पाकिस्थान आपले शेजारी राष्ट्र, आपले शत्रू राष्ट्र, ज्या देशा सोबत आपल्या चार लढाया झाल्या. आपल्या देशात कुठेही दहाशतवादी हल्ला झाला तर त्याची पाळंमुळं ज्या देशात सापडतात असा देश. कधीकाळी अखंड भारताचा हिस्सा असलेला आणि धर्माच्या आधारावर वेगळा झालेला. भारतात दहशतवादी पाठवत असतांना स्वतःच दहशतवादाच्या भस्मासुरचा बळी जात असणारा, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या कोडमललेला, आंतराष्ट्रीय जगतात वेगाने एकटा पडत जाणारा देश हीच आजच्या पाकिस्थानची आपली ओळख.
पाकिस्थनी राज्यकर्त्यांनी फक्त एकाच मुद्यांवर आज पर्यंत पाकिस्थनी जनतेला खेळवले तो म्हणजे "धर्म"! त्या "धर्मामुळेच" पाकिस्थानने भारतासोबत सतत शत्रुत्व ठेवले. पण "धर्म" काही पाकिस्थानला बांधून ठेऊ शकला नाही, बांगलादेशच्या रुपात त्याचे तुकडे झालेच, अजूनही बलुचिस्थानच्या रुपात होण्याची चिन्हे आहेत. पण धार्मिक कडवेपणा-द्वेषा मुळे राष्ट्र कसे लयाला जाते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्थान आहे. भारतातील तमाम डाव्या, उजव्या, लोकशाहीवादी, मानवतावादी, वादावादी करणाऱ्या लोकांनी आवर्जून लक्षात घ्यावा असा इतिहास.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एकेकाळी पाकिस्थान कारखानदारी मध्ये भारताच्या पुढे होता, त्याचा GDP हा भारतापेक्षा जास्त होता. भुट्टो यांनी जरी,"एक हजार वर्षे गवत खाऊ, पण अणुबॉम्ब बनऊच" असे म्हंटले असले तरी तश्या अवस्थेत जगण्यासारखी पाकिस्थांची परिस्थिती नक्कीच नव्हती. आधुनिक इस्लामी देश, जो बलिष्ठ लष्कर आणि उत्तम अर्थव्यवस्थेसह, उत्तम वैज्ञानिक आणि डॉक्टर, इंजिनियर देऊ शकतो असा जगातील इतर इस्लामिक देशांचा आधारस्तंभ होता. पण कट्टरतेच्या आहारी जात पाकिस्थानने आपली सगळी ऐपत धुळीला मिळवली.
पाकिस्थानने आपली अंतराळ अनुसंधान संस्था SUPARCO स्थापन केली १६ सप्टेंबर १९६१ ला. भारताची शान असलेली आणि जगभरात जीचा डंका वाजत आहे त्या ISRO च्या आधी! ISRO ची स्थापना आहे ती,१५ ऑगस्ट १९६९ साली.
७ जून १९६२ ला SUPARCO ने त्यांच्या स्वतःच्या सोनमियानी लॉन्च पॅड वरून रेहबर - १ हे रॉकेट उडवले पण! अमेरिकेच्या मदतीने पाकिस्थानने हा कार्यक्रम पूर्ण केला होता.
१९६२ ला भारतात ISRO च्या प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या. भारताला रशियाच्या मदतीने पहिला उपग्रह "आर्यभट्ट" पाठवायला १९७५ उजाडले होते.
ज्या पद्धतीने वैज्ञानिक क्षेत्रात पाकिस्थान आघाडीवर होता त्याच पद्धतीने खेळातही पाकिस्थानने आपली वेगळी ओळख स्थापित केली होती. भारताच्या आणि पाकिस्थांनच्या प्रेमाचा हॉकी आणि क्रिकेट मध्ये पण पाकिस्थनी संघ हा एक बलवान संघ म्हणून ओळखल्या जायला लागला होता. आजही पाकिस्थांचा वन डे क्रिकेट मध्ये जिकलेल्या लढती भारतापेक्षा कितीतरी जास्त आहे. हॉकी मध्ये पण पाकिस्थान आणि भारत यांच्यात जोरदार टक्कर होती, आणि त्यातही पाकिस्थान समोर राहिला आहे.
पाकिस्थानची चित्रपट नगरी एकेकाळी चांगली मार्गक्रमण करत होती. फाळणी नंतर लाहोर पेक्षा मुंबईला कलाकारांनी जवळ केल्या मुळे भारतात जरी अव्वल चित्रपट तयार होत असले, तरी पाकिस्थानात पण नवीन विषयावरील, सामाजिक कथेवरील, आधुनिक विचारांवरील अनेक चित्रपट तयार होत होते.
पाकिस्थनी संगीत तर भारता सकट जगभरात धुमाकूळ घालत होते. गजल, पॉप यात तर पाकिस्थनी दक्षिण आशियात चांगलेच होते. भारतीय चित्रपट सृष्टी देखील त्यांच्या गाण्यांना कधी थेट तर कधी नक्कलेच्या रुपात जागा देत होते. साधारण ८० च्या दशकात नजिया हसन हिचे डिस्को दिवाने, बूम बुम त्या काळात खूप गाजले होते, "आप जैसा कोई जिंदगी मे आये" हे गाणे पण मूळचे पाकिस्थनीच! जीन्स आणि टॉप घातलेली नाजीया हसन डिस्को लाईट मध्ये नाचत गाण म्हणतांना पाकिस्थानच्या राष्ट्रीय दूरचित्रवाणी वरून प्रसारित करत होते. हसन जहागीर याचे "हवा हवा" हे गाणे तर अजूनही भारतीयांना चित्रपटात घ्यायांची इच्छा होते. शेवटचा भारतात गाजलेला पाकिस्थनी बँड होता "जुनून" त्यांचे "सयोनी" साधारण ९० मध्ये भारतात बरेच गाजले.
कारणे आंतरराष्ट्रीय राजकारण असो, की अजून काही मुख्यतः पाकिस्थान मध्ये भारत द्वेषा सोबतच धार्मिक कट्टरता जाणतेपणाने वाढवल्या गेली. त्याचा परिणाम जसा भारतावर झाला तसा पाकिस्थानवर जास्त झाला. पाकिस्थानचा आधुनिक इस्लामी राष्ट्र हा चेहरा पूर्णपणे लयाला गेला, उरलाय फक्त इस्लामिक राष्ट्र हा चेहरा! सामाजिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक चेहरा पण धार्मिक झाला. या मुळे पाकिस्थानची जागतिक ओळख बदलली आणि त्याची अधोगती सुरू झाली जी अजूनही थांबत नाहीये.
यातून आपल्याला घ्यायचा धडा हा की कट्टरता किती आणि कुठपर्यंत ठेवायची याचा विचार करावा. तथाकथित पुरोगाम्यांनी हा विचार करावा की आपल्या राजकीय फायद्यासाठी एका कट्टरतेकडे कानाडोळा करतांना दुसरीकडील कट्टरता वाढवण्याचे पाप तुमच्या माथी पडले आहे. तेव्हा अजूनही वेळ गेली नाहीये जे "विवेकवादाचा" घोष करत विवेकवादाला तिलांजली देत आहे त्यांनी आणि या नाटकी विवेकवाद्यांमुळे "विवेकाला" तिलांजली देणाऱ्या दोघांनीही शिकण्यासारखे आहे.
समाज माध्यमांवर "राष्ट्र प्रथम" म्हणून होत नाही, त्या करता "विवेकाला" सदैव जागृत ठेवत योग्य "भूमिका" घ्यावी लागते.
योग्य विचार ... चुकतो तो माणूस, चुकांमधून शिकतो, सावरतो तो हुशार माणूस, आणि दुसऱ्यांच्या चुकांमधून बोध घेतो तो शहाणा माणूस ...
उत्तर द्याहटवा