तुमच्या पैकी किती लोकांना १९८९ मध्ये चीनची राजधानी मधील थीयामेन चौकात झालेले हत्याकांड माहीत आहे? चिनी विद्यार्थ्यांचे हे आंदोलन एप्रिल १९८९ मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाचे माजी महासचिव आणि उदार सुधारणावादी हू याओबांग यांच्या मृत्यू नंतर सुरू झाले होते. हू चीनच्या रूढीवादी आणि सरकारच्या राजनीती, आर्थिकनीतीच्या विरोधात होते. अंतर्गत निवडणुकीत हू याओबांग हरल्या मुळे त्यांना पदमुक्त केले होते. १५ एप्रिल १९८९ या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. चीन सरकारच्या म्हणण्यानुसार ८ एप्रिल ला त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा ते चीनच्या शैक्षणिक बदलांवर काम करत होते. पण त्यांच्या मृत्यू नंतर चिनी विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आणि राजधानी बीजिंगच्या थीयामेन चौकात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. ४ जून १९८९ या दिवशी चिनने या आंदोलनाला चिरडण्यासाठी सैन्य कारवाई केली. या सैन्य कारवाई नंतर ५ जून १९८९ ला अधिकृत रित्या चीनने सांगितले की या आंदोलनाच्या विरोधात केलेल्या कारवाईत २०० नागरिक मारल्या गेले आणि जवळपास ७००० लोक जखमी झाले. या आंदोलनावरील कोणतीही माहिती प्रसारित करण्यात किंवा या बाबत चर्चा करण्यात किंवा शालेय पाठयक्रमात या विषयी माहिती देण्यास पूर्णपणे बंदी आहे. पण मानवाधिकार क्षेत्रातील जाणकार लोकांचे म्हणणे आहे की या आंदोलनात कमीत कमी १०,००० सामान्य जनता ज्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी होते मारल्या गेले आणि यात नक्कीच तथ्य असेल कारण आपण नुकतेच हॉंगकॉंग मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन चीनने कश्या प्रकारे चिरडले ते आपण बघितलेच आहे. पण आज हे का सांगत आहे ? " शिळ्या कढीला उत" का?
कारण जगभरात आणि देशात थैमान घालत असलेला "चायनीज कोरोना व्हायरस"! साधारण फेब्रुवरी मध्ये "कोरोना व्हायरसचा" प्रादुर्भाव वाढल्या मुळे चीनने वुहान आणि हे शहर ज्या राज्याची राजधानी आहे ते हुबई प्रांत पूर्णपणे "लॉक डाऊन" केला. अजूनही वुहान मधुन कोणीही नागरिक शहराच्या बाहेर जाऊ शकत नाही, तसेच हुबेई प्रांतात पण बाहेरून यायला आणि बाहेर जायला बंदी आहे. तिथे त्या मुळे अनेक ठिकाणी दंगली सुरू आहेत, पण चीन सरकार फक्त त्यांना दाखवाव्या वाटतात त्याच बातम्या जगासमोर आणत आहेत आणि त्याच मुळे तुम्हाला फक्त वुहान मध्ये वैद्यकीय सेवा देऊन वापस जाणाऱ्या लोकांचे नागरिक आभार व्यक्त करणारे छायाचित्र आणि चलचित्र दिसत आहे. पण यु ट्यूब वर अश्या दंगलीची, तेथील जनतेचया असंतोषाची काही चलचित्र तुम्ही बघू शकता. पण मला खात्री आहे की निर्दयी चिनी प्रशासन हा सगळा असंतोष नक्कीच मोडून काढेल.
मुळातच सध्या कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नसलेल्या या "चायनीज कोरोना व्हायरस" चा संसर्ग थांबवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे "लॉक डाऊन"! चीनने हा मार्ग हुबेई प्रांतात आणि वुहान शहरात अत्यंत निर्दयी पणे आमलात आणला. अर्थात चीनचा जुना इतिहास बघता चिनी प्रशासन आपली कोणतीही योजना अत्यंत निर्दयीपणेच आमलात आणते. पण वुहान आणि हुबोई प्रांतातून "कोरोना" चे रुग्ण कमी होत आहेत ही बातमी जेव्हा भारतात आली तेव्हा मात्र चीनने केलेल्या कोरोना विरोधात केलेल्या उपाय योजनांची तोंड फाटेस्तव स्तुती इथली काही प्रसार मध्यम करत होती, BBC हिंदीने तर लोकशाही देश अश्या प्रकारे काही करूच शकत नाही, या प्रकारचा लेखच टाकला होता.
पण एकीकडे चीनचे कौतुक करत असतांनाच भारतात मात्र या "लॉक डाऊन" मुळे काहींना अतिशय दुःख झाले आहे. भारताचे भावी पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाचे राजकुमार यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या "लॉक डाऊन" पेक्षा दुसरा पर्याय निवडा असा सल्ला दिला, पण या कोणताही इलाज नसलेल्या रोगावर दुसरा पर्याय कोणता? हे सांगायला मात्र ते विसरले.
खरे तर अमेरिका, ब्रिटन सारख्या श्रीमंत देशांनी आपल्या नागरिकांच्या जीवा पेक्षा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला जास्त महत्व दिले आणि देशाला "लॉक डाऊन" करायला वेळ घेतला, त्याचे फळ म्हणून आज अमेरिकेत १ लाखाच्या वर जनता या व्हायरसची शिकार आहे. ब्रिटन मध्ये तर तेथील राजघराण्यात या विषाणूने शिरकाव केला आहे, तेथील पंतप्रधान आणि स्वास्थमंत्री पण या विषाणूने बाधित झाले आहे.
मुळे या कोणत्याही देशांपेक्षा अविकसित आणि गरीब भारत देशात संपूर्ण देश "लॉक डाऊन" करण्यासारखा निर्णय घेणे हे खूप मोठे धाडस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो निर्णय घेतला, इतकेच नाही तर या "लॉक डाऊन" मुळे समोर येणाऱ्या समस्या लक्षात घेत काही निर्णय अगोदर आणि काही नवीन समस्या समोर आल्यावर त्वरित निर्णय घेत सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि करत आहेत. भारतातील प्रत्येक राज्य सरकारने पण आपल्या आर्थिक प्रगती पेक्षाही आपल्या नागरिकांचे जीव वाचवणे हेच लक्ष निर्धारित केले आहे. मुख्य म्हणजे याला बहुसंख्य जनतेचा पाठिंबा पण मिळत आहे. अर्थात मोठी लोकसंख्या, अज्ञानता आणि गरिबी ही भारतातील मोठी समस्या या काळात पण समोर येत आहे. भारतातील अनेक नागरिक आणि संस्था या गारीबांकरता मदत करत आहे. याच सगळ्या प्रयत्ना मुळे भारतात अजून तरी "चायनीज कोरोना व्हायरस" चा संसर्ग अजून जगातील इतर देशांप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर झालेला नाही.
भारतातील लिब्राडू जमातीला मात्र हे चित्र फारसे मानवलेले दिसत नाही. जसे चीन १९६२ मध्ये भारताचा तारणहार वाटत होता, कदाचित हा "चिनी व्हायरस" पण त्यांना त्यांचा "तारणहार" वाटत असणार. भारतात मोठ्या प्रमाणावर हा विषाणू पसरेल आणि मग आपण सरकार विरोधात रान उठवू अशी स्वप्न हे बघत असतील. मात्र भारत सरकारने संपूर्ण देश "लॉक डाऊन" करत त्यांचे स्वप्न धुळीला मिळवले. जेव्हा भारतात या विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात आला तेव्हाच सरकारने पावले उचलायला सुरवात केली. पण BBC हिंदी ने सांगितल्या प्रमाणे लोकशाही देश असल्यामुळे तेव्हा ती पावले कडक नव्हती. तेव्हा हीच लिब्राडू सरकारला चीनचे उदाहरण देत होते. आता सरकारने "लॉक डाऊन" केल्यावर हा निर्णय कसा असंवैधानिक आहे या वर रकाने भरल्या जाऊ लागले आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या "मन की बात" या कार्यक्रम भारतीय जनतेची या "लॉक डाऊन" मुळे होणाऱ्या त्रासा बद्दल माफी मागितली, करताही त्यांची खिल्ली उडविल्या जात आहे. जगभर या विषाणूमुळे भयभीत भारतीय जे आपल्या कामाकरता, शिक्षणा करता किंवा तीर्थ यात्रे करता विदेशात गेले होते, त्यांना तेथून सुखरूप मायदेशात वापस आणण्याची कठीण कामगिरी पण या सरकारने उत्तम पद्धतीने पार पडली. तेव्हा हेच लिब्राडू या लोकांना वापस आणा म्हणून घसा कोरडा करत होते, आज तेच लिब्राडू सरकारने विदेशातून येणाऱ्या लोकांना का थांबवले नाही म्हणून प्रश्न विचारत आहे. खरे तर या लोकांनी भारतात परत आल्यावर स्वतःला काही दिवस समाजापासून वेगळे राहावे हे सांगितल्या गेले होते पण भारताची "लोकशाही" मध्ये आली. पण आता लिब्राडू याच सगळ्या वरून आणि पंतप्रधानांनी मोठ्या मनाने मागितलेल्या माफी वरून त्यांच्या वर आरोप करत आहेत.
मात्र लिब्राडू हे विसरले की आम्ही भारताचे एक पंतप्रधान असेही बघितले की त्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी भारतीय जनतेवर "आणीबाणी" लावत भारतीय लोकशाहीचा बळी घेतला, पण कधी त्या बद्दल चुकूनही माफी मागितली नाही. हेच लिब्राडू त्या काळाला "अनुशासन पर्व" म्हणत डोक्यावर घेतात, पण आज मात्र स्व अनुशासनाची खरी गरज आहे पण त्याना ते अनुशासन नको आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा