"माँ माटी मानूश" अशी दमदार घोषणा देत २०११ साली "डाव्यांची" ३४ वर्षाची जुलमी राजवट घालवत पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी सत्तेत आली. संपूर्ण भारतात या विजयाचे स्वागतच झाले होते.
पण बंगाली लोकांसाठी, विशेषतः बंगाली हिंदू लोकांसाठी मात्र हे नवीन सरकार "नव्या बाटलीत, जुनी दारू" अशीच राहिली.
बंगाल मधील जी व्यवस्था, गुंडागर्दी "डाव्या" व्यवस्थेत होती, तीच व्यवस्था कायम ठेवत फक्त "डाव्या" कार्यकर्त्यांच्या जागी "तृणमूल" चे कार्यकर्ते आले.
जे व्यवस्थेचे तेच "सर्वधर्मसमभावचे" ! बंगाल मध्ये आधीच बांगलादेशी मुस्लिम घुसखोर हा महत्वाचा मुद्दा होता, त्या घुसखोरीला "डाव्यांचे" अभय होते, तोच कित्ता ममता बॅनर्जी यांनी पण या घुसखोरांना अभय दिले, इतकेच नव्हे तर त्यांना खुश करण्यासाठी हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर बंदी घालायला पण कमी केले नाही.
२०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सत्तेत आल्यावर तर ममता बॅनर्जी भारतीय संविधानाला अपेक्षित देशाच्या संघीय एकतेला तडा जाईल अशी वागणूक करायला लागली. या वागणुकीमुळे अपेक्षित पणे ममता बॅनर्जी भारतातील तमाम तथाकथित पुरोगामी लोकांच्या गळ्यातील ताईत बनली. या लोकांना एक नवीन "मसीहा" भेटल्याचा आनंद झाला.
या तथाकथित पुरोगाम्यांच्या लोभामुळे ममता बॅनर्जी यांची वाटचाल मात्र हिटलर शाही कडे व्हायला लागली. २०१८ मध्ये बंगाल मधील मालदा, खडगपूर सारख्या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार करणारे दंगे झाले. आश्चर्य म्हणजे अजूनही २००१ च्या गुजरात दंगलीचे वार्तांकन करणाऱ्या पुरोगामी वृत्तसृष्टीला मात्र जवळपास १५ दिवस या दंगलीला महत्व द्यावे असे वाटले नाही.
याच सगळ्या कारणाने अगोदरची प्रेमळ "ममता दीदी" बंगाल आणि भारतात पण "ममता बानो" म्हणून ओळखल्या जाऊ लागली. इतकेच नाही तर २०१८ च्या बंगाल मधील पंचायत निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात हिंसाचार याच बाईने घडवून आणला.
२०१९ च्या निवडणुकी आधी भाजप विरोधात एकत्र येणाऱ्या विरोधकांचे नायिका पद आपसूकच ममता बानो कडे चालत आले. त्या तुन ममता बानो यांच्या "हिटलरशाही" त भरच पडली.
मग आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या "शारदा चिटफंड" घोटाळ्यातील लोकांना वाचवायकरता, आपल्या पोलीस अधिकाराच्या चौकशी करता आलेल्या केंद्रीय एजन्सी CBI अधिकाऱ्यांना फक्त अटक करणेच नाही तर, ज्या अधिकाऱ्यांची चौकशी करायची होती, त्या अधिकाऱ्या सोबत "धरणे आंदोलन" करत या चौकशीत अडथळा निर्माण करण्यात या बाईने धन्यता मानली. सर्वोच्च न्यायालयाच्या फटकार्यामुळे आंदोलन मागे घ्यावे लागले ही गोष्ट वेगळी.
पण या मुळे नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या विरोधात एक नवीन चेहरा मात्र समोर आला. या नंतर मात्र ममता बानो यांनी मागे वळून बघितले नाही.
पण या आक्रस्थळी वागणुकीमुळे बंगाल मध्ये भाजपला आपला पाय रोवयला सुपीक जमीन आपण उपलब्ध करून देत आहोत याची जाणीव पण या बाईला झाली नाही.
२०१९ च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बंगाल मधील भाजपचा वाढता प्रभाव ममता बानोच्या डोळ्यात खुपायला लागला. मग प्रचारासाठी बंगाल मध्ये येणाऱ्या योगी आदित्यनाथ, शिवराज सिंग चव्हाण, अमित शहा यांच्या सारख्या भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या हेलिकॉप्टरला आयत्यावेळी उतरायची परवानगी न देणे, त्यांच्या सभेला परवानगी नाकारणे असले चुकीचे धंदे सुरू केल्या गेले.
हिंदू बहुल क्षेत्रात "जय श्री राम" सारख्या घोषणा दिल्यावर, तेथील लोकांना धमकवणे, मतदारांना भाजपला मतदान न करण्यासाठी धमकवणे, आपल्या विरोधात व्यंगचित्र बनवणार्याला, किंवा समाज माध्यमांवर ममता बानोच्या खिल्ली उडवणार्या पोस्ट आणि मेम बनवणाऱ्या लोकांना जेल मध्ये टाकण्या इतक्या खालच्या थराला ही बाई पोहचली.
पण आश्चर्य म्हणजे गेली पाच वर्षे नरेंद्र मोदी यांच्या वर लोकशाहीची हत्या, अघोषित आणीबाणी, अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे हत्यारे, असहिष्णुतेचा आरोप करणाऱ्या वृत्तसृष्टीला मात्र ममता बानोचे कारनामे दिसले नाही, किंबहुना या कडे या वृत्तसृष्टीने कानाडोळाच केला.
या सगळ्याचा शेवट आज कलकत्त्याला अमित शहा यांच्या "रोड शो" वर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत मजल मारली गेली. बंगाल मधील भाजपचे वाढते अस्तित्वच या सगळ्या कथित बुद्धिवादी पुरोगामी आणि ममता बानो यांच्या डोळ्यात खुपले.
येत्या दिवसात भाजपला ममता बानोच्या आक्रस्थाळे पणाचा किती फायदा झाला हे कळेलच. पण रात्रंदिवस संविधानाच्या रक्षणाकरता मगरीचे अश्रू गळणाऱ्या आणि लोकशाहीच्या गलचेपीचे रडगाणे गाणाऱ्या भारतातील तमाम पुरोगाम्यांना ममता बानो यांचा हा संविधान आणि लोकशाही विरोधी हिटलरी चेहरा दिसत आहे का? हा खरा प्रश्न आहे.
विकत घेतलेल्या चॅनल व वर्तमानपत्रे कुठल्या तोंडाने अशावेळी बातम्या
उत्तर द्याहटवादाखविणार/ प्रसिद्ध करणार?
यथार्थ आणि परखड विवेचन👍👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम वस्तुनिष्ठ विश्लेषण
उत्तर द्याहटवा