"चायनीज कोरोना व्हायरस" आणि चिनी महत्वाकांक्षा

                         आपल्या देशात कोणाला कोणाविषयी प्रेमाचे भरते येईल ते सांगता येत नाही! "चायनीज कोरोना व्हायरस" चा भारतात प्रभाव वाढायला लागला आणि सरकारने आपल्या परीने उपाय योजना सुरू केल्या. भारतातील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी जीव तोडून कामाला लागली. त्याचे फायदे पण दिसायला लागले आहेत. आज ६०६ चायनीज कोरोनाने त्रस्त रुग्णांपैकी जवळपास ४३ रुग्ण ठणठणीत झाले आहेत. आज भारताने इराण सारख्या देशांना या व्हायरस सोबत लढायला लॅब आणि प्रशिक्षित मनुष्यबळ पण पाठवले. पण येथील काही डाव्या लिब्रांडूना चीन आणि क्युबा कडून मदत घ्यावीशी वाटत आहे. 
                          चीन मध्ये वुहान शहरात "कोरोनाचा" प्रसार झाला आणि चीनने वुहान आणि हे शहर ज्या राज्यात आहे ते हुबेई राज्य पूर्णतः "लॉक डाऊन" केल्या गेले. त्या नंतर संपूर्ण जगात या "चायनीज कोरोना व्हायरस" ने धुमाकूळ घातला, अगदी १५००० मैल लांब इटली, स्पेन, त्या पेक्षा पण दूर अमेरिकेत पसरला, पण चीनच्या राजधानीच्या म्हणजे बीजिंगच्या जवळपास पण नाही पोहचला. मुंबई जशी भारताची आर्थिक राजधानी आहे, तसेच शांघाय हे शहर चीनची आर्थिक राजधानी आहे हे शहर पण "लॉक डाऊन" झाले नव्हते. तसेच तायजेन, चॉंग्क्वींग, गुआंगजौ, शीआन ही चीन मधील महत्वाची आणि औद्योगिक शहरे पण पूर्णपणे कार्यरत होती.

                      पण गंमतीची गोष्ट ही की याच "चायनीज कोरोना व्हायरस" मुळे मात्र जवळपास पूर्ण जग पूर्णपणे किंवा आंशिक बंद झाले आहे. भारतातील तर संपूर्ण औद्योगिक परिसर आणि आर्थिक केंद्रे बंद झाली आहेत. याचा खूप मोठा आर्थिक फटका जगाला, देशाला बसणार आहे फक्त चीन सोडून!
                          यात महत्वाचे म्हणजे जेव्हा चीनचे अध्यक्ष क्षी झिंगपिंग हे "कोरोना ग्रस्त" वुहानच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी कोणताही विषाणू पासून बचाव करणारा पेहराव घातला नव्हता, फक्त नाक तोंड बंद करणारा एक मास्क घातला होता, तो पण एकदम साधा! कोणत्याही देश आपल्या राष्ट्राध्यक्षाच्या सुरक्षेत इतका हलगर्जीपणा कसा करू शकतो, हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्यांच्या कडे या विषाणू वर योग्य तोडगा असेल.

                     यात एक विचारप्रवाह हा आहे की क्षी झिंगपिंग यांच्या विरोधात असलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांनीच हा विषाणू बाहेर काढला, पण यात मला काही फारसे तथ्य वाटत नाही. उलट जगात आपले आर्थिक साम्राज्य बळकट करायला चीन असले काम नक्कीच करू शकतो, बरे चीनला किती माणसे मेली हे कोणीही विचारणार नाही किंवा भारतात आता जशी, ""संचारबंदी" मध्ये पोलीस मारहाण का करत आहे?" विचारणारी "सिव्हिल सोसायटी" वाली लिब्राडू जमात नाहीच. नुकत्याच एका बातमी नुसार चीन मध्ये "कोरोना" संकटानंतर जवळपास ८ लाख मोबाईल कनेक्शन बंद झाले. म्हणजे काही ८ लाख लोक मेली असे नाही, पण चीन जो आकडा दाखवत आहे त्या पेक्षा हा आकडा निश्चितच खूप जास्त असेल. 
                             पण चीनने थंड डोक्याने हा आंतरराष्ट्रीय कट रचला आणि पूर्णत्वास नेला, आणि असे असेल तर याला काही राष्ट्रांनी साथ दिलीच असेल. मग अशी कोणती राष्ट्र आहेत जे चीनला मदत करत आहेत. तुम्हाला आठवत असेल तर वुहान मधील विषाणू संकट कमी झाले म्हणून काही डॉक्टर वापस आपापल्या गावी निघाल्याचे फोटो चिनी प्रसारमाध्यमांनी दिले होते, त्यात क्यूबन आणि व्हेनेझुएला येथील डॉक्टर पण होते आणि त्या नंतरच क्युबाच्या प्रसारमाध्यमांनी क्युबाने चीनच्या मदतीने तयार केलेल्या "अल्फा बी 2" या औषधा विषयी बातमी द्यायला सुरुवात केली. ज्यात असे सांगितल्या जात आहे की हे औषध "कोरोना" विरोधात खूप उपयोगी आहे आणि चीन मध्ये याचा वापर केला गेला. मुळातच हे औषध HIV वरचे औषध आहे आणि भारतात सुद्धा "चायनीज कोरोना" विरुद्ध असल्याचं HIV च्या औषधाचा वापर केला गेला आहे. पण या नंतर लगेच क्युबाने जगभरात आपल्या वैद्यकीय सेवा मानवतेच्या दृष्टिकोनातून देण्याबद्दल आघाडी घेतली. आता स्पेन, इटली, इंग्लंड, फ्रांस या युरोपियन राष्ट्रांसोबतच अर्जेंटिना, ब्राझील सोबत इतर दक्षिण अमेरिकन राष्ट्रांना वैद्यकीय मदत देऊ करत आहे.

                       तुम्हाला माहीत असायला हवे की, क्युबा आणि व्हेनेझुएला ही साम्यवादी राजवटीचे देश आहेत, जे अमेरिकेचे कट्टर विरोधक आहेत. तत्कालीन सोवियत रशिया सोबत जगभरात साम्यवाद पसरवण्यात हे देश एकेकाळी आघाडीवर होते. व्हेनेझुएला तर सफल साम्यवादी देशाचे प्रतीक होते आणि त्याची राजधानी काराकस हे "रोल मॉडेल"! पण सोवियत रशियाच्या पतना नंतर या राष्ट्रांना मिळणारा साम्यवादी मदत बंद झाली आणि हे देश प्रचंड अश्या आर्थिक संकटात सापडले. 
                           बराक ओबामा यांच्या कार्यकाळात क्युबा बाबत अमेरिकेने आपले धोरण थोडे मवाळ करत काही बाबतीत व्यापाराला परवानगी दिली आणि क्युबाचे आर्थिक अरिष्ट थोडे टळले. पण व्हेनेझुएला येथे अमेरिकन मदत पूर्णपणे नाकारल्या गेली, हा देश अजूनही भुके कंगाल आहे. मग आता हे देश एकाएकी मानवतावादी मदत देण्या इतके सक्षम कसे झाले? याचे उत्तर आहे त्यांना आता चीनने आपल्या पंखा खाली घेतले आहे. यांचा जगभरातील "प्रपोगंडा" सिस्टीम पुन्हा जोमाने तयारीला लागली आहे. तुम्ही सजग असाल तर अगदी भारतातील सगळ्या भाषेत समाज माध्यमांवर क्युबा, फिडेल केट्रो, चे गव्हेरा याचे गुणगान करणारे लेख गेल्या काही दिवसांपासून दिसू लागलेले लक्षात येईल. 

                        भारताने या "चायनीज कोरोना व्हायरस" विरोधातील लढाईत या देशांना हिंग लावून पण महत्व दिले नाही. उलट भारतीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर, डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आणि भर दिला. कडक पावले भलेही थोडे अडखळत का असेना उचलली आणि इथल्या लिब्राडू लोकांची चांगलीच जळली आहे. त्या मुळेच चीनने जेव्हा वुहान मध्ये केलेल्या जबरदस्तीवर टाळ्या पिटणारे लिब्राडू आता भारतात मात्र या प्रकाराला "पोलिसराज" आणि "आणीबाणी" म्हणून नाके मुरडत आहे.
                     जगभरात सोवियत प्रणित "मार्स्कवाद" आणि "लेलीनवाद" पराभूत झाल्या मुळे असेल पण सध्या जगभरातील डावे लिब्राडू आता चीनच्या "माओवादाच्या" चरणी लीन होत आहेत. शेवटी आता साम्यवाद वाचवायला पैसे देऊ शकेल असा एकच देश आहे तो म्हणजे चीन आणि "ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी" हा नियम आपल्याला माहीतच आहे. 

                        सध्या तरी या "चायनीज कोरोना व्हायरस" बद्दल चीनच्या विरोधात आवाज बुलंद करणारी फार थोडी राष्ट्रे आहेत, यात मुख्यतः अमेरिका, भारत, इंग्लंड आणि काही युरोपियन राष्ट्रे आहेत. यांच्यातील काहींना वैद्यकीय आणि मानवतावादी मदत देत चीन त्यांचे तोंड बंद करू पाहत आहे. तर जगातील काही राष्ट्रे चीनच्या प्रचंड कर्जाखाली दबलेली किंवा "वन रोड" सारख्या योजनांमुळे देशात आलेल्या आर्थिक फायद्याच्या उपकाराखाली दबलेली आहेत म्हणून चीन विरोधात बोलत नाहीये पाकिस्थान, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर तर याला "कोरोना विषाणू" म्हणून पण संबोधित करत नाहीये आणि काही आफ्रिकी राष्ट्र यात आहे.

                         या सगळ्याचे आर्थिक, राजकीय आणि लष्करी पडसाद नक्कीच जगात ऐकायला येतील. त्यात उत्तर कोरिया सारखा सनकी देश यात चीन सोबत उभा असेल, पुढील काळ अत्यंत कठीण असेल. लेखात काही मुद्दे तुकड्यात आले काही आता घेता नाही आले, चीनवर कोणाचाच विश्वास नसल्यामुळे अनेक "थेअरी" समोर येत आहेत, मात्र जगाचा अक्ष हा आता पुन्हा दोन भागात वाटल्या जात आहे. सोवियत रशियाची जागा घ्यायला चीन सज्ज आहे आणि ज्या पद्धतीने अमेरिकेने सोवियत रशियाचे आर्थिक साम्राज्य मोडकळीला आणले होते अगदी त्याच पद्धतीने आणि आणखी निर्दयी पद्धतीने चीन समोर जात आहे. 
                            भारतात सध्या तरी साम्यवादी प्रेमी काँग्रेसी सरकार नाही आणि त्याच मुळे भारताची भूमिका चीन करता अत्यंत महत्वाची आहे. म्हणून या "चायनीज कोरोना व्हायरस" च्या संकटात चीनची तळी उचालणाऱ्या जागतिक आरोग्य संघटने कडून एकीकडे भारताचे कौतुक करतांनाच दुसरीकडे कोरोनाला विषाणूला "चायनीज" म्हणल्यामुळे चीन भारताला दमबाजी पण करत आहे. भारत या सगळ्यात सत्तेत असलेल्यांमुळे साम्यवाद विरोधीच असणार हे माहीत असल्यामुळे आता भारतातील डावी लिब्राडू गांडूळ अजून वळवळ करणार.

टिप्पण्या