शेवटी राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली आणि भारतीय लिब्रांडुंना "देव पावला"! लगेच त्यांना नेहमी प्रमाणे राहुल गांधी यांच्या मध्ये एक परिपक्व, आत्मविश्वास पूर्ण नेता दिसायला लागला. अर्थात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पण राहुल गांधी यांच्या विषयी अशीच हवा करण्यात आली होती.
या पत्रकार परिषदे आधी पण राहुल गांधी यांच्या बद्दल वातावरण निर्मितीचा प्रयत्न सुरू झाला होता. राजस्थान मधील भिलवाडा हे शहर भारतात सगळ्यात पहिले "चायनीज कोरोना विषाणू" करता "हॉट स्पॉट" ठरले होते. पण तेथील स्थानिक प्रशासनाने जनतेसोबत केलेल्या समन्वयाने तेथील संसर्ग आटोक्यात आणला. पण राजस्थानचे मुख्यमंत्र्यांनी त्याचे श्रेय मात्र राहुल गांधींच्या मार्गदर्शनाला दिले होते, या वरून मोठा वादंग पण झाला होता. इतकेच नाही तर केरळ मधील वायनाड जे राहुल गांधी यांचे सध्याचे कार्य क्षेत्र आहे तिथे पण या "चायनीज कोरोना" चा प्रादुर्भाव कमी झाला याचे कारण राहुल गांधी आहे अशी पण हवा बनवायचा प्रयत्न झाला होता, पण हे दोन्ही प्रयत्न फोल ठरले कारण नक्की कोण काय काय काम करत आहे ते जनतेला लगेच दिसत आहे, पण कसे आहे की जे जनतेला वाटत असते ते आमच्या लिब्रांडुंना कधीच कळत नसते.
तर आता आज राहुल गांधी यांनी नक्की काय वेगळी भूमिका घेतली किंवा नवीन उपाय सुचवले असे काही झाले काय? तर नाही, दुर्दैवाने राहुल गांधी यांनी तसे काहीच केले नाहीच उलट या संकटाच्या वेळी राजकारण न करता आम्ही सरकार सोबत आहे म्हणत अत्यंत घृणास्पद राजकारण केले.
सध्या भारतात सुरू असलेल्या "लॉक डाऊन" विरोधात बोलण्याची नवीन फॅशन आली आहे. अनेक डावे लिब्रांडू पत्रकार तर या "लॉक डाऊन" ला चक्क संविधान विरोधी वगैरे ठरवून त्यांच्या होपलेस लायरवाल्या वायर वर लेख खरवडत आहे, बालबुद्धि राहुल गांधी यांनी पण त्यांच्या या पत्रकार परिषदेत पण अशीच भूमिका घेतली फक्त डाव्या लिब्रांडू पत्रकार आणि राहुल गांधी यांच्यात एकच फरक आहे की या लिब्रांडू पत्रकारांना कोणाला उत्तर द्यायचे नसते पण राहुल गांधी यांचा पक्ष तीन राज्यात सत्तेत आहे आणि त्या राज्यांनी केंद्र सरकारने घोषित करायच्या अगोदर आपल्या राज्यात "लॉक डाऊन" घोषित केला आणि त्याची मुदत पण केंद्र सरकारने वाढवायच्या अगोदर वाढवली! आता हे उदाहरण समोर असतांना "लॉक डाऊन" लागू करून सरकारने चूक केली हे तरी राहुल गांधी कसे म्हणणार? म्हणून मग "लॉक डाऊन" अंतिम उपाय नाही असे राहुल गांधी म्हणाले पण मग या व्यतिरिक्त दुसरा उपाय काय? हे ना राहुल गांधी यांनी सांगितले, ना उपस्थित बुद्धिवादी पत्रकारांनी सांगितले!
मुख्य म्हणजे डाव्या लिब्रांडूना आणि राहुल गांधींना राजकीय फायदा घ्यायचा असल्यामुळे असली बिनबुडाचे वक्तव्य करतात हे ठीक पण समाजसेवक म्हणून ज्यांच्या कडे आदराने बघितल्या जाते त्या डॉ. अभय बंग यांनी पण असली बिनबुडाची वाक्य फेकायची म्हणजे अतीच होते, यांनी पण "लॉक डाऊन" हा काही तज्ञाच्या मते अंतिम पर्याय नाही असे म्हंटले. पण हे काही तज्ञ नक्की कोण ? कुठले? मग त्यांनी सुचवलेला दुसरा पर्याय कोणता? हे कुणीच सांगत नाहीये. मग हे स्वतः अभ्यास करून बोलत आहे की "सुपारी" घेऊन बोलत आहे असे म्हणायला वाव नाही आहे काय?
पहिले लक्षात घेण्यासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या "चायनीज कोरोना विषाणू" च्या संसर्गावर कोणताही ठोस उपचार नाही, ना कोणते औषध आहे, ना कोणती लस आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णावर अनेक पद्धतीने उपचार केल्या जात आहे. जगभरात या रोगावर उपचार करतांना आलेल्या अनुभवा वरून एक पद्धत तयार करून हे उपचार केल्या जात आहेत. सोबतच महत्वाचे म्हणजे हा विषाणू पसरण्याचा वेग हा विषाणू बाधित बरे होण्याच्या वेगा पेक्षा कैक पटीने जास्त आहे. त्या मुळे सध्या तरी यावर "लॉक डाऊन" हा एकच उपाय या रोगाच्या संसर्गा पासून दूर राहण्यासाठी आहे हे नक्की.
ज्या ज्या देशांनी वेळेवर "लॉक डाऊन"चा उपाय आमलात आणला नाही ते देश वैद्यकीय क्षेत्रात आणि आर्थिकतेने पण भरतापेकक्षा पुढारलेले असून तेथे त्याची हालात आपल्या पेक्षा कित्येक पटीने वाईट आहे हे आपल्याला इटली, स्पेन, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका सारख्या देशाकडे बघून लक्षात येईलच. मग हे डावे लिब्रांडू पत्रकार, राहुल गांधी सारखे राजकारणी किंवा अभय बंग सारखे समाजसेवी कोणाच्या इशाऱ्यावर असे वक्तव्य करत असावे?
बरे विदेशातून भारतात येणाऱ्या लोकांनी "चायनीज कोरोना विषाणू" भारतात पसरवला आणि "या पासपोर्ट वाल्यांच्या चुकी मुळे रेशन कार्ड वाल्यांना घरात बसावे लागत आहे." असे एक तद्दन समाजवादी कम्युनिस्ट वाक्य लिब्रांडू आणि त्यांचे सहकारी अंगावर फेकत आहे. हे वाक्य पूर्णतः अर्धसत्य तर आहेच, पण जे विदेशातून आलेले आहेत त्यांचा अपमान करण्यासारखेच आहे. यातील सत्य इतकेच की हा विषाणू संसर्ग बाहेरून भारतात आला, पण हे विदेशात गेलेले भारतीय फक्त पैसे उडवायला, मौज मजा मारायला विदेशात गेले होते का? तर नाही यातील अनेक लोक आपल्या काम धंद्या साठी विदेशात गेले होते, यातील अनेक आपल्या देशात असलेल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी विदेशात गेले होते. विशेष म्हणजे आज भारताच्या तिजोरीत विदेशी मुद्रा आहे ना त्यात भर घालायला हेच पासपोर्टधारी जवाबदार आहेत आणि त्याच डॉलर्स मुळे भारताची मान जगात ताठ आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. यातील अनेक विद्यार्थी आहेत जे उद्या भारताच्या उन्नतित मोठा वाटा उचलू शकणार आहे. होय हे नक्की की चीन पासून इटली पर्यंत अनेक राष्ट्रांनी अगोदर आपल्या कडे असा संसर्ग जन्य आजार वाढत आहे या कडे एक तर दुर्लक्ष केले किंवा जाणून बुजून लपवले त्यात WHO सारखी संस्था पण चीनच्या ताटाखालचे मांजर झाले आणि सत्य लपवण्याचीच भूमिका घेतली त्याचा फटका जगाला आणि पर्यायाने भारताला पण बसला आणि हा "चायनीज कोरोना विषाणू" भारतात आला. पण तरी भारत सरकारने योग्य वेळी कडक भूमिका घेतल्या मुळे हा विषाणू भारतात अजूनही व्यापक झालेला नाही हे नक्कीच समजून घेतले पाहिजे.
दुसरा आरोप म्हणजे या विषाणूच्या "चाचण्या" वाढायला हव्या. या बाबतीत एकदम मात्र एकदम बरोबर की चाचण्या वाढवायला हव्यात, त्यांचा वेग पण वाढायला हवा, पण कसा? आणि चाचण्या कमी म्हणून रुग्ण कमी आहेत हे पटण्या सारखे वक्तव्य आहे काय? या "चायनीज कोरोना विषाणू" ने जगभर थैमान घातले आहे. आपल्या पेक्षा जास्त चाचण्या करणाऱ्या देशात पण मृतदेहांचा खच पडला आहे. म्हणजे चाचणी झाल्यावर पण त्याने मृत्यू दरावर काहीही परिणाम होत नाही. भारतात कमी चाचण्या होत असल्याने अनेक रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळत नाहीये असे गृहीत धरले तर भारतातील मृत्यूची सरासरी वाढायला हवी होती, कोणत्याही लिब्रांडू पत्रकाराने तशी कोणतीही आकडेवारी समाजासमोर आणल्याची माहिती अजून तरी नाही. एखाद्या जिल्ह्यात वर्ष भरात जितके मृत्यू होतात त्या पेक्षा जास्त मृत्यू होत असतील तर ते लपून राहणार आहेत काय? आणि पत्रकारांना जेव्हा रेल्वे खात्याचे अंतर्गत पत्र मिळवता येते तर ही मृत्यू संख्या पण नक्कीच मिळवता येईलच की नाही?
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत अजून एक चर्चिला गेलेला प्रश्न म्हणजे "अधिकारांचा"! स्थानिक प्रशासन, राज्य शासन यांना जादा अधिकार द्यायची भाषा राहुल गांधी यांनी केली. या संकटात केंद्र सरकारने राज्याचे किंवा स्थानीय प्रशासनाचे कोणते अधिकार हिरावले? उलट केंद्र शासनाने घोषित केलेल्या योजनांची योग्य अमलबजावणी करण्याची जवाबदारी ही विश्वासाने राज्य सरकारवर टाकण्यात आली, सोबतच ती जवाबदारी टाकतांना कोणताही पक्षीय भेदभाव पण केलेला नाही. या पूर्ण संकटकाळात केंद्र सरकारची भूमिका अजून पर्यंत तरी एका जवाबदार कुटुंब प्रमुखाचीच राहिली आहे, जो संकट काळात खंबीरपणे आपल्या कुटुंबाच्या मागे उभा आहे, अडीअडचणी वर मात करतांना संसाधन पुरवतो अशी. "लॉक डाऊन" करायचा की नाही करायचा, तो वाढवायचा की नाही वाढवायचा हे सगळे निर्णय राज्य सरकारनेच घेतली आहे. धन्याचा जास्तीचा केंद्रीय कोटा राज्यांना पाठवला आहे. मदत कार्यासाठी पैसा पण पुरवला आहे. काही ठिकाणी केंद्राने राज्याला बंदी घातली होती, जसे वैद्यकीय गोष्टी PPE किट, मास्क, व्हेटिलेटर्स या करता थेट खरेदी करता राज्याला मनाई होती किंवा आहे. पण मला वाटते याचे कारण वेगळे आहे. अगोदरच जगभरात मागणी वाढल्या मुळे या सगळ्या सामानाची टंचाई होती, त्यातच प्रत्येक राज्य सरकारने वेगवेगळी मागणी नोंदवली असती तर अजून वेगळी परिस्थिती तयार झाली असती. श्रीमंत राज्यांनी अधिक पैसे देत गरजेपेक्षा अधिक सामान मागवले असते, आणि गरीब राज्य कदाचित तसे करू शकले नसते. त्या पेक्षा केंद्राने एकदम मागणी नोंदवून समान हातात घेऊन ते राज्यांना देणे अधिक व्यवस्थित आणि सोपे झाले असेल. पण आपला राजकीय फायदा कशात आहे तितके बघण्याची सवय झालेल्या राजकारण्यांना या मागील हेतू लक्षात आला तरी बोलायचे नव्हते.
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थानांतरित मजुरांचा - कर्मचाऱ्यांचा हा काही आता फक्त भारता पुरता प्रश्न राहिलेला नाही, हा जागतिक प्रश्न आहे. अगदी युरोप असो की अमेरिका, पश्चिम आशिया असो की पूर्व आशिया जगातील सगळ्या खंडात आता स्थानांतरित मजूर-कर्मचाऱ्यांचा प्रश्न अश्या संकटकाळात अधिक भेडसावत असतो. भारतात उत्तर भागातून मध्य, पश्चिम आणि दक्षिणी राज्यात रोजी रोटी करता आलेल्या मजूर-कर्मचाऱ्यांचा आकडा मोठा आहे. संकटाच्या वेळेस कोणालाही आपल्या घरी आपल्या परिवारासोबत राहण्याची इच्छा होईल यात काहीही वावगे नाही. मात्र हा विषाणू संसर्ग एकत्रित गर्दीमुळे जास्त वाढण्याची भीती असल्या मुळे अशी गर्दी नियंत्रित राहावी म्हणूनच दळणवळणाची सगळी साधने बंद करून प्रत्येकाने आहे तिथेच राहण्याचे आवाहन सरकारने केले. त्या नंतर यातील गरीब मजुरांसाठी खाण्या पिण्याची अबाळ होऊ नये म्हणून त्यांना अन्न पुरविण्याची जवाबदारी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाची होती. विशेष म्हणजे नुसते पोटाची सोय करून भागणार नाही तर त्यांना मानसिक आधार देत राज्यातील परिवाराचा हिस्सा असल्याचा दिलासा पण आवश्यक आहे. सोबतच मुंबई-पुणे सारख्या जागेची टंचाई असलेल्या शहरात एकाच खोलीत २०-२५ लोक राहत असतील तर त्यांच्यातील काही लोकांना तात्पुरता निवारा उपलब्द करायची जवाबदारी पण राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाची होती. दुर्दैवाने काही राज्यात राज्य यंत्रणा या बाबतीत कमी पडली त्याचे खापर केंद्र शासनावर फोडणे कितपत योग्य आहे?. पण त्या करता अवास्तव मागण्या करण्यात काय अर्थ आहे? राहुल गांधी यांनी दर आठवड्याला १० किलो तांदूळ आणि आटा द्यायची मागणी अशीच अवास्तव नाही काय? याचा पण विचार व्हायला हवा.
"चायनीज कोरोना विषाणू" संकटा नंतर जगात आणि पर्यायाने देशात पण अभूतपूर्व आर्थीक संकट येणार आहे हे आपल्या घरचे ७-८ वितील लहान मुले पण सांगतात, हे सांगायला राहुल गांधी कशाला हवे? राहुल गांधी यांनी या संकटातुन बाहेर पडायला काही ठोस उपाय योजना किंवा त्याचे निदान प्रारूप तरी सांगायला हवे होते. पण ते न सांगता, सरकार या संकटाला तोंड देऊ शकेल काय? या वरच जास्त भर दिला. एक जवाबदार विरोधी पक्षाचा नेता म्हणून हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे.
इतके सारे बोलून, सरकारवर ताशेरे ओढून, आपले घोडे पुढे दामटायचा प्रयत्न करून पण एका विषयावर मात्र राहुल गांधी यांनी ना तोंड उघडले, ना त्यांच्या पत्रकार परिषदेत आमंत्रित केलेल्या स्वतंत्र विचारांच्या पत्रकारांनी त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले, ते म्हणजे "तबलिगी जमात" या संकटात जे अत्यंत घृणात्मकरीत्या समाजविरोधी वागणूक करत आहे त्या बद्दल. एरवी हिंदूंच्या कोणत्याही आवाहनाला भारताच्या एकतेच्या आणि तथाकथित सर्वधर्मसमभावाच्या विरोधात असल्याची बोंब मारणारे राहुल गांधी मात्र या विषयावर मौन राहिले. भारतातील महत्वचा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्याने, भारतातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर असलेल्या धार्मिक समूहाच्या आपल्या धार्मिक मान्यतेपाई समाजविरोधी वागण्यावर अजिबात टिकाटीपाणी न करणे हे काही योग्य गोष्ट नव्हे. अर्थात "तबलिगी जमात" च्या करनाम्यानवर आणि त्यामुळे वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर सत्य बोलणे ज्यांना आवडत नाहीये. या विषाणूच्या बाबतीत "तबलिकी जमात" ची फुटप्रिंट लपवायला म्हणून त्यांना "जमात" ऐवजी "सिंगल सोर्स" म्हणायला बाध्य पडणाऱ्या या पक्षाला मात्र "वाघ म्हंटले तरी खातो आणि वाघोबा म्हंटले तरी खातो" ही म्हण माहीत नसेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा