धारावीतील शाहू नगर पोलीस ठाण्यातील सहाय्य्क पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी ह्यांचा "चिनी कोरोना विषाणू" च्या संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याची बातमी आली आणि मन हळहळले. भारतातील प्रत्येक राज्यात पोलीस हे "चिनी कोरोना विषाणू" विरोधातील लढाईचे बिनीचे शिलेदार असल्यामुळे पोलिसांची होणारी मनुष्य हानी अधिक बोचते. खरे तर २६/११ ला झालेल्या मुंबई येथील पाकिस्थान पुरस्कृत इस्लामी आतंकवादी हल्ल्यात पहिल्या काही तासातच मुंबई पोलिसांचे महत्वाचे शिलेदार शहीद झाल्यावर जी भावना मनात आली होती, तशीच भावना अश्या "चिनी कोरोना विषाणू" मुळे मृत्युमुखी..... नाही शहीद झालेल्या पोलिसांच्या बातमीमुळे मनात येते. आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात जवळपास ११ पोलीस या लढाईत शहीद झालेत, त्यातील ८ तर फक्त मुंबईतच आहेत.
पण आता स्वर्गीय अमोल कुलकर्णी यांच्या मृत्यू नंतर ज्या बातम्या समोर येत आहेत त्या मुळे फक्त दुःखच होत नाही तर पोलिसांच्या दयनीय परिस्थिती बद्दल, सरकारी प्रशासनाच्या निब्बरते बद्दल आणि या सगळ्याकडे दुरक्ष करणाऱ्या नाकर्त्या सरकार बद्दल पण प्रचंड राग मनात निर्माण करणाऱ्या आहेत. धारावी सारख्या मुंबईच्या "हॉट स्पॉट" ठरलेल्या भागात संपूर्ण बळ पणाला लावत, स्वतः बद्दल कोणताही विचार न करता झोकून काम करणाऱ्या अमोल कुलकर्णी यांना १०-११ तारखेला ताप आला. त्यानंतर ते सायन हॉस्पिटलला तपासणी करता गेले असता त्यांना घरीच "क्वारंटाईन" रहा असे सांगत वापस पाठवले. १२ तारखेला त्याची "चिनी कोरोना विषाणू" ची चाचणी घेण्यात आली आणि ग्रीक विश्रांती करता वापस पाठवण्यात आले. आता १२ तारखेला केलेल्या चाचणीचा निकाल १५ तारखेला रात्री हाती आला, गंभीर बाब म्हणजे मुंबई सारख्या राज्यातील सगळ्यात प्रगत शहरात, जिथे आरोग्य व्यवस्था अतिशय चांगली आहे असे मुख्यमंत्र्यांना वाटते त्या शहरात चाचणीचा निकाल यायलाच तब्ब्ल ४ दिवस लागतात असे कसे होते. बरे १५ तारखेला आलेला चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह होता, त्याच रात्री अमोल कुलकर्णी त्यांचा त्रासही वाढला होता. पण "कोरोना योद्धा" ला दवाखान्यात न्यायचे मात्र महाराष्ट्राच्या, मुंबईच्या प्रशासनाला कळले नाही. पहाटे त्यांची तब्येत अजूनच खालावली तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना दवाखान्यात नेण्याची धडपड सुरु केली. मात्र त्यांना अब्युलन्सच उपलब्ध होऊ शकली नाही १०८ वरून नाही, इतर सरकारी दवाखान्यातून नाही, शेवटी कसे तरी एका खाजगी अब्युलन्सने त्यांना हॉस्पटिलला नेण्यात आले. पण तो पर्यंत बराच उशीर झाला होता. सकाळी ७:३० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
![]() |
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र - १कॅप्शन जोडा |
पण मृत्यू नंतर पण या "कोरोना योद्धाचे" भोग काही संपले नव्हते. राज्यातले कोरोना बळी लपवण्याचा चाणाक्ष सरकारी नीतीचा बळी अजून जायचा होता, जेव्हा अमोल कुलकर्णी यांचे मृत्यू प्रमाणपत्र सहकाऱ्यांच्या हातात आले तेव्हा मात्र सरकारची लाज चव्हाट्यावर आली. त्या प्रमाणपत्रात मृत्यूचे कारण "कोविड - १९" असे न लिहिता, मृत्यूचे कारण श्वसनसंस्था बंद पडणे, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असे लिहले होते. "चिनी कोरोना विषाणू" विरुद्धच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या "कोरोना योध्द्याचा" हा सरळ सरळ अपमान होता. अमोल कुलकर्णीच्या काही सहकाऱ्यांनी या मृत्यू प्रमाणपत्राचा विरोध केला असता त्यांना दवाखान्याच्या प्रशासना कडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली. शेवटी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि अमोल कुलकर्णी यांना ओळखणारे आमदार यांच्या प्रयत्नाने शेवटी हा विषय गृहमंत्र्यांपर्यंत गेला आणि त्यांच्या आदेशाने मृत्यू प्रमाण पत्रावर मृत्यूचे योग्य कारण लिहण्यात आले. तरी बरे हे सगळे प्रकरण सरकारला समर्थन करणाऱ्या पत्रकाराने समोर आणले, नाही तर याला फेक न्यूज म्हणून सरकारने केराची टोपली दाखवायला कमी केले नसते.
