विनाश काले विपरीत बुद्धी

   
   
                   "विनाश काले विपरीत बुद्धी" या उक्तीचा परिचय सध्या बंगाल राज्याच्या राजकारणात येत आहे. अनेक वर्ष कम्युनिस्ट पक्षाच्या अकार्यक्षम आणि गुंडाराज पद्धतीच्या वरवंट्या खाली बंगाली जनता पिसली जात होती. पण त्यातही भारताच्या केंद्रीय राजकारणात आघाड्या - महाआघाड्यांच्या सुरू झालेल्या राजकारणाचा खरा फटका बंगालच्या जनतेला बसू लागला. कारण दिल्लीत काँग्रेसला सत्तेत बसायला कम्युनिस्ट पक्ष देत असल्यामुळे, राज्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात लढायला पुरेसा आधार काँग्रेस केंद्रीय समिती देत नाही असा आरोप बंगाली काँग्रेस नेते करायला लागले. 

                   तेज तर्रार ममता बॅनर्जी यांनी याच मुद्यावर काँग्रेसला राम राम केला आणि बंगाल मध्ये रवींद्रनाथ टागोर यांची "ऐकला चालो" भूमिकेवर चालणे सुरू केले. मुळातच कम्युनिस्ट पक्ष्याच्या राजवटीत "रक्तरंजित राजकारण" हा बंगालचा स्थायीभाव राहिला. ममता बॅनर्जी यांनी कम्युनिस्ट पक्षाला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली. सिंगुरच्या टाटा कार प्रकल्पाच्या विरोधात उभे राहिलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे बंगाल मधील कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीच्या थडग्यावर शेवटचा खिळा ठरले. 
                      २०११ मध्ये "माँ माटी मानुष" ही घोषणा देत ममता बॅनर्जी यांनी बंगाल वर विजय मिळवला. बंगाली जनतेने ममता बॅनर्जी यांचा विजय मनापासून साजरा केला. इतकेच नाही तर भारतीय राजकारणात पण या चिवट लढाईत मिळालेल्या विजयामुळे ममता बॅनर्जी यांची पत चांगलीच उंचावली. 

                  पण या मुळे बंगाली जनतेच्या हालअपेस्टा संपल्या का? किंवा तसा प्रयत्न तरी झाला का? बंगालच्या रक्तरंजित राजकारणाचा अंत झाला का? 

                           तर या सगळ्याची उत्तर नाही अशीच येईल. खरे तर बंगाल मधील जनतेची भावना ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत नवीन वेस्टनात जुनीच वस्तू अशी झाली. याचे कारण असे की ममता बॅनर्जी यांनी कम्युनिस्ट पक्षाची भ्रष्टाचारी आणि गुंडागर्दी बरबटलेली व्यवस्था न बदलावता, त्या व्यवस्थेचा उपयोग आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायला सुरुवात केली. 
           भारताचे सीमावर्ती राज्य असलेल्या आणि अनेक वर्षांपासून शेजारी देशातून बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांची समस्या खूप  मोठी आणि तेथील सामाजिक आणि धार्मिक तोल बिघडवायला कारणीभूत अशीच आहे. पण खुद्द ममता बॅनर्जी यांनी या समस्येचा उपयोग पण कम्युनिस्ट पक्षाच्या पावलावर पाऊल ठेवत या घुसखोरी "मतपेढी" बनवण्याकरता केला. 

                      २०१४ मध्ये भारतात आलेल्या "मोदी लाटेत" भाजपने बंगाल मध्ये आपले खाते उघडले. त्या नंतर येणाऱ्या प्रत्येक स्थानीय निवडणुकीत भाजपचा टक्का वाढतांना दिसत होता. या सगळ्या गदारोळात ममता बॅनर्जी यांनी जागे होणे गरजेचे होते. पण सत्तेच्या नशेत आणि भारतातील तथाकथित मानवतावादी, सर्वधर्मसमभाववादी आणि पुरोगामी लोकांनी डोक्यावर घेतल्या मुळे ममता बॅनर्जी यांनी या बाबतीत काना डोळा केला. त्यात विरोधकांच्या कथित महाआघाडी किंवा गेली अनेक वर्षे हव्वा बनवल्या गेलेल्या कुचकामी "तिसऱ्या आघाडीच्या" महत्वाच्या नेत्या म्हणून ममता बॅनर्जी यांचे नाव घेतल्या जाऊ लागले आणि ममता बॅनर्जी यांना पंतप्रधानपद खुणावू लागले. 

                                     हातात असलेल्या राज्याचा कारभार आजारकते कडे जात असतांना नरेंद्र मोदी यांच्या विरोधात द्वेषाचे राजकारण ममता बॅनर्जी यांनी सुरू केले, त्याचा परिणाम म्हणून त्यांना राज्यातून आणि देशातून पण विरोध व्हायला सुरुवात झाली. अगोदरच आक्रमक असलेल्या ममता बॅनर्जी या विरोधामुळे बिथरल्या आणि आक्रमक वृत्तीची जागा, आक्रस्थाळेपणा ने घेतली. 

                           मग कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्यातच धिंडवडे निघायला सुरवात झाली. बंगाल मध्ये हिंदूंवर हिंसक हल्ले, दंगली व्हायला लागल्या, स्थानीय निवडणुकीत होणारी हिंसा वाढली. भाजप कार्यकर्त्यांचे खून कम्युनिस्ट राज्य असलेल्या केरळ नंतर बंगाल मध्ये पडू लागले. यातून ममता बॅनर्जी यांचा लोकप्रियतेचा आलेख भराभर खाली येऊ लागला, जसा जसा आलेख खाली येऊ लागला तसा तसा त्यांचा आकरस्थळेपणा वाढायला लागला. 

                      भारतीय संघराज्याचे कायदे न मानन्या इतपत हा आक्रस्थाळे पणा वाढीला लागला. मग आपल्या राज्याच्या भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा देशाच्या संवैधानिक न्यायालयाने, संवैधानिक केंद्रीय चौकशी संस्थेला दिलेल्या परवानगीच्या आदेशालापण न मानण्याचा, चौकशीला आलेल्या अधिकाऱ्यांना कैदेत टाकण्याचा आणि या विरोधात आपले पद आणि कर्तव्य विसरून रस्त्यावर आंदोलन करण्याचा प्रमाद पण ममता बॅनर्जी यांच्या कडून घडला. बर हे सगळ करतांना आपण भारतीय संघराज्याच्या संवैधानिक ढाच्याला तडा देत आहोत याची खंत पण त्यांना झाली नाही, कारण फक्त मोदी द्वेष आणि स्वतः पंतप्रधान व्हायची महत्वाकांक्षा!

                          या सगळ्यातून मग केंद्रीय लोकउपयोगी योजना आपल्या राज्यात राबवायला मज्जाव करणे, न राबवणे या सरखे कृत्य पण ममता बॅनर्जी यांच्या कडून करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या घोषणे नंतर तर या प्रकाराला उत आला.
                               जश्या जश्या निवडणूका जवळ यायला लागल्या, तसे तसे भाजपला मिळणारा वाढता प्रतिसाद हा ममता बॅनर्जी यांच्या डोक्याचा ताप झाला. या वर उपाय म्हणून मग भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ले वाढू लागले, भाजप नेत्यांच्या प्रचार सभेला परावांनगी नाकारणे, त्याचे हेलिकॉप्टर बंगाल मध्ये उतरणार नाही याची व्यवस्था करणे हे लोकशाहीला घातक असे प्रकार व्हायला लागले, हा प्रकार इतका वाढला की भाजपच्या कलकत्त्यामधील भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात झालेल्या रोड शो वरच हिंसक हल्ला केला गेला.

                           "जय श्री राम" या घोषणेवर केलेल्या चिडाचिडी मुळे तर भाजप समर्थकांच्या हातात एक अमोघ अस्त्रच सापडले. आता बंगाल मध्ये जिथे ममता बॅनर्जी जातात तिथे त्यांना या घोषणेचा सामना करावा लागतो आणि त्याचा थयथयाट वाढतो. 

                           या सगळ्याचा एकत्रित परिणाम मात्र बंगाल मधील तृणमूलच्या लोकसभेच्या जागा कमी होण्यात आणि भाजपला लक्षणीय मत मिळण्यात झाला आहे. या नंतर बंगाल मध्ये पुन्हा राजकीय आणि धार्मिक दंगे होण्यास सुरुवात झाली आहे. 

                             या वर कडी म्हणजे कलकत्ता येथील एका दवाखान्यात आपला आप्त मेला म्हणून दोन ट्रक भरून माणसे आणत त्या दवाखान्यातील शिकवू डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात  आणि त्या नंतर बंगाल मध्ये सुरू झालेल्या डॉक्टरांच्या सरकार विरोधातील आंदोलनात पण ममता बॅनर्जी नाहक राजकारण आणत त्याचाही ठिकरा तथाकथित बाहेरचे म्हणजेच भाजपवर फोडायचा प्रयत्न करत आहे. या घटनेत महत्वाचे म्हणजे अश्या घटना या भारतात सगळीकडे होत असतात आणि स्थानिक राज्य शासन याला आळा घालायचा यशस्वी-अयशस्वी प्रयत्न नियमित करत असते. पण कोणतेही शासन डॉक्टरांचे असले आंदोलन संवेदनशीलतेने हाताळते. 

                           पण आधीच आक्रस्थळया झालेल्या आणि लोकसभा निकडणुकीत मिळालेल्या अपयशाने चवताळलेल्या ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना धमक्या देत पुन्हा कामावर रुजू व्हायचा आदेश दिला. या वर प्रतिक्रिया म्हणून बंगाल मधील सरकारी डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे देण्याचे ठरविले आहे. यातील आठ जणांनी आपले राजीनामे आधीच सुपूर्द केले आहे. 

                            हे सगळे केंद्र सरकारने राज्यातील कायदा आणि व्यवस्थेबाबतचा अहवाल राज्यपालांना मगितल्याच्या पार्श्वभूमीवर होत आहे. या कायदा आणि व्यवस्थेबरोबरच, सामान्य जनतेला अतिआवश्यक असणारी रुग्ण सेवा व्यवस्था कोलमडली तर राज्याच्या आजारकतेत अजून वाढच होईल आणि ममता बॅनर्जी यांचा पाय अजून खोलात फासेल.

                           पण आपल्याच "आक्रमक प्रतिमेच्या" अति आहारी गेलेल्या ममता बॅनर्जी यांना हे कळेल का? या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी नाही. बंगाल मधील विधानसभेच्या निवडणूका जवळच आहे. त्या मुळे राज्यपालांच्या अहवालाचा हवाला देत केंद्र सरकार तिथे राष्ट्रपती शासन लागू करेल असे तरी वाटत नाही, कारण असे करून ममता बॅनर्जी यांच्या बद्दल निवडणुकांच्या तोंडावर सहानुभूती तयार व्हावी असे कोणालाही वाटणार नाही. कदाचित त्याचा उपयोग ममता बॅनर्जी यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची घडी थोडी व्यवस्थित करण्यासाठी दबाव टाकल्या जाईल. 
                                   अर्थात याचा जेव्हढा जनतेला त्रास होईल तितका ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जनता एकजूट होईल आणि त्याचा फायदा नक्की कुणाला होईल हे सांगायला कुणा राजकीय पंडितांची गरज नाही, सोबतच ममता बॅनर्जी खरच हुशार असतील तर बंगाल मध्ये कायदा सुव्यवस्थेची घडी बिघडवणारी मोठी घटना घडायला नको म्हणून प्रयत्नशील राहतील.

                            पण या सगळ्यात कवियत्री, कलाकार, लेखक अशी संवेदनशील ओळख असलेल्या ममता बॅनर्जी समजा अश्याच संवेदनहीन वागत राहिल्या तर मात्र "विनाश काले विपरीत बुद्धी"  ही उक्ती मात्र त्या खरी करतील.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा