करायला गेले एक आणि......


काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हे नक्की कशा करता जागतिक अर्थशास्त्री सोबत संवाद साधत आहे हे कळले नाही. बघा पहिले राहुल गांधी भारतातील पत्रकारांसोबत बोलले, त्यात त्यांनी "लॉक डाऊन" मुळे भीषण आर्थिक नुकसानीत जाणार आहे अशी भविष्यवाणी केली, म्हणजे! अहो उद्योग धंदे बंद झाल्यावर आर्थिक परिस्थिती घसरते हे तर ७-८ वितला विद्यार्थी पण सांगेल त्या करता राहुल गांधी कशाला हवे होते?


त्या नंतर राहुल गांधी यांनी प्रथम रघुराम राजन यांच्या सोबत "आर्थिक घडी" कशी सावरायची या वर चर्चा केली, आता आपला मालक आपल्याला प्रश्न विचारणार आणि त्याला उत्तर तर द्यायला हवे, पण मालकाचा बौद्धिक आवाका माहित असल्या मुळे त्यांनी ६५ हजार करोड गरिबांना वाटा असा उपाय सांगितला, हे म्हणजे बाजारातून रडणाऱ्या मुलाला चॉकलेट घेऊन देण्याइतके सोपे आहे, हे माहित नव्हते ६५ हजार करोड वाटा भारताची अर्थव्यवस्था एकदम जोरात धावेल म्हणून. बर हे इथेच थांबले असते तर ठीक आता रघुराम राजन पेक्षा वरच्या इयत्तेतील म्हणजे "नोबेल पारितोषिक" मिळालेले अर्थशास्त्री अभिजित बॅनर्जी यांच्या सोबत पण चर्चा केली.


आता बघा स्वतःच्याच हाताने स्वतःची कशी "काशी" केल्या जाते. राहुल गांधी यांनी पहिला प्रश्नच विचारतांना UPA सरकारने सुरु केलेल्या योजना कश्या गरिबांच्या कल्याणा करता होत्या याचा जप केला, तेव्हा अभिजित बॅनर्जी यांनी त्यांना सांगितले कि UPA च्याच योजना या सरकारने पण समोर नेल्या त्याचा आवाका वाढवला, विशेषतः "आधार कार्ड" चा नेमका तोच उपयोग या सरकार कडून केल्या गेला जो UPA आपल्या शेवटच्या वर्षात विचार करत होते.

आता विचार करा जिथे तिथे "आधार लिंक" करावे लागत आहे म्हणून रडणारे हेच राहुल गांधी होते बरे, या वरून काँग्रेस अगदी न्यायालयात वगैरे जाऊन आली, याच विषया वरून संसदेत गोंधळ घातला होता. बॅनर्जी साहेब तुम्ही सांगता तसे भारतातील कुणालाही भारतात कुठूनही राशन उचलता यावे म्हणून आणलेल्या "एक देश एक राशन कार्ड" या योजनेचा पण विरोध केला. पण बॅनर्जी साहेब इथेच नाही थांबले ते म्हणाले कि आजही भारतातील बरीच मोठी लोकसंख्य गरीब आहे आणि जी या जनधन योजना, आधार कार्ड, रेशन कार्ड या कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत अद्याप सामावलेली नाहीये आपल्याला या सगळ्या "चिनी कोरोना विषाणू" प्रकोपात हि संख्या कश्या प्रकारे तोंड देण्यास सक्षम राहील याचा विचार झाला पाहिजे. पण राहुल गांधी यांना हे समजणार आहे का ? आपली राजनीती चमकवायला म्हणून ते बोलायला आले होते हो बॅनर्जी साहेब, तुम्ही भलतेच मुद्दे ठेवत आहात. आता किती लोकसंख्या कायदेशीर प्रक्रियेत नाहीये तरी त्याना मदत करायची तर त्यांची मोजदाद तर करावी लागणार ना? त्यांना कायदेशीर प्रक्रिया करून मुख्य प्रवाहात आणावे लागणार ना? त्यांचे जनधन खाते उघडून द्यावे लागणार ना, मुख्य म्हणजे हे सगळं करतांना त्यांचे कागतपत्र तपासून त्यांच्या कडे काय आहे, काय नाही बघून त्यांना दिली जाणारी मदत किती ठेवायची हे ठरवावे लागणार ना? पण आमचे राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष तर "कागज नही दिखायेंगे" ची घोषणा देतो, त्यांच्याच सरकारने सुरु केलेल्या N.P.R. (राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर) सारख्या योजनांचा विरोध करतो. आता तुम्ही आहात "अर्थशात्री" तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लागतो "डेटा" , "आकडा" पण राहुल गांधी आहे काँग्रेसी राजकारणी यांना सवय आहे पत्येक ठिकाणी हा "डेटा", "आकडा" लपवण्याची कसे चालणार असे?

टिप्पण्या