बात निकलेंगी तो दूर तलक जायेगी...........2

              आज भारतातील तमाम तथाकथित पुरोगाम्यांना देशात "लोकशाही संकटात" आली असल्याचा, देशात "अघोषित आणीबाणी" असण्याचा साक्षात्कार होतो आहे. पण या सगळ्याची सुरवात तर या देशात ३० वर्षा पूर्वीच झाली होतीच आणि ती फार भयानक होती. इंदिरा गांधी यांनी तरी कायद्याने आणि उघडपणे आणीबाणी लावली होती. पण राजीव गांधी यांच्या काळात तर सरकारच्या काळ्या चेहऱ्याची अनेक उदाहरणे समोर आहे.

                     कोणत्याही पुराव्या शिवाय "चौकीदार चोर है।" या घोषणा देणारे काँग्रेसी राहुल गांधी असो, की याच घोषणा लहान पोरांकडून म्हणवून आनंद घेणाऱ्या प्रियंका गांधी असो की त्यांचे गुलाम या लोकांची खरी मानसिकता दाखवणारी ही घटना आहे.

                      २७ मे १९८८ ला पटना रेडियो स्टेशनवर एक कार्यक्रम प्रसारित केल्या जात होता, त्यात एका मुलीला एक विनोद एकवण्याची फर्माईश केल्या गेली. त्या वर त्या पोरीने म्हंटले "गली गली में शोर है, राजीव गांधी चोर है।" हे दिवस तेच होते जेव्हा "बोफर्स दलाली प्रकरण" गाजण्याचे!

                 या घटनेला धरून सागर विश्वविद्यालयांच्या पत्रकारिका विभागाच्या प्रवेश परीक्षेत एक प्रश्न विचारल्या गेला, "ऑल इंडिया रेडिओ च्या कोणत्या स्टेशनने "राजीव गांधी चोर है" हे वाक्य प्रसारित झाले?". या घटनेवर विचारल्या गेलेल्या प्रश्नाने सागर विश्वविद्यालयातील पत्रकारिता विभागाचे मुख्य प्राध्यापक प्रदीप कृष्णात्रय यांना मात्र भारी किंमत चुकवावी लागली.

                      या घटने नंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारिता विभागात जाऊन या प्राध्यापक प्रदीप कृष्णात्रय यांना जबर मारहाण केली. इतकेच नाही तर त्यांच्या चेहऱ्यावर काळे फासून त्यांना संपूर्ण विश्वविद्यालय परिसरात फिरवण्यात आले.

                        या भयानक घटनेनेनंतर त्या प्राध्यापकाच्या प्राक्तनातील भोग संपले नाही. या नंतर सागर विश्वविद्यालय प्रशासकीय विभागाने प्राध्यापकावरच चौकशी समिती बसवली. त्यांना या घटने बाबत उत्तर मागवण्यात आले. विश्वविद्यालयायला या सगळ्याचे उत्तर देण्याआधी पोलीस तिथे पोहचले. आता त्या प्राध्यापकाला पोलिसांचा पण रोष सहन करावा लागणार होता. 

                    पोलिसांनी अभद्र व्यवहार करणे, अपमान करणे, शांतता भंग करणे असे आरोप प्राध्यापकवर ठेवत IPC कलम २९४ आणि ५०४ कालामांखाली प्राध्यापक कृष्णत्रय यांना अटक केल्या गेली.

                या घटनेवर राज्य जन मोर्चाचे महासचिव श्री विनय दीक्षित यांनी म्हंटले होते,"ये असहिष्णूता की हद थी।"

                   प्राध्यापक सोबत वाईट वागणूक करणाऱ्या १० लोकांना पोलिसांनी अटक तर केली, पण लगेच त्यांना जामीन पण मंजूर केल्या गेल्या.

                या संपूर्ण प्रकरणात फक्त प्राध्यापकाचेच तोंड काळे झाले नाही तर, राज्यात सत्तेत असलेल्या तत्कालीन काँग्रेस सरकारचे काळे तोंड आणि काळे कारनामे पण जनतेच्या समोर आले.

              ज्यांना या घटनेविषयी शंका असेल त्यांनी १५ सप्टेंबर १९८८ चा इंडिया टूडे चा अंक जरूर मिळवावा, त्यात ही घटना अत्यंत विस्ताराने देण्यात आली  आहे. 

           देशात "अघोषित आणीबाणी" वाटणाऱ्या पुरोगाम्यांना आणि असल्या घटना जगासमोर आणत असणाऱ्या आमच्या सारख्यांना "भक्त" म्हणणाऱ्या गुलामांनी तर या भयावह घटनेवर नक्कीच प्रकाश टाकावा.

घटना साभार: सतवीर सिंग



टिप्पण्या