इदी अमीन माहीत आहे सगळ्यांनाच! हो तोच इदी अमीन, युगांडाचा 1971 ते 1979 पर्यंत हुकूमशहा राहिलेला, तोच इदी अमीन ज्याच्या नाकावर टिचून इस्रायल ने आपले अपहरण झालेले विमान धडक कमांडो कारवाई करत सुखरूप वापस आणले. तत्कालीन परिस्थितीत जगातील सगळ्यात क्रूर हुकूमशहा होता हा.
"आपण माणसाचे मास पण खाल्ले आहे." असे अभिमानाने सगळ्यांसमोर सांगणारा नरभक्षक!
तर साधारण 1972 मध्ये सकाळी याने सांगितले की, "अल्ला ने स्वप्नात येऊन सांगितले की सगळ्या ब्रिटिश पासपोर्ट जवळ असलेल्या आणि एशियन मूळच्या लोकांना देशातून हद्दपार कर." लगेच या आदेशाची अमलबजावणी सुरू करण्यात आली. मुळातच युगांडा हा भारता प्रमाणेच ब्रिटिश गुलामगिरीत होता. त्या मुळे तेव्हा ब्रिटिश लोकांसोबत अनेक भारतीय हिंदू-शीख वास्तव्य करत होते. त्यांनी मेहनतीने आपले आर्थिक साम्राज्य उभे केले होते. या लोकांना एका रात्रीत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले.
तेही नेसत्या कपड्यांवर! अनेक वर्षे युगांडात राहणाऱ्या अनेक भारतीय तर देशा बाहेर कधी पडलेच नव्हते, पूर्ण पणे त्या देशाचे होऊन राहिले होते. पण याच लोकांना युगांडातून कोणत्याही प्रकारे संपत्ती देशाबाहेर नेता येणार नव्हती. इतकेच नाही तर आपले घरा मधील- दुकाना मधील सामान विकायला पण बंदी घालण्यात आली. शहरापासून पाच किलोमीटर दूर असलेल्या विमानतळावर जातांना पण 4 ते 5 वेळा सामानाची आणि शरीराची झडती घेतली जात होती, कारण कोणी लपवून पैसे, सोने, चांदी या रुपात तर संपत्ती बाहेर घेऊन जात नाही ना हे बघायला.
ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांच्या दूतावासाने या निर्वासित झालेल्या भारतीयांना मदत करायला सुरुवात केली. पण भारत तेव्हा कुठे होता?
1971 नंतर कणखर पंतप्रधान हा लौकिक मिळववलेल्या इंदिरा गांधी यांनी या घडामोडिंबाबत आश्चर्य कारक पध्द्तीने मौन बाळगले आणि हा त्या देशातील अंतर्गत प्रश्न आहे म्हणत आंतराष्ट्रीय समुदायाच्या इदी अमीन याच्यावर कारवाई करण्याचा भूमिकेत साथ तर सोडलीच, पण अनेक भारतीयांचा रोह पण पत्कारला. खरे तर तेथील भारतीयांना तेव्हा भारत सरकारच्या मदतीची अत्यंत आवश्यकता होती. पण भारत सरकारने परिस्थितीवर लक्ष ठेवायला विदेश विभागाच्या एका अधिकाऱ्याला तिथे पाठवले बस्स!
त्या मुळे तेव्हाच्या परिस्थितीत युगांडातील निर्वासित भारतीयांनी ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इतर युरोपियन देशात आश्रय घेतला आणि श्यूण्यातून पुन्हा आपले आयुष्य उभे केले. युगांडातून ब्रिटन मध्ये शरण घेतल्याची संख्या जास्त होती, त्यांनी तर ब्रिटनचा व्यापारात आमूलाग्र बदल घडवून आणले.
या दुर्दैवी भारतीय लोकांना मदत झाली ती युगांडातील भारतीय बँकेच्या शाखेची! बँकेचे नाव होते "बँक ऑफ बडोदा" काही हुशार भारतीयांनी या बँकेत लॉकर उघडून आपले दागिने ठेवले. बँकेने ते जपलेच नाही तर इदी अमिनचे सरकार गेल्या नंतर ज्याचे आहे त्यांना वापस पण केले, हाच थोडा फार दिलासा!
इस्रायल असो की अमेरिका, आपल्या देशाचा नागरिक जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहात असो त्याच्या जीवाचे आणि संपत्तीचे रक्षण करणे आपले कर्तव्य समजते, त्यातल्या त्यात इस्रायला तर तो "ज्यू" असणे जास्त महत्वाचे असते, मग तो इस्रायलमध्ये वास्तव्यास नसला तरी हरकत नाही. पण आपण इतके करंटे होतो की काही लाख भारतीय निर्वासितांना पण आपण आपल्याच देशात आश्रय देऊ शकलो नाही.
ही समज यायला आपल्याला काँग्रेसचे सरकार जाऊ द्यावे लागले. युगांडाच्या घटने नंतर 1990 मध्ये इराण आणि कुवैत मध्ये झालेल्या पहिल्या आखाती युद्धात आपण कुवैत मध्ये फसलेल्या 1,75,000 च्या आसपास असलेल्या अनिवासी भारतीयांना सुरक्षित बाहेरच काढले नाही तर, भारतीय "एअर इंडिया" या विमान कंपनीने 49 दिवसात 450 च्या वर चकरा मारत एक नवीन वीश्वकिर्तीमान पण स्थापन केला, आणि जे काम अमेरिका सारखा देश नाही करू शकला ते करून दाखवले.
म्हणूनच जो स्वतःच्या फायद्या पेक्षा देशाची आणि देशवासीयांची चिंता करतो त्यांनाच देशच्या सर्वोच्च पदी बसण्याचा अधिकार द्यायला हवा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा