इकडे राज्यात लॉक डाऊन सुरू झाल्या पासून नागपुरात निदान माझ्या भागातील पान, नास्ता आणि चहाच्या टपऱ्या पूर्ण पणे बंद झाल्या आहेत. एकतर घराच्या बाहेर जात नाहीये, गेलो तरी ३-४ दिवसा आड भाजी घ्यायला किंवा दूध-दही घ्यायला जावे लागते म्हणून ही माहिती.
जवळच पोलीस स्टेशन आहे. त्या समोर दोन मोठ्या चहाच्या टपऱ्या होत्या ज्यावर सतत गर्दी असायची, एक तर पोलीस स्टेशनला कामाकरता येणाऱ्यांची किंवा पोलिसांची कामातील विरंगुळा म्हणून आपण करतो तसा सिगरेट आणि चहा! पण हे सगळे बंद झालेले आहेत. जवळच्या ३-४ बँका सुरू आहेत कमी कर्मचाऱ्यांमध्ये, माझ्या एका ब्रँचमध्ये कामा करता गेलो तेव्हा बोलतांना याच दुपारच्या चहा बद्दल बोलणे झाले होते, कारण पुन्हा टपरी बंद ना! एका कर्मचाऱ्यांचे घर जवळ आहे तो दुपारी घरी जाऊन थर्मास मध्ये चहा घेऊन येतो.
आता इतकं का सांगतो आहे? अहो, संपूर्ण महाराष्ट्राला "लॉक डाऊन" करणारे, रोज दूरचित्रवाणीवर येऊन "कडक भूमिका घ्यायला लावू नका" म्हणून दम भरणाऱ्या मुख्यमंत्र्याच्याच घरा जवळ म्हणे चहाची टपरी सुरू होती. त्याला "चायनीज कोरोना विषाणू" ची बाधा झाल्यामुळे आता राज्याच्या आरोग्य विभागाला मुख्यमंत्र्यांच्या राहत्या भागाला संपूर्णपणे लॉक करायची गरज निर्माण झाली......म्हणजे "दिव्या खालीच अंधार"!
असो, मुख्यमंत्री रोज "कडक भूमिका" ची धमकी देतात, पण यांच्या एका मंत्र्यांच्या भागात जनता काही "लॉक डाऊन" मनावर घेत नाही आणि तो मंत्री पण! राज्यात अनेक ठिकाणी काही समाजाचे लोक आपली धार्मिक स्थळे बंद करत नाही, पण मुख्यमंत्री काहीच कडक भूमिका घेत नाही. या सरकारच्या बांधणीत असलेले सुपर मुख्यमंत्री एकीकडे "निजामुद्दीन मरकज" प्रकरण का सतत दाखवतात म्हणून रडत आहेत आणि मुख्यमंत्री कडक भूमिका घ्यायची सोडून त्याच जमात सोबत चर्चा करत आहेत, डोमल्याची कडक भूमिका!
खंजीर, मर्द, मावळे, कावळे, ढान्या वाघ, कोथळा, निधडी छाती, दिल्लीश्वर, अफजलखान, फौज, राजीनामे तलवार...........इतक्याच बोलण्याच्या लायकीचे.
मुख्यमंत्री साहेबांनी इतकं तरी लक्षात घ्यावे की ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव तुम्ही पक्षाला दिले आहे ते पण गुन्हेगाराचा कोणताही मुलाहिजा न ठेवता कडक शासन करत होते, त्या मुळे निदान त्यांचा तरी आदर्श ठेवा आणि महाराष्ट्राला या "चायनीज कोरोना विषाणू" पासून वाचवा......पण त्या करता खरीच "कडक" भूमिका घ्यावी लागणार....
नाहीतर आहेच "दिव्याखाली अंधार!"
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा