लोकशाहीच्या गळचेपीचे वास्तव आणि विवेकवादी प्रेश्या

                      विक्रम गोखले यांनी "लोकशाहीच्या गळचेपी बद्दल गळे काढणाऱ्या लोकांना थोबाडून काढायला हवे." असे वक्तव्य दिले आणि भारतातील सगळ्या तथाकथित लोकशाहीवादी पुरोगामी, विवेकी बुद्धिवादी यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. त्याच्या साठी ही "झुंडशाही" ची भाषा होती, भारतासारख्या अहिंसावादी विचारांच्या देशात अशी हिंसावादी लोक असणे म्हणजे अब्रम्हण्यम्!

                   पण या तथाकथित पुरोगाम्यांनी कधी स्वतःच्या किंवा हे ज्यांना आपले मानतात त्या लोकांच्या वक्तव्यांकडे लक्ष दिले आहे का? 
                   याच पुरोगाम्यांच्या टोळीतील विवेकवादी बुद्धिवंत लेखक विजय तेंडुलकर यांनी काही वर्षा पूर्वी," माझ्या हातात पिस्तुल आले तर, सर्वप्रथम मी नरेंद्र मोदी यांना गोळ्या घालेल" असे हिंसक वाक्य "विवेक बुद्धीने" फेकले होते काय?
                       विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्या वरून टीका करणारे बेरोजगार तथाकथित विवेकवादी पत्रकार निखिल वागळे पण जानेवारी २०१७ मध्ये "खून करावासा वाटतो" सारखे वक्तव्य कोणत्या विवेकी पत्रकारांच्या भूमिकेतून केले होते? आणि त्यांना कोणाचा खून करावासा वाटला हे सूर्य प्रकाशा इतके स्वच्छ होते.

                या दोन्ही तथाकथित विवेकवादी बुद्धिवादी लोकांचा किती विवेकवाद्यांनी निषेध व्यक्त केला होता, उलट विरोध करणाऱ्या लोकांना "त्यांचा सिस्टीम वरचा राग समजून घ्या" अशी सामंजस्याचिच भाषा केली होती. 

                  मग आताही विक्रम गोखले यांना विरोध करण्यापेक्षा त्यांच्या भावना समजून घेणे इष्ट नाही काय? 

                          खरे तर नरेंद्र मोदी हे "हुकूमशहा" आहेत हा दुष्परचार गेले अनेक वर्षे याच तथाकथित विवेकवाद्यांकडून केला जात आहे. २०१४ नंतर तर या प्रचाराला धार आली, अभिव्यक्ती स्वातंत्र्या पासून सुरू झालेला हा दुष्परचार असहिष्णुता वगैरे स्थानके घेत संविधान बदल पर्यंत येऊन पोहचला! त्या नंतर तर २०१९ च्या निवडणूकच होणार नाही, आणीबाणी लागेल, युद्ध होईल असे करत लोकशाहीच्या गळचेपीच्या रडगण्यात बदलला.

                          पण आपल्याला चित्र नक्की काय दिसले? तर निवडणूक आयोगाने योग्य वेळी निवडणुका तर घोषित केल्याच, पण त्याचे योग्य नियोजन करत आता पर्यंत ४ टप्पे पूर्ण केलेत पण! तेही एकदम निर्भय वातावरणात मग येथे लोकशाहीची गळचेपी झाली कुठे? 

                     राहिला "ठोकशाहीच्या" भाषेचा प्रश्न! तर भाषा कोण वापरत आहे या वर या तथाकथित विवेकवाद्यांचा विरोध ठरलेला असतो.
                          मग गोत्यात आणणारा प्रश्न विचारला म्हणून पत्रकाराला,"तुझी XX मारेल" अशी धमकी असो, वा भर सभेत," मला विरोध करणाऱ्यांना ठोकून काढा" असा आदेश देणारे प्रकाश आंबेडकर यांचा विरोध किती विवेकवाद्यांनी इतक्याच प्रखरपणे केला? उलट चुकीचा प्रश्न विचारला कसा? असे दोषरोपन त्या पत्रकारावर करणारे महाभाग या विवेकवद्यात होते.
                          राज ठाकरे यांच्या "ठोकशाहीच्या" विरोधात रकाने लिहणारे विवेकवादी आता मात्र याच राज ठाकरे समर्थकांनी टीका केली म्हणून लोकांना घरात घुसून मारले, इतकेच नाही तर त्याचे व्हिडीओ समाज माध्यमातून निर्लज्ज पणे प्रसारित पण केले किती विवेकवाद्यांनी या गोष्टींचा विरोध केला? भाजप वर शुद्धीकरणाचा आरोप करणारे ह्याच विवेकवाद्यांनी "ठोकशाही" पुरस्कर्ते राज ठाकरे यांना मात्र पवित्र करून घेतले. कारण फक्त नरेंद्र मोदी विरोध.
             याच विवेकवाद्यांनी बंगाल मधील प्रत्येक निवडणुकीत ममता बानो कडून होणारा रक्तरंजित खेळ म्हणजे "लोकशाहीची गळचेपी" वाटत नाही काय?
                    सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा समजून उमजून चुकीचा अर्थ जनतेच्या मनात भरवत "चौकीदार चोर है।" च्या वावड्या उठवणारा खोटारडेपणा करणारा राहुल गांधी "लोकशाहीची गळचेपी" करत नाहीये काय?

                   देशाच्या संवैधानिक अधिकाराचे रक्षण करणाऱ्या पोलीस आणि गरीब आदिवासी यांच्या रक्ताने आंघोळ करणाऱ्या नक्षलवाद्यांचे समर्थन करणारे तथाकथित विवेकवादी "लोकशाहीची गळचेपी" करणारे नाहीत काय?

                       देशाच्या सैनिकांना आणि सामान्य नागरिकांना घातपात घडवून मारणाऱ्या इस्लामी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्थानला धडा शिकवण्याचे बहुसंख्य भारतीयांचे मत असतांना त्या ऐवजी त्याच्याशी शांततेच्या चर्चा करण्याकरता दबाव आणणे आणि धडा शिकवल्यावर आपल्याच सरकारचा निषेध करणे पण "लोकशाहीची गळचेपी" नाही काय?

                             खरे तर यांना संविधान आणि लोकशाही याच्याशी काही देणे घेणे नाही. पण संविधान आणि लोशाहीच्या रडगाण्याच्या अश्वावर बसून यांनी सत्ता सुंदरी वर काबीज व्हायचे आहे. म्हणजे मग याच्या विवेकवादाच्या चरख्यात भारतीय जनतेला देत त्या तुन येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आर्थिक रस स्वतः पीत, जनतेचया इच्छा आणि आकांक्षाचे चिपड़ फेकून देण्यात येईल. नेमक्या वर्मावर विक्रम गोखले यांनी बोट ठेवल्याने जळफळाट.

                     बाकी हे विवेकवादी फक्त "वैचारिक व्यभिचार" करतात आणि हा व्यभिचार लोकांच्या नजरेत येऊ नये म्हणून ही सगळा आकांततांडव! 

                      ह्यांना धंदा शिकवायचा तर लोकशाही मार्गानेच शिकवावा लागणार, आणि तेव्हाच यांचा विवेकवाद्यांचा बुरखा टराटरा फाटून यांचा "वैचारिक व्यभिचारी" म्हणून खरा भेसूर चेहरा समोर येईल.

टिप्पण्या