अखंड असावे सावधान




                     "इस्लामी आतांकवाद" म्हंटला की भारतातील पुरोगाम्यांच्या पोटात कळ उठते. इस्लाम मधील "जिहाद" हा अन्य धर्मियांसाठी नसून आपल्या आतील वाईट प्रवृत्तीला ठेचण्यासाठी आहे असा या पुरोगाम्यांचा "जिहाद" चा अर्थ. भारतातील या मुस्लिम आंतकवादा विषयी दुसरा आवडता तर्क असा की, मुस्लिमांना गरिबी आणि अशिक्षितपणा मुळे त्याच्या धर्मातील कट्टर लोक फसवितात. 

            याच सगळ्या तर्का मुळे "काश्मीर" मधील "आझादीचा" संघर्ष हा धार्मिक नसून राजकीय असतो, हा संघर्ष "इस्लाम" करता नसून, "कश्मीरीयत" च्या अस्मिते करता असतो. पण हेच पुरोगामी मात्र काश्मीर मधून वेचून वेचून हिंदूंना बाहेर काढले, त्यांच्या हत्या केल्या, हिंदू आई-बहिणींवर बलात्कार केले हे विसरून जातात, काकाश्मिरी हिंदू हे त्या "कश्मीरीयत" चा हिस्सा नव्हते? नव्हते तर का नव्हते? याला नक्कीच धार्मिक कारण नव्हते का? जो पर्यंत याचे खरे कारण आपण मान्य करणार नाही तो पर्यंत काश्मीर प्रश्न निकालात निघणार नाही.

             इस्लाम मधील "जिहाद" चा चुकीचा अर्थ काढत पुरोगामी जसे आपल्याला फसवतात, तसेच पुरोगाम्यांना या "जिहाद" चे वेगवेगळे मार्ग पण  त्या मुळे समजून घ्यायचे नसतात आणि म्हणूनच त्याच्या साठी "लव्ह जिहाद" कधी अस्तित्वातच नसतो.

            जसा शिक्षणाचा आणि सुसंस्कृतपणा याचा काही संबंध नसतो, तसाच उच्च शिक्षण आणि श्रीमंती याचा संबंध धार्मिक कट्टरतेशी नसतो. याची देशात आणि देशाबाहेर अनेक उदाहरण आपल्या डोळ्या समोर आहे. जागतिक आंतकवादी ओसामा बिन लादेन, अल जवाहरी हे श्रीमंत होते आणि उच्च शिक्षित पण होते. तसेच भारतातील अफजल गुरू, याकूब मेनन सारखे आतंकवादी पण उच्च शिक्षित होते. त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग हा समाज स्वस्थ बिघडवण्या साठी केला.

              हे सगळं लिहण्याचे कारण म्हणजे असाच एक उच्च शिक्षित आतंकवादी आपल्या शेजारी राष्ट्राने पकडला. आपल्या वृत्तसृष्टीच्या दृष्टीला मात्र ही बातमी पडली नाही किंवा पडून सुद्धा ती आपल्याला दाखवल्या गेली नाही. पण बातमी आपल्या करता महत्वाची नक्कीच आहे कारण दक्षिण भारतात जिहादी कारवाया करणाऱ्या एका संघटनेचे नाव पण त्यात आले आहे. धर्मा साठी "जिहाद" करतांना कोण कोणते वेगवेगळे मार्ग वापरल्या जातात ह्याचा हा नमुना.

              भारतात निवडणुका सुरू असतांना आपले सुदूर दक्षिणेतील शेजारी राष्ट्र श्रीलंका मात्र इस्लामी जिहादिंनी बॉम्ब स्फोटांनी हादरवले. भारताने दिलेली गुप्तचर माहिती श्रीलंकेने गंभीरपणे न घेतल्याने श्रीलंकेवर भीषण संकट आले. या घटनेनंतर मात्र श्रीलंकन प्रशंसनाने या जिहादींविरोधात कडक धोरण अवलंबले. 

             याच धरपकडी मध्ये एक अत्यन्त खळबळजनक आणि घृणास्पद प्रकरण बाहेर आले. प्रकरण असे की काही दिवसा पूर्वी एका महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या. तिला घाईत जवळच्या एका दवाखान्यात नेण्यात आले. हा दवाखाना तेथील प्रसिद्ध डॉक्टर मोहम्मद सीगु सियाब्दीन साफी यांचा होता. त्या भागात त्यांचे नाव पण चांगले होते. तर या मोहम्मद सीगु सियाब्दीन साफी यांनी महिलेची तपासणी करत तिला तत्काळ ऑपरेशनची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. त्वरित तिला ऑपरेशन टेबल वर नेत भूल देण्यात आली. शुद्धीवर आल्यावर मात्र महिलेला सांगण्यात आले की आम्ही तुला वाचवू शकलो पण तुझ्या नवजात बालकाला काही वाचवू शकलो नाही. 

           या महिलेने हा दुःखद धक्का पचवला, आणि पुन्हा आपले नित्य जीवनात वेळ घालवायचा प्रयत्न करू लागली. पण त्याच बरोबर तिच्यातील स्त्री जागी झाली. आपल्या शरीरात काही बदल झालेले तिच्या लक्षात आले, आणि तिने दुसऱ्या डॉक्टर कडून स्वतःची तपासणी करून घेतली. 

             या तपासणी मुळे मात्र तिला जीवनातील अजून मोठा धक्का मिळाला. कारण या तपासणीत तिला न सांगता तिचे "गर्भाशय" काढून टाकल्याचे लक्षात आले. गर्भाशय काढावे लागेल अशी कोणतीही आगाऊ सूचना तिला किंवा तिच्या नातेवाईकांना देण्यात आली नव्हती. ऑपरेशन झाल्यावर पण असे काही करावे लागले असे सांगण्यात आले नव्हते. म्हणजेच तिच्या परवानगी शिवाय ह्या गोष्टी झाल्या होत्या. ही महिलेने श्रीलंकन पोलिसांकडे पोहचत ह्या विरोधात दाद मागितली.

               पोलिसांनी लगेच डॉक्टर विरोधात तपास सुरू केला. या तपसामुळे या डॉक्टर वरील पोलिसांचा संशय वाढत गेला. हा डॉक्टर मोहम्मद सीगु सियाब्दीन साफी कोलंबो आणि करूनेगला या भागातील प्रसिद्ध आणि श्रीमंतपण व्यक्ती होता. त्याचे त्या भागातील नाव पण चांगले होते. पण एका माहितीवर पोलीस अडकले, ती म्हणजे हा मुस्लिम स्त्रि-पुरुषांची  "नसबंदी" करत नव्हता. उलट असे न करण्याबाबत त्यांचे मन वळवायचा. त्यांना वैज्ञानिक आणि धार्मिक दाखले देत अश्या नसबंदी विरुद्ध मतपरिवर्तन करायचा. पण त्या उलट सिंहली बौद्ध आणि हिंदू महिला पुरुषांची मात्र या बाबतीत यथायोग्य मदत करायचा. ही बातमी तेथील वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर येताच त्याच्या कडे कोणत्या ना कोणत्या कारणाने तपासणी करायला गेलेल्या सिंहली बौद्ध आणि हिंदू महिलांच्या मनात शंका निर्माण झाली आणि त्यांनी दुसऱ्या डॉक्टर कडे आपली तपासणी करून घेतली. 

             या सगळ्या महिलांच्या तपासण्या आणि डॉक्टर मोहम्मद सीगु सियाब्दीन साफी याच्या दवाखान्यात उपलब्ध असलेला रेकॉर्ड या वरून श्रीलंकन पोलिसांनी जी माहिती बाहेर काढली त्या करता "भयानक" हा शब्द पण कमी पडेल. 

               या डॉक्टर ने गेल्या २० वर्षात हजारो हिंदू आणि बौद्ध महिलांच्या नकळत त्यांचे फक्त ओबोर्शनच केले नाही तर त्यांचे गर्भाशय काढून त्यांना कायमचे मातृत्वापासून वंचित केले. म्हणजे अश्या अनेक हिंदू आणि बौद्ध महिला ज्या आपल्या गरोदर काळात विश्वासाने या डॉक्टर कडे आपल्या आणि आपल्या होणाऱ्या संततीचे आरोग्य सांभाळला गेल्या होत्या, त्यांचा विश्वासघात करून याने आपला "धार्मिक जिहाद" पूर्ण केला, फक्त "काफ़िरांची" संख्या कमी व्हावी म्हणून!

              या डॉक्टरचे तार ISIS सोबतच श्रीलंका आणि दक्षिण भारतात सक्रिय असलेले इस्लामी आतंकवादी संघटन "तौहिद जमत" बरोबर जुळलेले आहे. ह्या त्याच संघटना आहेत ज्यांनी श्रीलंकेत बॉम्ब स्फोट घडवून आणले.

              फक्त दुसऱ्या धर्मातील महिलेच्या उदरात आहे, आणि त्या मुळे दुसऱ्या धर्मातील लोकांची लोकसंख्या वाढेल म्हणून "भ्रूण हत्या" करायची हा विचारच "नीच" आहे. मुंबई बॉम्ब ब्लास्ट, २६/११, किंवा अमेरिकेतील वर्ड ट्रेंड सेंटर सारख्या गाजलेल्या आतंकवादी हल्ल्या पेक्षा पण जास्त भयानक हा प्रकार आहे. या मुळे एखाद्या धर्माची लोकसंख्या वाढ कायमची खुंटली. 

            आपण डॉक्टरला "देवाचा" दर्जा देतो, हाच डॉक्टर स्वतः धर्मांध असेल तर किती घृणास्पद काम करू शकतो याचे हे उदाहरण. या सगळ्यात त्या पहिल्या महिलेचे नक्कीच कौतुक करायला हवे जिने आपली शंका जाहीर रित्या सांगितली आणि त्याचा फक्त पाठपुरवाच केला नाही तर, घाबरून किंवा इतर सामाजिक कारणामुळे कुढत असलेल्या महिलांना पण हिम्मत देत तक्रार करायला भाग पाडले.

              सध्या तरी हा जिहादी डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. अजून तपास सुरू आहे. पण या तुन एकच धडा मिळतो तो म्हणजे "जिहाद" हा फक्त धार्मिकच आहे आणि शिक्षण, पैसा या पेक्षा "धर्मांधता" हेच आंतकवादाचे खरे कारण आहे. भारतात अधून मधून डोके वर काढणारा "लव्ह जिहाद" पण ह्याच पठडीतील खरा प्रकार नक्कीच असू शकतो.

त्या मुळे अखंड सावध असणे हे आपले पहिले कर्तव्य असले पाहिजे.

टिप्पण्या