहचली, तिच्या स्वागताला इटलीचे पंतप्रधान जातीने हजर होते, यातूनच प्रकरणाचे गांभीर्य आणि इटली सरकारने तिच्या सुटके साठी केलेले पयतन लक्षात यावे. सिल्वानो रोमानो विमानतळावर उतरली आणि एका नवीनच वादाला सुरवात झाली. सिल्वानो रोमानो विमानातून उतरली तेच मुळी हिजाब घालून, तिला जेव्हा हिजाबचा त्याग करण्याबाबत छेडले तेव्हा तिने आता आपण इस्लाम धर्म स्वीकारल्या असल्याचे सांगत आता आपले नाव सिल्वानो रोमानो नसून अलिशा असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे फक्त सिल्वानो रोमानो च्या कुटुंबीयांनाच नाही तर संपूर्ण देशवासियांना पण मोठा धक्का ठरला. या स्वीकारलेल्या इस्लाम बाबत जेव्हा या सिल्वानो रोमानो उर्फ अलिशाला विचारल्या गेले तेव्हा तिने आपले १८ महिन्यांचे या इस्लामी अतिरेक्यांबाबतचे अनुभव सांगितले. त्यात तिचा मुख्य भर हा होता कि या लोकांनी माझ्यासोबत पहिला महिना सोडला तर अतिशय चांगला व्यवहार केला. कधीही माझ्यावर जबरदस्ती केली नाही, उलट वेळ घालवायला म्हणून मला भरपूर पुस्तके वाचायला दिली. त्यात पवित्र कुराण आणि इस्लाम दर्शनाची अनेक पुस्तके होती. या लोकांसोबत झालेल्या चर्चेतून मला इस्लामची खरी ओळख झाली आणि माझे इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय पक्का झाला. धार्मिक इटलीत तिच्या वक्तव्यामुळे अजून मोठा वाद झाला, इटली सरकारने १.५ मिलियन युरो खंडणी इटलीतील मुस्लिमांची संख्या १ ने वाढवायची दिली का ? असे प्रश्न आता विचारले जात आहे.
आता हे प्रकरण इतकेच असते तर या प्रकरणाकडे आपले लक्ष पण गेले नसते. पण आपल्या देशातील काही इस्लामी प्रचारकांनी या प्रकरणाचा उपयोग इस्लाम लोकांना कसा आकर्षित करतो आणि आपण ज्यांना अतिरेकी म्हणतो ते कसे चांगले व्यवहार करणारे आहेत असा अपप्रचार करणारे लेख समाज माध्यमांवर लिहले. सोबतच पुन्हा इस्लामी देशांवर, लोकांवर कसा क्रूर अन्याय जगातील महासत्ता करतात याचे आकडे देत, या अतिरेकी संघटनांबद्दल त्यांच्या कामांबद्दल एक प्रकारे सहानभूतीच व्यक्त केली. खरे तर व्यक्ती स्वातंत्र्य, निर्भय वातावरणात समजा या सिल्वानो रोमानो हिने अभ्यास करत इस्लाम धर्म स्वीकारला असता तर या वर नक्कीच इटलीत पण इतका गोंधळ झाला नसता. पण AK बंदुकीच्या पहाऱ्यात तिचा "ब्रेन वॉश" झालाच नसेल किंवा तिच्यावर अप्रत्यक्ष दबाव आलाच नसेल असे म्हणणे खरेच हास्यास्पद ठरेल. पण याचा विचार न करता देशातील जे इस्लामी प्रचारक या प्रकरणाची भलामण करत आहेत त्यांनी पण याचा विचार करणे गरजेचे आहे. सोबतच तिला सोडल्यावर मिळणाऱ्या प्रचंड खंडणीची आमिष तिला कोणताही त्रास न देता जिवंत ठेवण्याच्या मागे होते हे पण विसरता कामा नये.
तुम्हाला "स्टोकहोम सिड्रोम" माहित आहे का ? आपल्या अपहरणकर्त्या विषयी सहानभूती बाळगणे किंवा त्याच्या प्रेमात पडणे या मानसिक अवस्थेला "स्टोकहोम सिड्रोम" म्हणून ओळखल्या जाते. स्टोकहोम शहरातील एका बँकेत घडलेल्या ओलीस प्रकरणानंतर झालेल्या घडामोडी नंतर मानसिक संशोधकांनी वर दिलेल्या प्रकारच्या मानसिक अवस्थेला दिलेले हे नाव. अपहरण नाट्य किंवा ओलिस नाट्य घडतांना सगळ्यात जास्त मानसिक आघात होत असतो तो या प्रकरणातील भूक्त म्हणजेज अपहरण झालेला किंवा ओलीस ठरलेल्या व्यक्तीवर. मग तो भूक्त व्यक्ती त्याने अश्या अपहरण-ओलीस प्रकरणाच्या,अगोदर वाचलेल्या, बघितलेल्या क्रूर बातम्या-कथा आठवत आता आपले भविष्य काय ? याचे मानसिक चिंतन सुरु करतो, अश्या काळात येणाऱ्या वाईटात वाईट स्थिती करता मानसिक रूपाने तयार होण्याची हि एक पध्द्त असते. पण अचानक त्याला अपहरणकर्त्या कडून बरीच सौम्य वागणूक मिळते आणि इथेच त्या भुक्ताची मानसिक फसवणूक होते. त्यातून भुक्ताची सहानभूती आपल्यावर अत्याचार करणाऱ्या सोबत होत जाते, अपहरणकर्त्याचे आदेश इतरवेळेस भुक्ताने मानले नसते ते पण तो निमूटपणे पाळू लागतो, विरोध करत नाही, सुटण्याची, पळून जाण्याची धडपड करत नाही, उलट नकळत तो अपहरणकर्त्यांची मदतच करतो. काही प्रकरणात तर अपहृत आणि अपहरणकर्ता यांच्यात नातेसंबंध तयार झालेले समोर आले आहेत.
अनेक वेळा मग अपहरणकर्ता या "स्टोकहोम सिड्रोम" मानसिकतेचा उपयोग न्यायालयात आपल्याविषयी सहानभूती निर्माण करण्यासाठी खुबीने वापर करतो. न्यायालयात जरी भावनिक मुद्दे चालत नसले, तरी या प्रकरणाच्या बाहेर येणाऱ्या वृत्तांता मुळे न्यायालयाच्या बाहेर अपहरणकर्ता सहानभूती नक्कीच जमा करतो. त्याच्या वर झालेल्या खऱ्या खोट्या तथाकथित अन्याया मुळे त्याला असे कृत्य करण्याचे समर्थन त्याच्या मागे असते.
आपल्या चित्रपट बनविणाऱ्या लोकांनी पण अश्या प्रकारच्या विषयावर अनेक चित्रपट बनविले आहे. "हिरो" चित्रपटात मीनाक्षी शेषांद्री, "हायवे" चित्रपटात आलीय भट, "किडन्याप" चित्रपटात मनीषा लांबा किंवा "मदारी" चित्रपटात अपहरण झालेला मंत्र्यांचा छोटा मुलगा हे या "स्टोकहोम सिड्रोम" मध्ये अडकलेले नमुने ज्यांना आपले अपहरण करणाऱ्या बद्दल सहानभूती - प्रेम निर्माण होते आणि आपल्याला पण! आहे ना गंमत मानसिक खेळाची !
आता यात अजून गुंतागुंत सुरु होते जेव्हा यात गुन्हेगार हा एक व्यक्ती म्हणून नाही तर एखाद्या विचारधारेच्या, धार्मिक आस्थेच्या विचारांचा पाईक म्हणून किंवा वयक्तिक फायद्याच्या बुरख्या आड विचारधारेच्या आणि धार्मिक आस्थेसाठी अपहरणासारखे कृत्य करतो. मग अपहृत व्यक्तीवर "स्टोकहोम सिड्रोम" कसा असर करत असेल ? तर त्याचे अपहरण करणाऱ्याच्या विचारधारे बद्दल किंवा धार्मिक आस्थेबद्दल सहानभूती निर्माण होत असेल का ? मग अश्या सहानभूती धारकाचा हे लोक कसा उपयोग करत असतील ?
१२ मे २०१० मध्ये अरुणाचल प्रदेश येथील पश्चिम कामांग जिल्यातील एका जंगलातून भारतीय विदेश सेवेचे एक मराठी अधिकारी विलास बर्डेकर यांचे अपहरण बोडो आतंकवाद्यांनी केले होते. आतंकवाद्यांनी खरेतर त्यांना पकडले पत्रकार असल्याच्या संशयातून, पण विचारपूस केल्यानंतर अतिरेक्यांना घबाड मिळाल्याचे लक्षात आले असेल. भारत सरकार सोबत झालेल्या मोठ्या वाटाघाटी नंतर आणि मोठी रक्कम खंडणी म्हणून वसूल केल्यावर जवळपास ८४ दिवसानंतर अतिरेक्यांनी त्यांची सुटका केली. त्या नंतर विलास बर्डेकर यांनी प्रतिक्रिया देतांना मात्र या आतंकवाद्यांनी आपल्या वाईट वागणूक दिली नसल्याचे वक्तव्य केले, अगदी प्रथम त्यांच्या वर AK - ४७ मधून पायावर गोळी चालवून जखमी केल्यावर पण ते आपल्याला मारणार नाहीत अशी विलास बर्डेकर यांची धारणा पक्की होत गेली. पण आतंकवाद्यांच्या वागणुकी मागे सरकार सोबत सुरु असलेल्या वाटाघाटी जवाबदार होत्या हे मात्र त्यांनी दुर्लक्षित केले. या वाटाघाटी फिस्कटल्या असत्या तर आतंकवाद्यांनी त्यांना अशीच वागणूक दिली असती ? त्यांना खरेच जिवंत सोडले असते ? हा विचार करणे आवश्यक नाही काय ? अगदी याच पद्धतीने आपल्या कडे माओवादी नक्षलवाद्यांच्या देशविरोधी कृत्यांना पण तात्विक मुलामा चढवल्या जातो
आता हे सगळे का लिहले ? तर आपल्या देशात पण बौद्धिक, वैचारिक, धार्मिक चकवेगिरी करणारे कसा फायदा उचलत आहे या वर प्रकाश टाकण्यासाठी इतके शब्द खर्च करावे लागले. अर्थात आपल्या देशातील अनेक लोक शतकांपासून असल्याचं "स्टोकहोम सिड्रोम" चे रुग्ण असल्यामुळे त्यांना या लेखातील चालूगिरी नक्कीच लक्षात आली नसेल. तेव्हा जागे व्हा, असल्या चालूगिरीला वेळीच लगाम लावा विरोध करा.






आपल्या गाय वासरांच्या सर्व पिढ्या याच रोगाने ग्रासलेल्यायत.
उत्तर द्याहटवा