2016 ला "सर्जिकल स्ट्राईक" घोषित झाल्या नंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सर्जिकल स्ट्राईक बद्दल पुरावे मागायला सुरवात केली होती. मुंबईच्या संजय निरूपम याने सगळ्यात पहिले पुरावे मागितले आणि नंतर दिल्लीचे सरजी अरविंद केजरीवाल पण त्यात सामील झाले, हळू हळू संपूर्ण विपक्ष त्यात सामील झाला होता.
यु ट्यूब वर त्या चित्रफिती उपलब्द असतील, तेव्हाही पाकिस्थानी वृत्तवाहिन्या जे वृत्त दाखवत होते त्याचाच आधार घेतला जात होता, पण हे सगळ करतांना आपण आपल्याच सैनिकांवर अविश्वास दाखवत आहोत याचे भान पण विरोधी पक्षाला राहिले नव्हते.
तेव्हा पण भारतीय सेने कडून आमच्या कडे पुरावे असल्याचे आणि योग्य वेळी तसेच सरकारला वाटेल तेव्हा आम्ही ते सादर करू असे म्हंटल्या गेले होते आणि ते समोर आणल्या पण गेले, इतकेच नाही तर त्या वर "नॅशनल जिओग्राफीक" वाहिनीने वृत्तपट बनवून दाखवला पण होता. मोदींनी योग्य वेळी पुरावे आणत विरोधी पक्षाच्या आरोपतील हवा काढून टाकली होती.
हीच परिस्थिती पुन्हा "एअर स्ट्राईक" नंतर तयार झाली आहे. पुन्हा एकदा या "एअर स्ट्राईक" चे पुरावे मागण्यात येत आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे याची मागणी पुन्हा महाराष्ट्रातूनच सुरू झाली, राज ठाकरे आणि शरद पवार यांनी मागणी केल्यावर ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल सोबत काँग्रेसी नेते पण यात सामील झाले. पुन्हा या करता पाकिस्थानी वृत्तवाहिन्यांचाच आधार घेतला जात आहे. पुन्हा आज वायू सेनेने पत्रकार परिषद घेत पुरावे असल्याचा आणि सरकारला वाटेल तेव्हा योग्य वेळी ते समोर आणणार असल्याचा पुनरुच्चार केला.
या सगळ्या गदारोळात पाकिस्थानने निदान जुन्या अनुभवावरून काही शिकल्याचे जाणवते, या वेळेस त्यांनी "एअर स्ट्राईक" झाल्याचे पहिल्याच झटक्यात मान्य केले, फक्त साफ सफाई करायला भरपूर वेळ घेत नंतर वृत्तवाहिन्यांना तिथे नेले.
पण आपले विरोधी पक्ष मात्र जुन्या अनुभवावरून काहीच शिकलेले दिसत नाही! पुन्हा त्याच जुन्या चुका करत आहे. पण त्यांना लक्षात येत नाहीये ते अलगत नरेंद्र मोदी यांच्या जाळ्यात अडकत आहेत आणि तेही अत्यन्त चुकीच्या वेळेस. नरेंद्र मोदी यांनी पहिलेच सांगितले होते की, "शिव्या द्यायच्या त्या मोदीला द्या, सरकारला द्या, मात्र सेनेला काही म्हणू नका." मात्र मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांना याचे तारतम्य उरले नाहीये.
पहिले तर पाकिस्थानने स्वतः "एअर स्ट्राईक" झाल्याचे मान्य केले आहे. तसेच "सर्जिकल स्ट्राईक" च्या वेळेस झालेले राजकारण जनतेने अनुभवले असल्यामुळे जनता सरकार आणि सैन्याच्या बाजूने भक्कम उभी आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने अधोरेखित होत आहे.
"एअर स्ट्राईक" मध्ये नक्की किती मेले याचे जनतेला पडले नसून "भारताने घरात घुसून पाकिस्थानला मारले" याचे अप्रूप आणि अभिमान जास्त आहे. सोबतच पाकिस्थानची घाबरलेली अवस्था पण ती जनता बघत आहे. गेले तीन चार दिवस पाकिस्थानने नागरी उड्डाण बंद केली होती, "ब्लॅक आउट" सुरू केला होता, ही पाकिस्थानला वाटणारी भीती नुकसान झाल्याचे प्रतीक म्हणून जनता बघत आहे.
या पर्शवभूमीवर जर सरकारने पुरावे समोर आणले तर आगामी निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम नक्कीच होईल यात काही शंका नाही. म्हणूनच वर लिहले आहे की विरोधी पक्ष नरेंद्र मोदी यांच्या जाळ्यात अडकत आहे. नरेंद्र मोदी या "एअर स्राईकचे" राजकारण जरी करत नसले तरी, त्यांची वक्तव्ये विरोधी पक्षांना चुकीच्या वक्तव्याकडे घेऊन जात आहे. निदान विरोधी पक्षाने पाकिस्थान कडून कधी, कसे आणि किती बोलायचे याचे धडे तरी गीरवावे, किंवा निदान योग्य मुद्यांवर बोलावे, पण सैन्याने केलेल्या पराक्रमावर बोट ठेऊ नये.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा