या "चायनीज कोरोना संकटात" समाजाचा चेहरा समोर येत आहे. भारतात राजकारण तर अगदी नसानसात वाहते, कोणत्याही घटनेचे राजकारण करण्यात भारतीयांचा हात कोणी पकडू शकत नाही. त्यातही धर्म, जात, संघटन असे अनेक कोन त्यात असतात.
गेले दोन दिवसात मुस्लिम समाजाने मोडलेली "संचारबंदी" आणि कर्तव्य बजवणारे पोलीस आणि डॉक्टर यांच्यावर केलेले हल्ले गाजत आहेत. हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात होत आहे.
बिहार मधील पटना येथे मशिदीतून चिनी, चंद्रपूर येथील मशिदीतून तुर्की मौलवी सापडले, अजून काही भागातून अश्या बातम्या येत आहे. हे विदेशी मौलवी येथे कशाला आले होते? पूर्ण देश बंद झाला असतांना यांना त्यांच्या देशात परत जायचे नव्हते का? बरे हे विदेशी मौलवी कायदेशीरपणे आले होते की बेकायदेशीर? कायदेशीर पणे आले होते तर याची खबर स्थानिक पोलीस प्रशासनाला नव्हती का? असे अनेक प्रश्न यातून मनात येत आहेत. भारताची खरेच धर्मशाळा बनवली आहे का? CAA आणि NRC चा विरोध आपली ही थेर लपवण्यासाठी होत आहे का? या वर केंद्र आणि राज्य सरकार नक्की काय कारवाई करणार?
मोहनदास करमचंद गांधी यांनी भारतात आपल्या राजकीय जीवनाची सुरवात "खिलापत चळवळीने" केली. खरे तर तुर्कस्थान मधील "खलिपा" पद आणि भारतातील मुस्लिम यांचा काहीही संबंध नव्हता, किंवा तत्कालीन काळात या घटनेचा भारतीय मुस्लिमांवर काही प्रभाव पडला नव्हता. पण इंग्रजांच्या विरोधात आपल्या "असहकार आंदोलनाला" गांधींनी "खिलापत चळवळीशी" जोडून भारतीय मुस्लिमांना त्यांनी जागतिक मुस्लिम राजकारणात आणलेच पण त्याच्यात कट्टरतावाद आणि मुल्ला-मौलवी यांचे वर्चस्व पण वाढवले. आता हे कधाचीत गांधींसाठी "करायला गेलो एक" सारखी स्थिती असेल. पण या नंतर पण मुस्लिम समाजातील हा कट्टरतावाद कमी करण्याचा प्रयत्न केला गेला नाहीच पण सोबत "धर्मनिरपेक्ष" शब्दाखाली त्याला खतपाणीच घातल्या गेले. ही होती पहिली चूक!
याचा परिणाम काय झाला तर देश स्वातंत्र्य होत असतांना देशाचे दोन तुकडे धर्माच्या नावावर केल्या गेले. पाकिस्थान नावाचे एक कायमचे कट्टरतावादी दुखणे स्वतःच्या बाजूला बसवले गेले. पण स्वातंत्र्या नंतर पण या "सर्वधर्मसमभाव" शब्दाने भलतेच गारुड केल्या गेले. त्या मुळे इतर धर्मा प्रमाणे "मुस्लिम धर्म सुधारणा" हा विषय कधीच बाहेर आला नाही. उलट "शहाबानो प्रकरणात" तर भारतीय संविधान आणि भारतीय न्यायव्यस्था गुंडाळून ठेवत भारतीय संसदेला या मुस्लिम कट्टरतावादा समोर नतमस्तक व्हावे लागले. बरे हे कशाला तर फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी! मोहनदास गांधी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिमांची साथ हवी या उदात्त विचारत "खिलापत चळवळची" साथ घेतली अस म्हणून एक वेळ या चुकी कडे दुर्लक्ष करू. पण स्वातंत्र्य नंतर सत्ताधारी काँग्रेसने आपली राजकीय फायद्यासाठी अल्पसंख्यांक समूहा मधील सगळ्यात मोठ्या समूहाच्या धार्मिक कट्टरतेकडे नुसतेच दुर्लक्षच केले नाही तर त्याला खतपाणी घातले.
"इस्लाम खतरे मे" हा परवलीचा नारा झाला. या ७० वर्षात हिंदू धर्मात अनेक धर्म सुधारणा या कायद्याचा बडगा दाखवून करण्यात आल्या, पण तसा प्रकार मात्र मुस्लिम धर्मा बाबत करण्यात मात्र कचरले. याच मुळे मग देशाच्या कायद्याची पायमल्ली करण्यात या समाजातील काही लोक आनंद मानू लागले.
त्यातही काँग्रेसची ताकद देशात कमी झाल्यावर नव्याने तयार झालेल्या स्वतःला समाजवादी म्हणवणाऱ्या नेत्यांनी तर कहर केला. सौदीतून येणाऱ्या पैशावर उभ्या राहणाऱ्या मशिदी आणि त्यात पोसले जाणारे मुल्ला-मौलवी ज्यांना भारतातील इतर समाजाशी काही देणेघेणे नव्हते, त्यातच या सत्तेच्या दरवाज्यावर उभ्या राहिलेल्या या नवीन चाणाक्ष नेत्यांनी काँग्रेसच्याच कित्ता गिरवत मुस्लिम मनाच्या "इस्लाम खतरे मे" च्या भीतीचा फायदा घ्यायला सुरुवात केली.
भारतात हे सुरू असतांनाच जागतिक पटलावर पाश्चिमात्य देशांचे तेलाचे राजकारण आणि मुस्लिम देशांचे वर्चस्ववादी राजकारण यात चांगलाच धार्मिक रंग दिल्या गेला. त्या मुळे आधीच आक्रमक असलेला इस्लाम अजून आक्रमक पणे "वहाबी जिहाद" च्या मगरमिठीत सामावला आणि त्याचेही पडसाद भारतात पडायला लागले.
त्यात सत्व गमावलेल्या काँग्रेसने आणि डाव्या लिबरडूंनी दुसरी चूक ही पुन्हा जाणून बुजून केली ती म्हणजे सरकारने आणलेल्या CAA आणि न आणलेल्या NRC विरोधात खोटे नाटे दावे करत या आधीच विखार भरलेल्या मुस्लिम समाजाला अजून धार्मिक कट्टरतेकडे सरकवले.
आता परिस्थिती इतकी खराब झाली आहे की "चायनीज कोरोना व्हायरस" सोबत लढाईचा भाग म्हणून सरकारने "सोशल डिस्टन्स" चा उपाय म्हणून हात मिळवू नका, एकमेकांची गळाभेट घेऊ नका सांगितले, बरे सरकार ने हे स्वतःच्या मनाने नाही तर डॉक्टर - वैज्ञानिक आणि जागतिक स्तरावरील अनुभवातून सांगितल्यावर अनेक मुस्लिमांनी यावर धर्माचा हवाला देत विरोध करणारे व्हिडीओ टाकले.
एकत्र आल्यामुळे या विषाणूचा प्रसार अधिक होतो. त्या मुळे सगळ्या धर्माची प्रार्थना स्थळे बंद करण्याचा आणि जनतेने घरी राहण्याचा आदेश काढल्यावर पण या समाजाने त्या आदेशाची अहवेलना फक्त धार्मिक कारण समोर देत केली. इतके करूनही एका प्रतिष्ठित मौलविने आपापल्या घरात एकट्याने नमाज करण्याचे आवाहन केले त्याला पण आपल्या हेकेखोर पणाने यांनी हरताळ फासले.
आश्चर्य या गोष्टीचे आहे की हिंदूंना सतत त्यांच्या श्रद्धा आणि अंधश्रध्दांवरून धारेवर धरणारे आणि त्या वर विनोद करणारी डावी लिब्राडू मात्र मुस्लिम समाजाच्या या जीवघेण्या आणि इतर समाजाचा पण जीव धोक्यात घालणाऱ्या धार्मिक प्रेमाबाबत मात्र तोंडात मूग गिळून बसली आहे. इतकेच नाही तर इतर वेळेस आपले समाजप्रेम आणि आपण किती पुरोगामी, सुधारक आहोत हे सिद्ध करायला वेळोवेळी हिंदू आणि हिंदुत्वाला बदनाम करणारे जावेद अख्तर, शबाना आजमी सारखे बडे मुस्लिम चेहरे पण या बाबतीत आपल्या समाजाला काहीही शिकवण देत नाहीये. मुस्लिम समाजाच्या खऱ्या खोट्या अधिकारा साठी आवाज उठवणारे मुस्लिम नेते तर सध्या पार कोमात गेले आहे, तर काही या समाजाच्या या वेड्या धार्मिक वेडात सहभागी होत आहे. पण या पाई देशाच्या आणि समाजाच्या स्वास्था सोबत आपण खेळत आहोत याचे भान मात्र कोणालाच नाही.







टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा