फेब्रुवारी २०१९ मध्ये मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडेल आर्टमध्ये दिवंगत चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे भाषण सुरू होते.
या भाषणात भारतीय अमूर्त चित्रकला आणि यात दिवंगत प्रभाकर बारवे यांचे योगदानावावर एक चिंतनशील कलाकार म्हणून अमोल पालेकर प्रकाश टाकतील असे अपेक्षित होते. मात्र अमोल पालेकर यांनी या भाषणात राजकीय टिपण्या सुरू केल्यावर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांनी अमोल पालेकर यांच्या भाषणातील मुद्यांना आक्षेप घेत अडवले, सोबतच निमंत्रक संस्थेच्या क्युरेटर जेसल ठक्कर यांनी पण श्री अमोल पालेकर यांना दिवंगत प्रभाकर बरवे यांच्या कार्यावर बोला, कार्यक्रमात इतर संबंध नसलेल्या मुद्यावर बोलून औचितयभंग करू नका, असे सांगितले. या वरून तत्कालीन काळात अमोल पालेकर आणि तमाम तथाकथित विवेकवाद्यांनी - डाव्यांनी "अंधार - अंधार" ओरडत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर" मोठं मोठी भाषण ठोकली होती, निषेध व्यक्त केला होता.
हे सगळ आठवण्याचे कारण म्हणजे नुकतेच केरळ मधील कन्नूर मध्ये इंडियन हिस्ट्री काँग्रेस अधिवेशनात अधिवेशनाचे उद्घाटक आणि केरळचे महामहिम राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना त्यांच्या भाषणा दरम्यान डाव्या विचारांचे तथाकथित इतिहासकार इरफान हबीब यांनी अडथळे आणले. इतकेच नाही तर महामहिम राज्यपालांच्या अंगावर धावून गेले इतकेच नाही तर राज्यपालांच्या अंगरक्षकांशी धक्काबुक्की पण केली.
विद्वान इरफान हबीब यांच्या या तमाशाचे कारण होते सध्या भारतात गाजत असलेले CAA प्रकरण! इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या कार्यक्रमात महामहिम राज्यपाल यांच्या भाषणाआधी तथाकथित डाव्या वक्त्यांनी CAA विरोधात वक्तव्य केले होते. मुळातच या कार्यक्रमाचा आणि CAA चा अर्थाअर्थी काही संबंध नसतांना या वर आपली मुक्ताफळे डाव्या वक्त्यांनी उधळली, त्या मुळे महामहिम राज्यपालांनी CAA बाजूने मौलाना आझाद यांचा संदर्भ देत मुद्दा मांडत असतांना हे तथाकथित विद्वान इरफान हबीब हे "तुम्ही गोडसेला कोट करा" म्हणत महामहिम यांच्या अंगावर धावून गेले.
बर हे इतिहासकार तथाकथित विद्वान इरफान हबीब कोण ? हे भारतातील डाव्या विचारांच्या रोमिला थापर, सतीशचंद्र, के. एन. पणिक्कर या इतिहासकार कंपूतील अग्रणी नाव! खरे तर इतिहास हे "शास्त्र" आहे, पण भारतातील या डाव्या विचारधारेच्या इतिहासकारांनी या "शास्त्राला" "शस्त्र" बनविले, असे "शस्त्र" जे डाव्या विचारधारेला मदत करेल. जवाहरलाल नेहरू यांचे डाव्या विचारांवरील प्रेम आणि इंदिरा गांधी यांचे डाव्यांसोबत असलेले राजकीय गणित, याची परिणीती म्हणजे डावे भारताच्या अनेक सरकारी शैक्षणिक संस्थांत वर्चस्व गाजवत होते. सोबतच आपण म्हणतो तोच खरा इतिहास या भूमिकेमुळे अनेकदा ऐतिहासिक सत्याची मोडतोड करण्याचे पाप या तथाकथित इतिहासकारांवर आहे. विशेषतः "मुस्लिम आक्रमण हे धार्मिक नसून सत्तेसाठी होते" हा या इतिहासकारांचा लाडका सिद्धांत! थोडक्यात चंद्रगुप्त मौर्य जो कर गोळा करे तो स्वतःच्या विलासाकरता आणि औरंगजेब जो "जिझिया" हिंदूंवर जास्तीचा लावे तो हिंदूंच्या भल्या करता, जीव वाचवण्यासाठी अशी उरफाटा न्याय करणारे हे इतिहासकार.
अगदी भारतात सगळ्यात जास्त काळ न्यायालयात चाललेल्या "रामजन्मभूमी मंदिर" खटल्यात पण चुकीची माहिती आणि चुकीचा इतिहास सांगण्याचे पाप पण या इरफान हबीब महाशयांच्या डोक्यावर आहे.
अर्थात डाव्यांची ही कार्यपद्धती आहे, सतत आक्रस्थळया पद्धतीने दुसऱ्यावर विशेषतः राष्ट्रवादी-हिंदुत्ववादी लोकांवर आरोप करत, स्वतः मात्र बिनदिक्कत संवैधानिक कायदे, संस्था, व्यक्तींची पायमल्ली करायची आणि इतर वेळेस व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या बाता मारणाऱ्या याच डाव्या तथाकथित विचारवंतांनी आणि विवेकवादी म्हणवून घेणाऱ्यांनी अश्या वेळेस मात्र मौन स्वीकारायचे!
अमोल पालेकर यांचे प्रकरण उदाहरण म्हणून घेतले असले तरी हे एकमेव उदाहरण नक्कीच नाही. महाराष्ट्रातील डाव्या कंपूतील लेखक विजय तेंडुलकर जेव्हा "मला मोदींचा खून करावासा वाटतो." असे म्हणतात, तेव्हा त्यांचा तो व्यवस्थेवरचा राग व्यक्त करण्याची अभिव्यक्ती असते, पण तेच विक्रम गोखले सारखे ज्येष्ठ राष्ट्रवादी विचारांचे अभिनेते मतदान करून आल्यावर "लोकशाहीच्या गळचेपी बद्दल बोलणाऱ्यांना थोबाडायला हवे" म्हंटल्यावर मात्र "झुंडशाही" आणि "खुनशीपणा" असतो.
पत्रकारांवर होणारे हल्ले हे वाईट असतातच पण, जो आवाज हे डावे विवेकवादी जंत बंगळुरूच्या गौरी लंकेश करता आकाश पाताळ एक करतात, पण त्रिपुरा राज्यात त्यांच्याच पक्षाच्या आंदोलनात घेरून मारल्या गेलेल्या शंतनू भौमिक या पत्रकाराबाबत मात्र मौन राहतात.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे मुस्लिम कट्टरता आणि काँग्रेसच्या चुकीच्या मुस्लिम लांगूचलनाचे विरोधक आहेत, देशाच्या न्यायालयाने "शहबानो प्रकरणातील" न्याय नाकारण्याऱ्या काँग्रेसला आरसा दाखवणारे राष्ट्रवादी मुस्लिम आहे आणि म्हणूनच त्यांचा अपमान करणे हे या तथाकथित विचारवंतांना "अभियक्तीची गळचेपी" वाटत नसेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा