राज्य कायद्याचे आहे की गुंडांचे ?

२०१७ मध्ये गाजलेले देव गायकवाड हे प्रकरण आठवते का हो? हे नाव फेसबुक वर प्रचंड गाजत होते. सरकारची बदनामी करायला म्हणून या साहेबांनी कोण्या एका प्रकरणात आपल्याला सरकार कडून चूप बसायला "लाच" द्यायचा प्रयत्न केल्याचा आरोप फेसबुकच्या माध्यमतुन करून खळबळ उडवली, सोबत पुरावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या OCD श्रीमती निधी कामदार यांच्या फेसबुक खात्या मधून आपल्याला ऑफर आल्याचे स्क्रीन शॉट दिले. प्रकरण गंभीर होते. या प्रकरणात सरकारची चांगलीच बदनामी होत होती. शेवटी निधी कामदार यांनी या प्रकरणात देव गायकवाड यांच्यावर खोटेपणा आणि बदनामीची केस नोंदवली. तेव्हा वेगळाच प्रकार समोर आला या देव गायकवाडने निधी कामदार यांच्या नावाने दुसरे फेसबुक खाते उघडून त्यातून हे मेसेज स्वतःलाच पाठविले आणि सरकारची बदनामी करायचा प्रयत्न केला. मग शोध सुरू झाला या देव गायकवडचा! त्या करता त्याला फॉलो करणारे, त्याच्या पोस्टी शेअर करणारे यांची विचारपूस पोलीस करायला लागले ते आवश्यकही होते कारण असा कोणता माणूसच अस्तित्वात नव्हता हे "फेक अकाउंट" म्हणजे खोट्या नावाने, खोट्या माहितीवर उघडलेले खाते होते. सहाजिकच सरकारला शिव्या द्यायला मिळतात म्हणून त्यात हेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोनिया काँग्रेसचे कार्यकर्ते अडकले. अर्थात पोलीस त्यांना बोलावून तुम्ही या देव गायकवाडला प्रत्यक्ष ओळखतात का? तुम्ही त्याच्या सोबत कधी बोलले आहेत का? कधी भेटले होते का? असली जुजाबी माहिती पोलीस घेत होते.
पण या चौकशीचा पण या समाज मध्यमावर असलेले राष्ट्रवादी मर्कट विरोध करायला लागले, याला असंवैधानीक, लोकशाहीची गळचेपी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच वगैरे बोलून काहूर माजवत होते. पण आपण खोट्याची साथ देत होतो आणि एखाद्याची आपण कोणताही पुरावा नसतांना अकारण बदनामी करत होतो याचे अजिबात त्यांना काही वाटत नव्हते.
कारण यांची "अभिव्यक्ती" ही तेव्हा मोठी होती, इतकी मोठी की देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला तेव्हा वाईट चिंतणे ही पण या नतद्रष्ट लोकांची अभिव्यक्ती होती, हेच लोक होते जे "मुख्यमंत्री साहेब आम्ही आरक्षण मागतो........नाही" सारखे अत्यंत हीन पातळीचे वाक्य बोलणार्याचे वाहवा करत हिंडत होते कारण ती त्यांची निर्लज्ज अभिव्यक्ती होती.
पण आज जेव्हा त्यांचा एक नेता दुसऱ्याच्या "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे" हनन करतो तेव्हा मात्र हे त्या नेत्याचे मात्र कौतुक करत आहे. हा नेता म्हणजे जितेंद्र आव्हाड! जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यातील एकाने आक्षेपाहार्य पोस्ट टाकली म्हणून त्याला घरून उचलून, बेकायदेशीरपणे आपल्या बंगल्यावर नेऊन, ज्यांना कायदा संभाळण्याचे काम असते त्याच पोलिसांच्या हातून बेदम मारहाण करविली.
राष्ट्रवादीचा छूटभय्या गल्ली कार्यकर्त्याने असे केले असते तर एकवेळ चालले असते, राज्याचा मंत्री म्हणून ज्याच्यावर राज्याच्या कायद्यांचा आदर करण्याची आणि पाळण्याची जवाबदारी आहे त्याने असली गुंडगिरी करावी आणि एखाद्याला बेशुद्ध होई पर्यंत मारायला लावावे हे कितपत योग्य आहे? बरे या जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडी अगदी भडभुंज्यांच्या दुकानात भट्टीत लाह्या फुटाव्या तसे संविधान, अहिंसा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, शाहू महाराज, महात्मा फुले यांची नावे येत असतात, लोकांना वाटते काय संत माणूस आहे! पण हे प्रकरण बघता जितेंद्र आव्हाड यांना वर नावे घेत असलेल्या मोठ्या लोकांबद्दल काहीच वाटत नाहीच पण कायदा आणि संविधान यालाही हा माणूस जुमानत नाही.
ज्याला मारहाण केली त्याने चुकीची, हीन दर्जाची पोस्ट टाकली हे जरी मान्य केल, अगदी १०१% मान्य पण मग त्याच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल करायची ना. आहो तुमचेच राज्य आहे, तुम्ही मंत्री आहात पोलिसांना हलवून लगेच न्यायालयात खटला दाखल करायला लावायचा! मंत्री म्हणून कायद्याचे पालन करायचे की अशी सडकछाप गुंडगिरी करायची?
कायद्याचे राज्य, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही नाव तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर घेऊच नये. कारण या असल्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाला जो मंत्री असून देशाच्या, राज्याच्या कायद्यालाच फाट्यावर मारतो, त्याला मोठा करण्यात, त्याची कायदा मोडण्याची हिम्मत वाढवण्यात तुमचा सगळ्यात मोठा हात आहे, कारण तो तुमच्या पक्षाचा आहे, तेव्हा असली पोपटपंची बंद करावी हेच बरे!
आणि राज्याचे मुख्यमंत्री साहेब तरी हे सगळे कसे खपवून घेत आहेत? आपल्या मंत्रीमंडळातील एक मंत्री एका माणसाला घरून अपहरण करून नेतो आणि येथेच्छ तुडवतो याला तुम्ही कायद्याचे राज्य म्हणता काय? असल्या गुंड लोकांवर कारवाई करायला तुम्ही घाबरता काय? तिकडे तुमच्या पक्षाचा तथाकथित चाणक्य तुमच्याच पक्षाच्या मुखपत्रात "तलवारीची धार गेली नाही" म्हणून राज्याला सांगत आपली बेटकी फुगवतो, आणि इकडे तर तलवारी जाम गंजून खलास झालेल्या दिसत आहे! सत्तेच्या मोहात राज्यात असली गुंडगिरी किती चालवून घेणार आहे?

टिप्पण्या