"घरच सांभाळता येत नाही आणि निघाले जग जिंकायला" नेमका या म्हणीच्या अनुशंगाने महाराष्ट्र राज्याचा कारभार सुरू आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्रालय हे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सुधारवण्यासाठी आहे की बिघडवण्यासाठी हेच कळत नाही.
महाराष्ट्रात "लॉक डाऊन" सुरू झाल्या नंतर पण अजून तो पूर्णपणे लागू करू शकलेले नाही, रोजच्या रोज पोलीस वेग वेगळ्या शहरात विशिष्ठ वस्तीत, विशिष्ठ लोकांकडून मार खात आहे आणि विशेष म्हणजे त्या विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाहीये. अर्थात गृहमंत्री ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाच्या दुसऱ्या एका मंत्र्यांवर अपहरण करून मारझोड करण्याचा आरोप होतो आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री मात्र या प्रकरणाकडे कानाडोळा करतात. मात्र दिल्लीतील "निजामुद्दीन मरकज" प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालय कसे चुकले याचा हेत्वाआरोप मात्र बेंबीच्या देठा पासून करतात.
यातही पहिले एक केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नावाने एक पत्र बाहेर येते ज्यात केंद्रावर गंभीर आरोप लावलेले असतात. नंतर मात्र राज्याचे गृहखाते असे कोणतेही पत्र लिहले असल्याचे नाकारते. काय तमाशा चालला आहे असे म्हणे पर्यंत आता दुसरे पत्र बाहेर आले आहे.
इकडे सामान्य जनतेला लॉक डाऊन, जिल्हा बंदी करून घरात बसविले आहे. सामान्य माणूस काही कामा निमित्य जरी बाहेर पडला तर त्याला पोलिसी प्रसाद मिळतो, अर्थात यातून काही वस्त्या आणि विशिष्ठ धर्मीय वगळले आहेत म्हणा!
पण आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले वाधवान कुटुंबियांना गृह विभागाचे सचिव अभिताभ गुप्ता यांनी पत्र दिल्याचे समोर आले आहे, कशाकरता तर केवळ मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास करण्यासाठी!
आता राज्याच्या गृह मंत्रालयाचेच पत्र आहे म्हंटल्यावर कोण पोलिसवाला यांना अडवायची आणि गाडी खाली उतरवून दंडे मारायची हिम्मत करणार? या पत्राच्या भरवशावर ७ गाड्या भरून २७ जण महाबळेश्वरला पोहचले. तिथे या प्रकरणाचा बोभाटा झाल्यावर गृहमंत्री कानावर हात ठेवत पत्राबद्दल काहीच माहीत नाही असे म्हणतात, याला अर्थ आहे का? गृह मंत्रालयाच्या लेटर हेडवर कोणी थेट केंद्रीय गृहमंत्राल्यावर आरोप करणारे पत्र लिहतो आणि प्रसिद्धीस देतो, कोण गृहमंत्रालयचा सचिव यांच्या अपरोक्ष कुणाला कुठेही जायची परवानगी देतो! मंत्री नक्की काय करत आहे?
इथे राज्यातील मशिदी आपल्याला बंद करतांना दम लागत आहे. अजून मरकज प्रकरणातील काही मौलवी पकडल्या गेले नाहीये, त्या मुळे सध्या तरी ते कोरोनाचे चालते फिरते बॉम्बच बनले आहे. मग नक्की गृह मंत्र्यांचे काम काय? एकीकडे मुख्यमंत्री रोज पाणी पीत,"कडक भूमिका घ्यायला लावू नका" म्हणतात आणि स्वतःच्या मंत्र्यांवर पण कडक लक्ष ठेवत नाही.
खरे तर या आघाडी सरकार मध्ये आघाडीतील प्रत्येक पक्ष स्वतःचा अजेंडा सामोर ढकलत आहे. म्हणूनच जेव्हा शर पवार यांनी मरकजचे प्रकरण रोज दूरचित्रवाणीवर दिसते म्हणून रडगाणे गायल्या बरोबर गृह मंत्र्यांनी लगेच आरोपांची राळ उठविली, पण ती धूळ खाली बसताच, यांचेच हात किती बरबटलेले आहे हे ध्यानात येत आहे. राज्याचे गृह मंत्रालय आता तरी आपल्या राज्याचा कारभार गंभीरतेने घेईल याची आशा करू!




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा