नाव लपवण्याचे राजकारण


                                                        आम्ही १९४७ साली झालेल्या तथाकथित महात्म्याच्या हत्येला जवाबदार एका माथेफिरुच्या जातीचा आधार घेत आजही लोकांना अपमानित करू, राजकीय फायदा उचलू, काहीशे वर्षांपूर्वी असलेल्या आज कोणीही पाळत नसलेल्या चुकीच्या परंपरांचे ओझे आजच्या पिढीवर टाकू, २००२ मध्ये झालेल्या दंगलीची आजही आम्ही उसासे टाकत आठवण काढू. पण "निजामुद्दीन मरकज" सारखा अत्यंत घातक बेजवाबदारपणा मात्र दाखवला आम्ही प्राणपणाने विरोध करू. 

                                                         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहना नंतर टाळ्या वाजवणारे शरद पवार पाहून अनेकांना त्यांच्या विषयी प्रेमाचे भरते आले होते. पण या "हाताची थुकी त्या हातावर करण्यात" ज्यांचा जन्म गेला आहे ते कधीच सुधारणार नाही याची थोडी जाणीव असायला हवी होती. 

                                                                                   आज "निजामुद्दीन मरकज प्रकरण" दुरचित्रवाहिन्या सतत दाखवत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. अर्थात यांचे राज्य असते तर "निजामुद्दीन मरकज" प्रमाणे एखाद्या मंदिरात पण असा देखावा उभा करून त्यांनी यात पण सर्वधर्मसमभाव जपला असता, जसा मुंबई सखळी स्फोटात हातचा एक बॉम्ब स्फोट त्यांनी घडवून आणला असता तसा, नाही तर माहिती लपविली असती जशी "राधाबाई चाळ" आज सगळ्यांच्या विसमरणात गेली तशी!

                                                                               शरद पवार आणि त्यांचा चेला जितेंद्र आव्हाड आज या "मरकज" प्रकरणा मुळे चिडले आहेत का?? तर नाही पण त्या प्रकरणाच्या होणाऱ्या प्रसिद्धी मुळे चिडले आहेत. ही त्यांना एका समाजाची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न आहे असे वाटत आहे. वरून दिशाभूल करणारे वक्तव्य हे की या कार्यक्रमाला सरकारने परवानगीच दिली कशी? वर आमच्या सरकारने औरंगाबद आणि वसई मध्ये आधीच या कार्यक्रमाला परवानगी कशी नाकारली या बद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहे.

                                                                           आता या वक्तव्याचा विचार केला तर "मरकज" मध्ये कार्यक्रम करायला कोणीही कोणतीही परवानगी घेत नव्हते, त्या मरकज मध्ये कधीही कमीत कमी ३ ते ४ हजार लोक सतत उपस्थितीत असतात, हे मी नाही म्हणत आहे जरा "तबलिगी जमात" च्या वकिलांचे म्हणणे ऐका एकदा हे त्यांचेच वक्तव्य आहे. कारण मरकज ही त्यांची स्वतःची जागा आहे त्यात कोणी काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. 

                                                                              महाराष्ट्रात या तबलिगी जमात वाल्यांना मोठ्या प्रमाणावर असा कार्यक्रम करायला स्वतःची मोठी जागा नसल्यामुळे त्यांना सार्वजनिक मैदाने वगैरे वर हा कार्यक्रम करावा लागतो, आणि त्या करता सगळ्या सरकारी परवानग्या घेणे आवश्यक असतात, आणि म्हणून महाराष्ट्रात सरकार परवानगी नाकारू शकले ही वस्तुस्थिती आहे. सोबतच वसई येथे हा कार्यक्रम मार्च महिन्यात करायला "कोरोना" च्याच कारणा साठी काही संस्थांनी विरोध केला होता म्हणून पोलिसांनी परवानगी मागे घेतली, राज्य शासनाचा यात काहीच हात नाहीये

                                                                           पुन्हा महत्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमा साठी "टूरिस्ट व्हिसा" वर आलेले विदेशी जमाती हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातील मशिदींमध्ये लपलेले सापडले, महाराष्ट्रा पोलीसचे "गुप्त वार्ता" खाते नक्की काय करत होते? त्या विदेशी जमातींचा "व्हिसा" खरेच महाराष्ट्रा करता मिळाला होता का? त्यांच्यावर नक्की काय कारवाई झाली? ह्या प्रश्नांची उत्तरे यांच्याच सरकारने अजून गुलदस्त्यातच ठेवली आहेत, हे मात्र शरद पवार उघड करणार नाही.

                                                               सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोरोनाचे भारतात आगमन झाल्यानंतर दोन्ही सरकारच्या हेल्थ विभागाने जनतेला जी मार्गदर्शक तत्वे आमलात आणायला सांगितली त्याची खिल्ली उडवणारे आणि आपल्या धार्मिक भावना थोपण्याचे अंधश्रद्ध चलचित्र जे समाज माध्यमांवर फिरत होते त्यांना अडवायला सरकारने वेळीच काहीच कारवाई का नाही केली? राज्यात लॉक डाऊन केल्या नंतर पण राज्याच्या मुस्लिम बहुल क्षेत्रात त्याचे पालन केल्या गेले नाही या विरोधात राज्य सरकारने काय कारवाही केली, याचे उत्तर पण शरद पवार देतील काय? 

                                                                           शरद पवार या सगळ्या प्रश्नांवर उत्तर देणार नाही, कारण "शुक्रवारी मुस्लिम आपल्याच धार्मिक स्थळात स्फोट करणार नाही" या वर त्यांची चांगलीच अंधश्रद्धा आहे आणि मालेगाव येथे यांचाच सरकारने केलेला "लॉक डाऊन" मोडत राजरोस आपले हात्मागचे कारखाने चालवणाऱ्या लोकांवर कारवाई केली म्हणून राज्य पोलिसांवर यांचेच सरकार कारवाई करते आहे, म्हणजे "पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि वेश्येला मणीहार" घालायची यांची वृत्ती!

त्या मुळे शरद पवार यांना "निजामुद्दीन मरकज" प्रकरण सतत दाखवण्याचे दुःख होणे सहाजिकच आहे. असो, तुम्ही मात्र सजग रहा आणि अश्या लोकांवर बारीक लक्ष ठेवा.

टिप्पण्या