आज मुंबईतील वांद्रे आणि मुंब्रा येथे परप्रांतीय मजुरांची गर्दी जमली. याचे कारण समजून न घेता राज्याचे युवराज यांनी सरळ सरळ केंद्र सरकार वर आरोप करायला सुरुवात केली. खरे तर केंद्र सरकार दोन आठवड्यांपासून देशातील सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेत आहेत आणि येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा तर सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशातील "लॉक डाऊन" वाढवावा असा आग्रह केंद्र सरकार कडे केला होता. याही समोर जात सगळ्यात पहिले ओरिसा आणि पंजाब राज्याने आपला "लॉक डाऊन" ३० एप्रिल पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला, त्या पाठोपाठ राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने पण हा निर्णय केंद्र सरकारने घोषित करण्या अगोदरच घेतला. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला या वाढीव "लॉक डाऊन" संदर्भात जनतेला संबोधित केले, तेव्हा पण त्यांनी राज्य सरकार सोबत केलेल्या विचार मंथनाला मान्य करत हा "लॉक डाऊन" वाढवल्याचे सांगितले.
आता महाराष्ट्र सरकार स्वतः लॉक डाऊन वाढवत असतांना काही लोकांसाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी कशी करू शकते? बर अशी मूर्ख मागणी कोणत्या तत्वात शहाणे केंद्र सरकार मान्य करणार आहे? त्या मुळेच राज्याच्या युवराजांचे या गर्दी करता केंद्र सरकारवर आरोप करणे हे बालिश पणाचे तर आहेच अधिक स्वतः वर असलेल्या जवाबदारी पासून पळ काढणारे पण आहे.
पुन्हा दुसरा आणि महत्वाचा प्रश्न असा की समजा मुंबईत रेल्वे सुरू झाल्याची अफवा पसरली म्हणून हे परप्रांतीय मजूर आपल्या गावी जायला म्हणून रेल्वे स्थानकात आले असतील तर ते मुंबई, ठाणे, नवी मुंबई अश्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आले असतील ना? पण वांद्र्यात पोलिसांनी लाठ्या चालवल्यावर पुढल्या १५ मीनटात जमाव गायब झाला म्हणजे तो वांद्रे स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्यांमधूनच तेथे जमा करण्यात आला नव्हता काय? आणि तसे असेल तर मुंबई पोलीस आणि राज्याचे गृह खात्याचे हेर खाते झोपा काढत होते काय? महत्वाची गोष्ट अशी की या परप्रांतीय लोकांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील लोकांचा जास्त भरणा होता, तर अशी कोणती रेल्वे गाडी आहे जी वांद्रे स्थानकातून किंवा मुंब्रा स्थानकातून उत्तर प्रदेशात जाते?
आता कोणी विनय दुबे जो स्वतःला "कामगार नेता" म्हणून समोर आणत आहे त्याने आपल्या फेसबुक आणि व्हाट्स अँप वरून काही व्हिडीओ प्रसारित केल्याचे लक्षात येत आहे ज्या मुळे ही गर्दी जमली असा आरोप होत आहे. या विनय दुबेची फेसबुक प्रोफाइल बघितली असता त्याची भाषा ही दिल्लीत CAA विरोधातील आंदोलनात डावे लिब्रांडू आणि इस्लामी कट्टरपंथी वापरत होते तीच आहे. समजा आजची वांद्रा आणि मुब्रा येथील गर्दी या विनय दुबे याच्या भाषणाने झाली असेल तर स्वतःला कामगारांचे हितेशी म्हणत त्यांच्या जीवावर स्वतःचे राजकारण चमकवणाऱ्या डाव्या लिब्रांडू आणि त्यांना साथ देणाऱ्या इस्लामी कट्टरपंथी यांची युती भारतात काय हाहाकार उडवू शकतात त्याची प्रचिती येईल.
खरे तर या तथाकथित लिब्रांडू कामगार नेत्यांना या गरीब, हातावर पोट असलेल्या या कामगारांची चिंता होती आणि खरेच या कामगारांना दोन वेळेला पोट भरायला राज्य सरकारची मदत मिळत नव्हती जे आज बातम्यांमध्ये सांगत होते तर या नेत्याने राज्य सरकार कडे याचा पाठपुरावा केला का? या नेत्याने स्वतःच्या कामगार संघटने मार्फत यांचे हाल होणार नाही याची काही तजवीज केली का ? हे महत्वाचे प्रश्न नाहीत काय?
आजच्या घडीला स्वतःला वरिष्ठ पत्रकारांची उपाधी घेत फेसबुक आणि ट्विटर सारख्या समाज माध्यमांवर चमको गिरी करणाऱ्या डाव्या लिब्रांडू पत्रकारांची साथ आली आहे. अशे पत्रकार आणि नेते ज्यांचे मुख्य कामच मुळी देशाला अजारकते कडे ढकलणे हे आहे आणि त्या करता ते इस्लामी कट्टरपंथी लोकांची साथ पण घेत आहे.
गेल्या महिन्यात दिल्लीत पण लॉक डाऊन दरम्यान कामगार वर्गाला अश्याच अफवा पसरवत बाहेर जमा केले गेले होते त्या अगोदर दिल्ली सरकारने बहूप्रतिक्षित कन्हैया कुमार याच्या वर देशद्रोही खटल्याला परवानगी दिली होती आणि शाहीन बाग वर केंद्र सरकार ने कारवाई करत रिकामे केले होते. आज मुंबईत एल्गार सभा प्रकरणातील आरोपी असलेल्या आनंद तेलतुंबडे याला दोन वर्षाच्या न्यायालयीन लढाई नंतर आत्मसमर्पण करावे लागले आणि ही हार लिब्रांडूना मोठी जिव्हारी लागली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा