दक्षिणी चित्रपट नायक आर. माधवन याने आपल्या घरी झालेल्या धार्मिक पूजेचा कुटुंबा सोबत काढलेला फोटो समाज माध्यमावर टाकला (फोटो 1) आणि भारतातील समस्त तथाकथित पुरोगामी आणि भारतातील धर्मनिरपेक्षतेचे स्वयंघोषित ठेकेदार यांनी थयथयाट सुरू केला.
एक हिंदू अभिनेता गळ्यात जानवे घालून पूजा करतांनाचे फोटो आनंदाने लोकांना दाखवतो म्हणजे काय? जणू काय भारतात धार्मिक चिन्हे घालून असे फोटो काढणे म्हणजे गुन्हाच!
भारतात आणीबाणी लागू करून अत्यंत चुकीच्या पद्धतीने देशाच्या संविधानात "धर्मनिरपेक्ष" हा शब्द घुसवला. या मुळे नेमके काय झाले?
तर, हिंदूंच्या कपाळावरचे गंध, नाम गेले, पण गळ्यातील क्रॉस आणि कपाळावरील काळ्या ठप्प्याला महत्व आले. डोक्यावरील शेंडी, टोपी, मुंडासे, फेटा, पगडी याला तिलांजली दिल्या गेली, पण डोक्यावरील गोल टोपीला महत्व आले. धोतर वगैरे जुन्या काळचे झाले असले तरी, शेरवानी, पठाणी, बुरखा अजूनही घरंदाजच आहे!
आज शाहरुख खान नावाचा अभिनेता जेव्हा केव्हा मंचा वरून संवाद साधतो तेव्हा तो आवर्जून त्याच्या धार्मिक पध्द्तीने अभिवादन करतो. तेव्हा इतका मोठा अभिनेता जमिनीला धरून आहे म्हणून कौतुक होते.
इतर वेळेस दुसऱ्याच्या धार्मिक श्रद्धांना हसणारा आणि कोट्या करणारा अमीर खान स्वतःच्या हज यात्रेचे फोटो समाज माध्यमांवर टाकतो तेव्हा मात्र त्याच्या धार्मिक पणाचे कौतुक केले जाते.
इतकेच काय! जगाला "धर्म अफूची गोळी" असल्याचे ज्ञान वाटणाऱ्या आणि हिंदू स्त्रीला "स्त्री स्वातंत्र्याच्या" नावाखाली त्यांचे कुंकू, बांगड्या, जोडवी, मंगळसूत्र टाकून द्यायचे आवाहन करणार्या डाव्या पक्षाच्या महिला नेत्या शेहला राशीद मुस्लिमबहुल बेगमसराय येथे आपल्या पक्षाचा प्रचार करतांना मात्र डोक्यावर ओढणी घेऊन त्यांच्या धार्मिक विचारांचा आदर करते.
भगवी वस्त्रे घालून कारभार बघणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महंत असतांना पूजा करण्यात वेळ घालवतात वगैरे सारखे दूषणे दिली जातात. पण मुस्लिम नेते मौलाना असले तरी दिवसातून पाच वेळा नमाज करतात तेव्हा वेळ वाया जात नसतो का?
ज्या प्रमाणे ओवेसी टोपी, शेरवानी, दाढी ह्या त्याच्या धार्मिक चिन्हा सोबत असतो, ज्या प्रमाणे नवज्योतसिंग हा त्याच्या पगडी, दाढी वगैरे धार्मिक चिन्हा सोबत असतो आणि मान्य होतो मग आर. मधवनलाच वेगळा न्याय का?
हा तुमच्या अतिसहनशिनतेचा परिणाम आहे, सोबतच तुमच्या दुसऱ्याच्या विचारांच्या मागे पळणाऱ्या विकृत मानसिकतेचा आहे. "धार्मिक सुधारणा" आवश्यक आहेच, पण त्या करता आपला "धर्म त्याग" आवश्यक नाही.
आणि सगळ्यात आधी आपल्या डोक्यात हे बिंबवून घ्या की आपल्याला "धर्मनिरपेक्षता" नको तर "सर्वधर्मसमभाव" हवा आहे, यातुनच सगळ्यांना समान न्यायचे दरवाजे उघडतील.
मग सुप्रिया सुळे काय आहे ? 😆
उत्तर द्याहटवा