इस्लामी एकी आणि हिंदूची फूट


इथल्या किती हिंदूंना माहीत आहे की "तबलीकी जमात" हा मुस्लिम धर्मा मधला एक "पंथ" आहे, जसे बोहरा, वहाबी, अहमदिया वगैरे तसा! 

या पंथाचे अनुयायी भारत, पाकिस्थान, बांगलादेश, मलेशिया, चीन या देशात मोठ्या प्रमाणावर आहे. 

पण या "तबलीकी जमात" चे पण दोन तुकडे आहे बर यांचे पण आपसात पटत नाहीये, पहिला आणि मुख्य जो आता गाजत आहे तो दिल्लीतील निजामुद्दीन स्थित मजलीस वाला, आणि दुसरा भोपाळ येथून कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशची राजधानी ढाका इथे त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी आपसातच मोठी दंगल केली होती.

पाकिस्थानात पण लाहोर आणि रावळपिंडी असे आणखी दोन तुकडे या "तबलीकी समाज" चे आहे, त्याची पण आपसात मारामारी होते. मुख्य म्हणजे देवबंद आणि बरेली वाले इस्लामी यांना "गलीज" म्हणजे "गये गुजरे" मानतात, म्हणजे इस्लामी जगतात यांच्यात बरेच मतभेद आहेत आणि एकमेकांचा जीव घेतील इतकी भांडणे सुद्धा....!

याच निजामुद्दीन स्थित "तबलीकी जमात" चा मुख्य मौलाना साद ज्याला आज पोलीस सगळीकडे शोधत फिरत आहे त्याने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका "तकरीर" मध्ये खऱ्या इस्लामचे संकेत धूडकावत मक्का, मदीना यांच्या नंतर निजामुद्दीन स्थित "तबलीकी जमात" च्या मरकज ला इस्लामचे मोठे "तीर्थक्षेत्र" म्हणून संबोधित केले होते, इस्लामी जगात या वरून मोठा गदारोळ झाला होता. 

पण आज जेव्हा हे "तबलीकी जमात" वाले धार्मिक कारणामुळे अडचणीत आले आहे तेव्हा इस्लामी जगतातला एक तरी मुस्लिम यांच्या विरोधात बोलत आहे का? उलट समाज माध्यमांवर इतरांना या "जमात" विषयी माहिती कशी नाही, हा मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा डाव कसा आहे हे समजवून सांगत आहे आणि आपले भारतीय लिब्राडू पण त्यांच्या "मुस्लिम बदनामीच्या" थियरीला उचलून धरत आहे. 

आणि महत्वाचे म्हणजे हिंदू धर्मातल्या एखाद्या कडून असली चूक झाली असती तर........त्याचा पंथ किंवा विचारसरणी, जात शोधून धु धु धुतला असता...आणि आपले मूर्ख हिंदू पण वैदिक-अवैदिक, सुवर्ण-बहुजन, मूलनिवासी सारख्या भारतात लागू न होणाऱ्या थियऱ्या घेऊन बोंबा मारणार आणि हे सगळे हिंदूंच्या डोक्यात भरवणारे कोण तर डावे लिब्राडू, जमाते इस्लाम आणि याच तबलीकी जमात वाले तथाकथित विचारवंत!

अहो साधे तिरुपती बालाजी मंदिर उशिरा "लॉक डाऊन" झाले याचे दाखले आज या "तबलीकी जमात" ची बाजू घेतांना आपले हिंदूच मांडत आहे ते पण पूर्ण माहिती न घेता. पण खरे काय आहे? खरे हे की १४ तारखेला स्थानीय प्रशासनाने जी मार्गदर्शक तत्वे घालून दिली होती ती त्याचे पालन तिरुपती बालाजी मंदिर प्रशासना कडून केल्या गेले आणि म्हणून भाविकांची गर्दी कमी करत ती ३ ते ४ हजारा पर्यंत मर्यादित केल्या गेली, पण दोन दिवसांनी जेव्हा स्थानीय प्रशासनाने शहरात पास घेणाऱ्या भाविकांची झुंबड नको असे म्हणले तेव्हा मंदिर प्रशासनाने "दर्शन" पूर्ण पणे बंद करत संपूर्ण "तिरुमला" परिसर रिकामा करून दिला आणि सोबत हे पण लक्षात घ्या की "तिरुपती बालाजी मंदिर" जरी आपण म्हणत असलो तरी मंदिर परिसर तिरुपती शहरा पासून दूर "तिरुमला" पहाडा वर वेगळा आहे, आणि मोठा आहे ३ -४ हजाराचा जमाव तिथे "सोशल डिस्टनसिंग" पाळून पण आरामात दर्शन घेऊ शकला असता, जे जाऊन आहेत त्यांना पटेल.

पण आपण "इस्लामी" थोडेच आहोत की, चूक असणार्याला तो मुस्लिम आहे म्हणून पाठीशी घालायला.

पण हे सगळं लक्षात आपण कशाला घ्यायचे!

आणि त्या हुन पुरोगामी लिब्राडू हलकटपणा म्हणजे आजचा लोकसत्ताचा अग्रलेख आहे. राज्य - देश "लॉक डाऊन" झाल्या पासून आलेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखत स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत देशभरातील समस्त मंदिर आणि धार्मिक कार्यक्रम रद्द केल्या गेले आहेत. "गुडीपाडवा" हा "हिंदू नववर्षाचा" पहिला दिवस म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक रित्या साजरा केला जातो, अनेक सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते या दिवशी! तसेच सध्या "चैत्र नवरात्र" सुरू आहे. इकडे नागपुरात नऊ दिवस "रामाचे नवरात्र" म्हणून धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते आणि राम नवमीच्या दिवशी तर अवघी नागपूर नगरी "अयोध्या" होते. ७० वर्षाची परंपरा असलेली शोभायात्रा जी राममंदिर विवादात पण रद्द झाली नव्हती ती आज रद्द आहे आणि हलकट लिब्राडू लोकसत्ता कार हिंदूंच्या या धार्मिक बलिदानाकडे किंवा धार्मिक सुधारणेकडे दुर्लक्ष करून हिंदूंना "निधर्मवादी" होण्याचा सल्ला देत आहेत, कारण त्यांची मुस्लिम तबलीक जमातला त्यांची अक्षम्य चूक दाखवत खरे बोलण्याची हिंमत नाही, असले वांझोटे संपादक नक्की कोणत्या पद्धतीने लोकशाहीचा आधार होणार आहे?

टिप्पण्या