![]() |
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र - २ |
आता तुम्हीच लक्षात घ्या कि, राज्यातील प्रशासनातील, त्यातही पोलीस दलातील एका अधिकार्याबाबत अशी अनास्था राज्य प्रशासन दाखवत असेल तर सामान्य जनतेला हे प्रशासन कसे वागवत असेल ? ज्या पोलीस अधिकाऱ्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्याच्या मृत्यूचे कारण प्रशासन कोणाच्या सांगण्यावरून लपवत होते ? २१ एप्रिल २०२० ला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले होते. त्यात त्यांनी स्पष्टपणे सरकारी प्रशासन "चिनी कोरोना विषाणू" मृत्यू आकडा कमी दाखवण्यासाठी "कोविड -१९" ऐवजी दुसरी कारणे देत असल्याचा आरोप करत या राज्यातील "चिनी कोरोना विषाणू" धोका अजून भयावह पध्द्तीने वाढत असल्याचा आरोप केला होता. पण सरकारने त्यावर काही अधिकृत वक्तव्य तर केले नाहीच, पण आपल्या समर्थकांव्दारे सरकारला बदनाम करण्याचा डाव असल्याचे, राज्याच्या नाजूक परिस्थितीत राजकारण करत असल्याचे आरोप विरोधकांवर आणि त्यांच्या समर्थकांवर करत होते, पण अश्या बिनबुडाच्या आरोपांवर न थांबता सरकार समर्थक तर विरोधकांना सरळ "महाराष्ट्र द्रोही" म्हणून शिक्का पण मारत होते. पण दुर्दैवाने महाराष्ट्राच्या अनेक "कोरोना हॉट स्पॉट" वरून अश्या मृत्यूचे कारण लपवण्याच्या बातम्या येत होत्या, विशेषतः मालेगाव मधून मोठ्या प्रमाणावर असले आरोप थेट वृत्तपत्रातून करण्यात आले होते. पण निर्ढावलेल्या सरकारने आणि सरकारी प्रशासनाने यावर ना काही कारवाई केली, ना काही वक्तव्य! सरकार आपल्याच महत्वाच्या अजेंड्यावर म्हणजेच रमजान सुरु होण्या अगोदर "चिनी कोरोना विषाणू" चे रुग्ण कसे कमी दाखवायचे यावर काम करत होती.
![]() |
मालेगाव येथील वृत्तपत्रात आलेली बातमी |
शेवटी सरकारच्या याच चुकीच्या धोरणाने महाराष्ट्र राज्य भारतात क्रमांक एकचे राज्य ठरले ते "कोरोना" बाधितांमध्ये पण ना रुग्ण कमी झाले, ना "लॉक डाऊन" संपवता आला. सरकारच्या याच लपवाछपवीची किंमत महाराष्ट्र राज्यच नाही तर गोव्या सारखे कोरोना मुक्त राज्य पण भोगत आहे. मुंबईतून गेलेल्या प्रवाश्यांमुळे कोरोना मुक्त झालेले गोवा पुन्हा ३० रुग्णांशी कोरोना युक्त झाले आहे. सरकार मधील पक्षच आता मुख्यमंत्र्यांच्या प्रशासकीय अनुभवावर बोट ठेवायला लागले आहेत. आता तरी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या रेम्या समर्थकांनी दुसऱ्यावर आरोप करत न बसता, दुसऱ्या राज्यात काय चुकते यावर प्रवचन न करता, आपल्या खाली काय आग लागली आहे याची योग्य दखल घ्यावी आणि स्वतः कसा "महाराष्ट्र द्रोह" करत आहे यावर आत्ममंथन करावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा