सरसंघचालक मोहनजी भागवत काही बोलले आणि त्याला राजकीय परिमाण लावत आगपखड केली नाही असे कधी झालेय का?
मुळातच संघ आणि पुरोगामी यांचे वाकडे, जे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतात त्यांना तर अजून त्रास! आठवा गेल्या वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाचे नुसते आमंत्रण स्वीकारले होते तर मोठा गहजब झाला होता. मग त्यांनी तिथे केलेल्या भाषणाचे अनेक अर्थ काढल्या गेले होते.
अर्थात प्रत्येक गोष्ट राजकीय आणि स्वतःच्या आणि स्वतःच्या पक्षाच्या नफा आणि तोटा याच दृष्टीकोनातून बघायची सवय लागली की एखाद्याने पोटतिडकीने, देशाच्या फायद्याच्या दृष्टीने काही भल्याचे चार शब्द सांगितले तरी त्यात राजकारण शोधायची सवय पडली असते त्याला करणार काय?
नागपुरात संघाचे तृतीय वर्ष समारोप समारंभात माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी दर वर्षी प्रमाणे आपले विचार मांडले. नागपूर आणि भारतातील तमाम संघ विचारकांसाठी हा एक महत्वाची वैचारिक मेजवानीच असते. संपूर्ण भारतातील म्हणण्यापेक्षा जगातील संघप्रेमींचे इकडे लक्ष असते. मुळातच तृतीय वर्ष पूर्ण करणे हा संघ जीवनातील एक महत्वाचा टप्पा असतो, संघ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणारे संघाचे प्रचारक मूलतः याच कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गा नंतर तयार होतात, या तूनच याचे महत्व अधोरेखित होते.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी गेल्या वर्षी याच कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या कार्यक्रमात संघाने अनेक परंपरा तोडल्या होत्या.
. या वर्षी सरसंघचालक मोहनजींनी भारतात नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकलांवर भाष्य करतानाच एक मोठी गोष्ट सांगितली, ती म्हणजे कोण सत्तेत आले त्याला महत्व नाही, पण जे निवडून संसदे पर्यंत पोहचले त्यांनी "राष्ट्र प्रथम" या तत्वाने काम करत संसदेचे आणि पर्यायाने देशाचे नाव मोठे करावे. हार-जित ची लढाई आता संपली, आता लढाई भारtheताला "वीश्वगुरू" बनवायची आहे, त्यात धर्म, भाषा, पक्ष या सगळ्याचा विचार न करता एक दिलाने संसदेत काम केले तर भारताचे भविष्यातील चित्र आश्वासक असेल.
. पण पुढे त्यांनी बंगाल मधील राजकीय स्थिती आणि त्या वरील उपाय याच्यावर जे आपले विचार मांडले ते मात्र ममता बॅनर्जी सोबत भारतातील तथाकथित पुरोगाम्यांना बरेच लागले हे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसून येत आहे.
. नुकताच बंगाल मधील निवडणुकी दरम्यान झालेला राजकीय हिंसाचार हा कोणत्याही लोकशाहीवादी भारतीय नागरिकांच्या हृदयाला बोचनारा होता, नेमक्या सरसंघचालकांनी याच वर्मावर बोट ठेवले, इतकेच नाही तर यावर योग्य तो इलाज, मग तो ठोक शाहीचा असला तरी करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले, सोबतच सध्या बंगाल मधील आरोग्य सेवेत निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करत त्या वर पण योग्य कारवाही करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केल्या गेले, नेमके हेच ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पाठीराख्यांना आवडले नाही.
. या वर उत्तर देताना ममता बॅनर्जी यानी सरसंघचालकांना फक्त नागपूर सांभाळा अश्या प्रकारचे औचित्यहीन उत्तर दिले. पण हे उत्तर देतांना आपला पक्ष बंगाल मधून पण बेअसर होत आहे ह्याचा विसर त्यांना पडला होता ही गोष्ट अलाहिदा केल्या गेली.
खरे तर संघ विचार हा नेहमीच राष्ट्राला जगातील सर्वोच्च स्थानावर पोहचवण्याचा विचार करत असतो, आणि तेच विचार आपल्या स्वयंसेवकांवर बिंबवण्याचा प्रयत्न करतो. त्याच मुळे सारसंघचालकांचे कोणत्याही संघाच्या कार्यक्रमात होणारे भाषण किंवा मार्गदर्शन याच उद्देशाने असते. नागपूरच्या तृतीय वर्षाच्या समारोपाच्या भाषणात पण त्यांनी," आता निवडणुकीचे युद्ध संपले असून संसदेत जाणाऱ्या प्रत्येकाने देशाच्या उज्वल भविष्यासाठी आपले काम करावे असे आवाहन करत जे या लोकशाही विरोधी काम करतात त्याच्यावर दंडात्मक कारवाई सरकारने करावी." अशी इच्छा प्रकट केली.
नेमके हेच वाक्य ममता बॅनर्जी यांच्या जिव्हारी लागले, त्यातूनच त्यांनी वरील निर्लज्ज वक्तव्य दिले. अर्थात जे नागपुरात बसून संपूर्ण देशाचा विचार करतात त्यांचे मत आपली राज्यातील सत्ता संभाळण्यासाठी भारताच्या संवैधानिक ढच्याला जे जुमानत नाही त्यांच्या कडून सकारात्मक वक्तव्याची आशा करणे व्यर्थच.
पण आपल्या सारख्या सामान्य जनतेलाच हा विचार करण्यासारखा आहे की त्यांना कोणाला मत द्यायचे आहे, त्यांना जे नागपुरातून देशाचा विचार मांडतात, की त्यांना जे देशाचा विचार न करता आपली सत्ता कशी कायम राहील याचा विचार करतात त्यांचा.
शेवटी लोकशाहित जनता जो विचार करते, तेच राजा म्हणून जनतेच्या डोक्यावर बसतात, हीच लोकशाहीची खासियत आहे. ज्यांना आपल्या सत्तेचा माज आला आहे त्याना जागा दाखवायची वेळ हीच आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा