द वायरचा "खोटेपणा", राज ठाकरे यांचा भामटे पणा

                 राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या तेराव्या वर्धापन दिनी दिलेल्या भाषणात "द वायर" सारख्या खोट्या बातम्या देणाऱ्या नियतकालिकेचे उदाहरण देत भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या वर आणि त्यांचा मुलगा शौर्य डोवाल यांच्यावर गंभीर आरोप केले. अर्थात राज ठाकरे यांना आताशा महाराष्ट्रातील जनता गंभीरतेने घेत नाही, जी स्थिती राज ठाकरे यांची तीच "द वायर" ची "जस्टीस लोया प्रकरणात" हेच "द वायर" किती "लायर" आहे हे पण जनतेने बघितले आहे. 

                         नरेंद्र मोदी आणि एकूणच हिंदुत्ववादी आणि "राष्ट्रप्रेमी" लोकांवर या द वायरचा आणि कारवानचा राग आहे. महाराष्ट्राचे सूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नाहक बदनामी करणारा लेख पण याच द वायर मध्ये आला होता. मुळातच उग्र डाव्या विचारांशी बांधिलकी असणारे हे नियकलीत भारतातील नक्षलवादि आणि काश्मीरिंसोबत जे जे  "फुटीरतादी" आहेत त्याच्या मागे उभे राहणारे हे घरभेदी नियतकालिक आहे. मग नक्षलवादाचा समाचार घेणारे, "शहरी नक्षलींना" कारागृहात टाकणारे, फुटीरतावाद्यांना जगणे कठीण करणारे, आणि भारतात दहशतवाद पसरावणाऱ्या पाकिस्थानला दहशत घालणाऱ्या अजित डोवाल हे यांच्या डोळ्याला खुपणार हे जगजाहीर आहे.

                      त्याच मुळे एका लेखात भारत सरकारचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या पोरगा शौर्य डोवाल विषयी पण अत्यन्त चुकीचे आरोप केल्या गेले. 
                      आरोप हा की  शौर्य डोवाल जी वाणिज्यिक संस्था सिंगापूर येथे चालवतात त्यात त्यांचा भागीदार पाकिस्थानी नागरिक आहे. म्हणजे हे पाकिस्थान सोबत व्यवसाय करतात आणि भारताच्या व्यापाऱ्यांना पाकिस्थान सोबत व्यवसाय करायला नकार देतात. हे सगळं भारताने पुलवामा हल्ल्या नंतर पाकिस्थानला दिलेला "MFN" चा दर्जा काढल्यावर पाकिस्थान मध्ये आलेली जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई मुळे ओढवलेल्या परिस्थितीच्या पर्शवभूमीवर होत आहे याचा विचार करावा.डाव्या विचारावर चालणाऱ्या वायर आणि कारवान सारखी नियतकालिके यात आघाडीवर आहेत. 

                         पण या नियतकालिकांनी शौर्य डोवाल यांच्या कामाच्या विषयी लिहलेल्या गोष्टी असत्य आणि बदनामी कारक आहेत आणि म्हणून शौर्य डोवाल यांनी या नियतकालिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे.

                        शौर्य डोवाल हे चार्टड अकाऊंटंट आहेत, त्यांनी लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्स मधून MBA केलेले आहे. त्यांनी तेथेच मॉर्गन स्टँडले आणि जी ई कॅपिटल सारख्या जागतिक स्तरावरील कंपन्यांमध्ये डायरेक्टर पदावर काम पण केले आहे. त्यांनी लंडन येथेच झेउज कॅप नावाची वाणिज्यिक संस्था उभी केली आणि याच संस्थेच्या विलनिकरणातून टॉर्च फाईनशीअल सर्व्हिसेस तयार झाली, ही संस्था असेट मॅनेजमेंट मध्ये काम करते.
                        तर शौर्य डोवाल संचालक असलेल्या या टॉर्च फायनान्शिअल सर्व्हिसेस मध्ये बहुतांश अधिकारी हे भारतीयच आहे. या संस्थेत CA, CS, CAFA, आणि IIT मधील लोकांचा समावेश आहे. 

                          या संस्थेच्या सुपरवायजरी बोर्ड मध्ये डोवाल यांच्या सोबत सौदी अरेबियाच्या शाही कुटुंबातील हिज हायनेस प्रिन्स मिशाल बिन अब्दुल्ला बिन तुर्की बिन अब्दुलअजीज अल सौद हे आहेत, तर दुसरे 27 वर्षाचा अनुभव असलेले भारतीय रमण कुमार नावाचे बँकर आहेत. तर तिसरे एरीक वोचमेईस्टर हे स्वीडिश नागरिक आहेत.

                    आता ज्या वरून या संस्थेत पाकिस्थानी सहभागी असल्याचा आरोप करत आहे त्या बद्दल बघू!
       या नंतर चवथे नाव आहे ते सय्यद अली अब्बास! यांच्याच मुळे शौर्य डोवाल यांच्यावर पाकिस्थानी भागीदारीचा आरोप होत आहे. 
                          http://www.saudibritishsociety.org.uk/main/committee.html
              पण हा सय्यद अली अब्बास नावाचा माणूस अरेबियन वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे. सोबतच ब्रिटिश राजघराणे आणि सौदी राजघराणे मिळून "सौदी ब्रिटिश सोसायटी" चालवतात या सोसायटीचे हे कमिटी मेम्बर आहेत. या सोसायटीच्या दहा कमिटी मेम्बर्स पैकी सात ब्रिटिश नागरिक असून उर्वरित अरेबियन! 

                                 इथे पाकिस्थानचा दूर दूर पर्यंत काही संबंध नाही. फक्त शौर्य डोवाल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या बदनामीचा डाव आहे, अजित डोवाल यांना संशयित म्हणून जनते समोर आणल्यामुळे नक्की फायदा कोणाचा होणार हे तर सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. 

                         राज ठाकरे सारखे बेताल आपल्या भाषणात वायरच्या लेखाचा उल्लेख करतात ही गोष्टच हास्यास्पद आहेच पण राजकारणी म्हणून त्यांचा दर्जा किती खालावला आहे हे पण दाखवणारा आहे.
                        
आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. विरोधी पक्ष आपल्या प्रचारामध्ये हा मुद्दा नक्कीच उचलणार कारण त्यांचे "सत्याशी" काहीही देणंघेणं नसून फक्त "सत्तेसोबत" मतलब आहे, "सत्तेपुढे" सत्य आणि राष्ट्र काय आहे?

 पण जेव्हा हा मुद्दा उचलल्या जाईल त्याला "भुलू" नका, त्यांच्या तोंडावर वरील माहिती फेका!

टिप्पण्या