काँग्रेस जरी स्वतःला मध्यम मार्गी पक्ष स्थापित करत असाला तरी कम्युनिस्ट विचारसरणीचा एक मोठा गट काँग्रेसमध्ये सतत कार्यरत होता आणि आहे.
अगदी पंडित नेहरूंच्या काळात पण हा कम्युनिस्ट विचारसरणीचा गट सत्ता वर्तुळात राहून सरकारच्या गळ्यात आपला "अजेंडा" उतरवण्यात हुशार होता. कृष्ण मेनन आणि केशवदेव मालवीय या गटाचे नेते होते. हे दोघेही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जवळचे आणि मर्जीतले असल्या मुळे तत्कालीन परिस्थितीत त्यांना कोणीही विरोध करू शकत नव्हते.
पण १९६४ मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यू नंतर या गटाला वाईट दिवस आले. काँग्रेसमधील सत्ता वर्तुळाच्या बाहेर हा गट फेकल्या गेला. स्वतः कृष्ण मेनन यांना ईशान्य मुंबईची उमेदवारी देण्यास स.का. पाटील यांनी विरोध करत त्या उमेदवारी पासून मेनन यांना वंचित ठेवले. परिणामी १९६७ च्या निवडणुकी आधी कृष्ण मेनन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
पण कम्युनिस्ट विचारांचसरणीचा गट मात्र कायम होता, काळाची पाऊले ओळखत त्यांनी थोडे नमते घेतले असले तरी, त्यांनी स्वतःमध्ये एक महत्वाचा बदल घडवला, त्यांनी स्वतःला "पुरोगामी समाजवादी" म्हणण्यास सुरवात केली आणि पुन्हा काँग्रेसच्या सत्ता वर्तुळात येण्याची धडपड पण!
१९६६ साली लालबहादूर शास्त्री यांचे निधन झाले आणि "सिंडिकेटने" इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवले. इंदिरा गांधी आपल्याला विचारून राज्यकारभार करतील ह्या "सिंडिकेट" च्या आशेवर इंदिरा गांधी यांनी बोळा फिरवला. सोबतच काँग्रेसमध्ये सिंडिकेट विरुद्ध इंडिकेट ह्या प्रसिद्ध युद्धाला सुरवात झाली.
या युद्धात फायदा कोणी करून घेतला असेल तर तो वर सांगितलेल्या सत्ता वर्तुळाच्या बाहेर फेकले गेलेल्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या गटाने! स्वतःला "पुरोगामी समाजवादी" म्हणवून घेत त्यांनी इंदिरा गांधी यांचा पक्ष उचलला.
सिंडिकेट विरोधातील हत्यार म्हणून "समाजवादी आर्थिक विचारांचा" उपयोग केला गेला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताची अर्थव्यवस्था ही भांडवलशाही आणि समाजवादी या प्रकारात "मिश्र पध्द्तीवर" आधारित ठेवली होती. पण इंदिरा गांधी यांनी या "पुरोगामी समाजवादी" गटाला हाताशी धरून या व्यवस्थेला
काँग्रेसमधून आणि भारताच्या आर्थिक जगतात पण विरोधाचा आवाज होत असतांना पण इंदिरा गांधी यांनी भारतीय बँकांचा जो राष्ट्रीयकरणाचा घाट घातला, तो या "नव समाजवादी पुरोगामी" कंपूच्या मदतीने. या कंपूने देशात वातावरण निर्मिती अशी केली की या राष्ट्रीयकरणाच्या विरोधात जो कोणी बोलेल तो "प्रतिगामी" त्याला भारतातील गरिबांविषयी-वंचितांविषयी अजिबात प्रेम नाही. खुद्द काँग्रेस पक्षात या परिस्थिला कसे तोंड द्यायचे या बद्दल काही ठरत नव्हते, आणि इंदिरा गांधी अधिक आक्रमक बनत होत्या. शेवटी १९६९ च्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात इंदिरा गांधी यांनी बँकांच्या राष्ट्रीयकरणाची घोषणा केली, या तथाकथित पुरोगामी कंपूने ही घोषणा डोक्यावर घेतली. १९ जुलै १९६९ रोजी या बाबतचा अध्यादेश काढण्यात आला.
भारताच्या आर्थिक घडामोडीत अपूर्व फेरफार घडवून आणणारा निर्णय संसदेत चर्चा न होता, एक वाक्यता न करता, फक्त तथाकथित "पुरोगामी समाजवादी" यांनी केलेल्या वातावरण निर्मितीतुन करण्यात आला आणि कोणी त्याला विरोध पण करू शकले नाही.
या नंतर इंदिरा गांधी यांनी ती लोकप्रिय घोषणा देत देशात आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला, ती घोषणा म्हणजे "गरिबी हटाव"! ही घोषणा प्रत्यक्षात आणायला जो १० कलमी कार्यक्रम मांडला होता त्यात ह्या कम्युनिस्ट गटाचा हात स्पष्ट दिसत होता.
१९७१ मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्यावर या "कंपूला" सत्ता वर्तुळाच्या आत येता आले, त्या नंतर मात्र कोणी कोणाचा कसा उपयोग करून घेतला हे मात्र तुम्ही विचार करून बघा!
या तथाकथित पुरोगामी कंपूने मंत्रिपद घेतली नाहीत, तर शिक्षण समित्या, इतिहास लेखन समित्या या सारख्या समित्यांमध्ये आपले बस्तान बसविले. इंदिरा गांधी खुश होत्या सत्तेतील वाटा द्यावा लागला नाही म्हणून आणि हा पुरोगामी कंपू खुश होता आता मनासारखे काम करता येईल म्हणून.
हा तोच काळ आहे जेव्हा आपण हळूच सोवियत रशियाच्या मांडीत अलगत जाऊन बसलो. तेव्हा पासूनच हे "पुरोगामी" वातावरण निर्मितीचा खेळ घेलण्यात हुशार झाले.
२०१४ च्या नंतर आपणही या "पुरोगाम्यांच्या" वातावरण निर्मितीचा खेळ अनेकदा बघितला. मग तो असहिष्णुतेच्या नावाखाली "पुरस्कार वापसी" चा असो, किंवा दर काही दिवसांनी दिलेला "संविधान बचाव" चा नारा असो, अमोल पालेकर यांचे औचित्यभंग करणारे भाषण थांबवल्यावर केलेला कांगावा असो, की नयनतारा सहगल प्रकरणा वरून सरकार वर अकारण केलेली चिखलफेक असो, JNU मधील देशविरोधी तमाशा असो, की हैद्राबाद विषवविद्यालय मधील रोहित वेमुला यांच्या आत्महत्येचा सरकार विरोधात केलेला गैरवापर असो!
एकाएकी भारताच्या अमिरखान पासून नसरुद्दीन शहा सारख्या अभिनेत्यांना भारत जगण्यासाठी असुरक्षित वाटायला लागणे हा या तथाकथित पुरोगाम्यांच्या "वातावरण निर्मितीचा" एक भाग होता.
ही वातावरण निर्मिती करतांनाच दबाव टाकणे हा पण एक या षडयंत्राचा भाग असतो. हे दबावतंत्र वेग वेगळ्या पद्धतीने काम करत असते. महाराष्ट्रात आपण यवतमाळ साहित्य संमेलना अगोदर नयनतारा सहगल प्रकरणा नंतर संमेलन अध्यक्ष अरुनताई ढेरे यांना जेवायला बोलवत पाहुनचाराच्या नावाखाली त्यांनी आपल्याला हवे ते बोलायचा दबाव टाकला होताच. अश्या वेळेस अरुनताई ढेरे सारख्या ज्यांचा सहगल प्रकरणाशी काही संबंध नव्हता त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तमा या पुरोगाम्यांनी बाळगली नाही ते तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या अभिव्यक्तीची तमा बाळगणार असे तुम्हाला वाटते काय?
पण वातावरण निर्मिती करता असे दबावतंत्र वापरावेत लागते! याच वातावरण निर्मितीच्या दबवतंत्रा साठी म्हणून भाजप ला मतदान करू नका असे आवाहन करणारे पत्रक तथाकथित पुरोगामी कलाकारांनी काढले. भारतातील नावाजलेले ६०० कलाकार असे काही आवाहन करत आहे म्हणजे त्यात तथ्य असेल असे भारतातील भाबड्या जनतेला विश्वास वाटेल असा पुरोगाम्यांच्या अंदाज होता. आज पर्यंत असेच "वातावरण निर्मिती" करत अनेक चुकीचे निर्णय या "पुरोगाम्यांनी" भारतीय जनतेच्या गळ्यात मारले तर होते. तसेच या वेळी घडेल असा त्यांचा होरा होता.
पण या वेळेस जनता जागरूक होती, या ६०० सह्याविरोधात भारतातील तितकेच मोठे ९०० कलाकार एकवटले आणि त्यांनी भविष्यातील संपन्न आणि शक्तिशाली भारतासाठी नरेंद्र मोदी आणि भाजप लाच निवडून आणा असे आवाहन असलेले पत्रक प्रसिद्ध केले आणि अगोदरच्या पत्रकाची हवाच काढून घेतली.
या वेळेस "वातावरण निर्मिती" चे हत्यार त्यांच्यावरच उलटले. आता या तथाकथित पुरोगाम्यांचे पुढचे पाऊल काय राहील हे बघणे नक्कीच मनोरंजक ठरेल. सोबतच निवडणुकीच्या निकालानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया पण तितक्याच आक्रमक राहतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा