इंदिरा गांधी यांच्या हत्येची कारण



जे “कॉंग्रेसवासी” इंदिरा गांधी यांनी देशा करता आपले “प्राण” दिले म्हणतात त्यांना एक तर “इंदिरा गांधी” यांच्या “वर्चस्ववादी” राजकारणा विषयी काही माहिती नसते किंवा त्यांना “नेहरू-गांधी” घराण्याच्या “गुलामीत” त्या राजकारणा कडे दुर्लक्ष करायचे असते.

स्व. इंदिरा गांधी यांचे “प्राण” खलिस्तानवादी आतंकवाद्यांनी शीखांचे श्रद्धास्थान असलेल्या “सुवर्ण मंदिरात” लष्करी कारवाई करत तथाकथित शीख संत बिन्द्रावाले यांच्या मृत्यूचा बदला म्हणून मारले. पण हे “अर्ध सत्य” आहे, मुळातच ह्या “संत बिन्द्रावालेचे भूत” स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उभे करण्यात स्वतः इंदिरा गांधी आणि त्यांचा प्रेमाचा पुत्र स्व. संजय गांधी यांचा खूप मोठा हात होता.


१९७७ च्या पंजाब निवडणुकीत “कॉंग्रेस” निवडणूक हरली, आणि “अकाली दल” एक सक्षम पक्ष म्हणून समोर आला, प्रकाशसिंह बादल मुख्यमंत्री म्हणून पंजाब मध्ये विराजमान झाले. इतकेच नाही तर पंजाब मधील त्या नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत “अकाली दल” कॉंग्रेसचा पराजय करत होती. तेव्हा “कॉंग्रेस पक्ष” पंजाब मध्ये अश्या एखाद्या “मोठ्या” चेहऱ्याच्या शोधात होते जो “अकाली दलाला” जोरदार टक्कर देऊ शकेल. ग्यानीझेलसिंग, दरबारसिंग आणि स्वर्णसिंग हे तत्कालीन पंजाबच्या राजकारणातील कॉंग्रेसची मोठी नावे होती, त्यांच्यात पण आपसात वर्चस्वाची लढाई होतीच.

हे राजकारण समजून घेतांना आपल्याला पंजाब मधील शीख धार्मिक मान्यता पण लक्षात घ्याव्या लागतील. मुळातच “शीख धर्मात” निरंकारी आणि अकाली असे दोन भाग आहेत. या दोघांमध्ये “धार्मिक तेढ” पण आहे. कथा अशी की शिखांचे अंतिम गुरु “गुरु गोविंद सिंग” यांनी आदेश दिला, या नंतर जीवित गुरु नाही तर आपला धर्मग्रंथ “गुरु ग्रंथ साहेब” हाच शिखांचा “गुरु” राहील. पण “निरंकारी” पंथात अजूनही “जीवित गुरु” ला गाडीचा उत्तराधिकारी मानतात जे “अकाली पंथाला” मान्य नाही. त्या मुळे अकाली आणि निरंकारी पंथात धार्मिक तेढ आहे.

\
तत्कालीन कॉंग्रसच्या पडत्या काळात कॉंग्रेसला अकाली दलाला शह देण्यासाठी जेव्हा पंजाबमधील “मोठ्या” चेहऱ्याची गरज होती तेव्हा कॉंग्रेसचे नेते ग्यानीझेलसिंग यांनी प्रमुख संत बिन्द्रावाले यांना “शोधून” काढले.  बिन्द्रावाले तेव्हा “दमदमी टकसाल” चे “धार्मिक प्रचारक” पण होते. “शीख” धर्मात या “दमदमी टकसाल” चे पण विशेष महत्व आहे. इतका मोठा माणूस हातात आल्यावर त्याला बाकायदा कॉंग्रेसचे तत्कालीन सर्वेसर्वा श्री संजय गांधी यांची भेट घालून देण्यात आली, त्या सोबत एक मुलाखतीचा कार्यक्रम पण घेण्यात आला. संजय गांधी यांना “बिन्द्रावाले” यांचा “अक्कडपणा” चांगलाच भावला. एका मुलाखतीत संजय गांधी यांचे तत्कालीन जवळचे मित्र कमलनाथ यांनी “बिन्द्रवाले” यांना वेळोवेळी आर्थिक मदत केल्याचे पण मान्य केले होते. पण याच “भिन्द्रावाले” हा नंतर “भस्मासुर” होईल याचा विचारच कोणी केला नाही.

१३ एप्रिल १९७८ ला “निरंकारी” आणि “अकाली” यांच्या मध्ये रक्तरंजित संघर्ष झाला त्यात १३ “अकाली शीख” मारल्या गेले. या प्रकरणात निरंकारी बाबा गुरुबचन सिंग यांना अटक झाली आणि त्यांच्यावर हरियाणा राज्यात खटला पण दाखल करण्यात आला, पण या प्रकरणातून बाबा गुरुबचन सिंग आश्चर्यकारक पणे सुटले. या प्रकरणामुळे “शीख” समाजात चांगलाच रोष उत्पन्न झाला होता. या सगळ्यात “बिन्द्रवाले” यांनी प्रवेश करत “अकाली” यांच्या हातून हे आंदोलन मधल्या मध्ये हातात घेतले आणि त्यातच २४ एप्रिल १९८० बाबा गुरुबचन सिंग यांची “हत्या” झाली आणि पंजाब मधील “धार्मिक” चळवळ पूर्ण पणे बिन्द्रावाले यांच्या हातात गेली. बाबा गुरुबचन सिंग यांच्या हत्येशी संबंधित लोक "बिन्द्रावाले" यांच्या सोबत होते हे उघड “गुपित” होते.


हे सगळे प्रकरण होत असतांना प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नैय्यर यांनी “बिन्द्रावाले” यांची मुलाखत घ्यायला गेले तेव्हाची आठवण त्यांच्या “बियोंड दी लाइफ” या पुस्तकात लिहली आहे. जेव्हा कुलदीप नैय्यर “बिन्द्रावाले” यांना पोलिसांकडे असलेल्या शस्त्रांची, तसेच त्यांना असलेल्या सरकारी आणि संवैधानिक अधिकाराची जाणीव करून दिली तेव्हा “बिन्द्रवाले” याने तितक्याच गुर्मीत उत्तर दिले कि, “त्यांना माझ्याशी लढायला सांगा.” त्याच वेळेस कॉंग्रेसचे मोठे नेते माजी स्वरक्षण आणि विदेश मंत्री राहिलेले स्वर्ण सिंग बिन्द्रावाले यांना भेटायला आले आणि बिन्द्रावाले याच्या समोर “जमिनीवर” बसले. हे बघून कुलदीप नैय्यर हडबडले आणि त्यांनी स्वर्ण सिंग यांना आपली खुर्ची देऊ केली, पण स्वर्ण सिंग यांनी, ”संताच्या समोर खुर्चीवर कसे बसायचे?” असे म्हणत जमिनीवरच बसणे पसंद केले. हि होती तत्कालीन कॉंग्रेसची मानसिकता.
  

१९८० च्या पंजाब निवडणुकीत या सगळ्या पार्श्वभूमीवर “कॉंग्रेसने” जबरदस्त मत घेत पुन्हा सत्ता काबीज केली. संजय गांधी आणि ग्यानी झेलसिंग यांनी “बिन्द्रावाले” याला नवीन पक्ष पण स्थापन करून दिला. त्या बदल्यात “बिन्द्रावाले” याने कॉंग्रेसला अनेक ठिकाणी निवडणुकीत मदत केली त्यातील एक महत्वाची जागा “अमृतसर” पण होती. या काळात BBC ला दिलेल्या एका मुलाखतीत मात्र इंदिरा गांधी यांनी “बिन्द्रावाले” यांना ओळखतो आणि त्याचा कॉंग्रेसशी काही संबंध आहे हि गोष्ट सपशेल धुडकावुन लावली. पण या निवडणुकी नंतर ग्यानि झेलसिंग यांना “केंद्रीय गृहमंत्री” म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि दरबार सिंग पंजाबचे मुख्यमंत्री झाले. या दोन कोनातील तिसरा कोन मात्र “बिन्द्रावाले” होता आणि तो दिवसागणीत “ताकद” वाढवत होता. या सगळ्यात “अकाली दल” पुन्हा आपल्या जुन्या “राजकीय भूमिकेत” शिरला आणि पंजाबची राजकीय परिस्थिती स्फोटक बनली.

९ सप्टेंबर १९८१ रोजी पटियाला – जलंदर हायवे वरती दोन बुलेटवर आलेल्या चार आतंकवाद्यांनी पंजाब मधील सगळ्यात जास्त वाचल्या जाणारे आणि महत्वाचे हिंदी वर्तमानपत्र “पंजाब केसरी” चे मुख्य संपादक लाला जगत नारायण यांची हत्या केली. या ह्येची सुई सरळ सरळ “बिन्द्रावाले” याच्या कडे वळली. याचे तत्कालीन कारण पण होते, एक तर लाला जगत नारायण हे “बिन्द्रावाले” याचे प्रखर विरोधक होते, त्याच्या विरोधात सतत लिखाण करत होते, दुसरे म्हणजे तेव्हा होणाऱ्या पंजाब राज्यातील जनगणनेत त्यांनी “हिंदूंना” आपली मातृभाषा “पंजाबी” न लिहिता “हिंदी” लिहावी असे आवाहन केले होते, ज्याला “बिन्द्रावाले” चा विरोध होता.


 लाला जगत नारायण यांच्या हत्येच्या चार दिवसानंतर “बिन्द्रावाले” च्या विरोधात अटक वारंट निघाला. तेव्हा “बिन्द्रावाले” हरियाणा राज्यात होते. पण तेव्हा “बिन्द्रावाले” ला अटक करायची सोडून त्याला “सरकारी गाडी” मधून जाऊ देण्यात आले. पण पंजाबमधील विरोधी वातावरण बघता शेवटी १५ सप्टेबर सप्टेंबर १९८१ रोजी “बिन्द्रावाले” याला “अटक” करण्यात आली. पण तो पर्यंत शिरजोर झालेल्या “बिन्द्रावाले” नि पंजाब मध्ये “संता सोबत दुर्व्यवहार” च्या नावाखाली “धर्मिक राजकारण” करण्यास सुरवात केली, सोबतच “शिखांसाठी” वेगळ्या “खालीस्थान” ची मागणी पण समोर आली. या सगळ्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाने “बिन्द्रावाले” याची सुटका झाली, तत्कालीन गृहराज्य मंत्री “बुटासिंग” यांनी समोर येऊन “बिन्द्रावाले” यांच्या विरुध्द पुरावे नसल्याची घोषणा केली. पण इंदिरा गांधी यांचे चरित्र लिहणारी लेखिका पुपुल जयकर यांच्या मते “बिन्द्रावाले” यांच्या सुटण्यात स्वतः इंदिरा गांधी यांनी सरळ सरळ हस्तक्षेप केला होता.

या प्रकरणा नंतर “बिन्द्रावाले” आपल्या सगळ्या “लश्करा” सोबत दिल्लीला “भेट” द्यायला आला होता. आपल्या हत्यारबंद माणसांसोबत ट्रकच्या छतावर बसून दिल्लीतील विविध भागात “बिन्द्रावाले” “दर्शन” देत हिंडत होता. आरोप हा कि त्याची हि भेट एका कॉंग्रेस नेत्याने प्रायोजित केली होती, ज्याचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. पण या दिल्ली प्रवासात “बिन्द्रावाले” सिख काँग्रेसी नेता संतोख सिंग यांच्या घरी एका “शोक सभे” निमित्य जाऊन आले, तेव्हा श्री. राजीव गांधी पण तिथे उपस्थित होते.

या सगळ्या अटक आणि सुटकेच्या नाटकाचा “बिन्द्रावाले” यांनी आपली “पत” वाढवण्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला आणि अभिमानाने याचे सगळे श्रेय “इंदिरा कॉंग्रेसला” द्यायचा. या नाटकाच्या वेळेस  “कॉंग्रेस” डोळे मिटून बसून राहिली आणि स्वतःचा “राजकीय फायदा” बघत बसली. इकडे “बिन्द्रावाले” याला वेगळ्या “खलीस्थान” च्या मुद्यावर जबरदस्त जनसमर्थन प्राप्त होण्त्यास सुरवात झाली विशेषतः NIR शीख लोकांकडून, सोबतच भारताचा “शत्रू” असलेला आणि भारताचे तुकडे पाडून “बांगलादेश” निर्मितीचा बदला घ्यायला आसुसलेल्या “पाकीस्थान” कडून आर्थिक आणि शस्त्राची मदत मिळायला लागली. पंजाब आणि पंजाबातील “हिंदू” एका नवीन हिंसाचाराला सामोरे गेले आणि भारतीय जनतेला “आतंकवादाचा” परिचय झाला.


या नंतर “शिरजोर आणि शक्तिशाली” झालेला “बिन्द्रावाले” अजूनच आक्रमक झाला. २९ एप्रिल १९८१ ला श्रीनगर हून दिल्लीला येणाऱ्या विमानाचे अपहरण करून लाहोर येथे नेण्यात आले आणि जहाल आतंकवादी जनरेलसिंग बिंद्रावाले याच्या सुटकेची मागणी करण्यात आली. ऑक्टोंबर १९८१ ला जनरेलसिंग बिंद्रावाले याची सुटका करण्यात आली. १९८२ साली पण दिल्ली हून श्रीनगर ला जाणारे विमान अपहरण करून लाहोरला नेण्यात आले, पण तिथे उतरायची परवांगी न मिळाल्याने अमृतसरला परत आणण्यात आले, तिथे कमांडो कारवाई करत ते विमान सोडवण्यात आले.

२३ एप्रिल १९८३ ला मध्ये पंजाब पोलिसचे डीआईजी अवतार सिंह अटवाल यांची सुवर्ण मंदिरच्या परिसरात दर्शानासाठी गेले असतांना सुवर्ण मंदिरच्या समोरच गोळी मारुन हत्या झाली. यावेळी तेथे साधारण १०० पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तरीही अटवाल यांचे शव तेथेच २ तास पडुन होते. फेब्रुवरी १९८४ साली प्रीतलारी मासिकाचे संपादक सुमित सिंग शम्मी यांची हत्या झाली, त्यानंतर एप्रिल १९८४ ला भा.ज.प. चे नेते ह्र्बंसलाल खन्ना यांची हत्या करण्यात आली, मे १९८४ ला स्व. लाला जगत नारायण यांचे पुत्र आणि दैनिक पंजाब केसरी चे प्रमुख रमेशचंद्र यांची जलंदर येथे हत्या करण्यात आली. ह्या पंजाबमधील तत्कालीन आतंकवादाच्या मुख्य घटना आहेत, पण या व्यतिरिक्त पण पंजाब मध्ये सामान्य हिंदू आणि भारत प्रेमी शीख लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. तरी “राजकीय वर्चस्वाच्या” आकांक्षे पोटी बरेच दिवस “कॉंग्रेस” या घटनांकडे दुर्लक्ष करत होती. डिसेंबर १९८३ साली जनरेलसिंग बिंद्रावाले याने सुवर्ण मंदिरातील “अकाल तख्त” येथे आश्रय घेतला होता. ३० मे १९८४ पर्यंत “सुवर्ण मंदिर” आणि आजूबाजूचा परिसर पूर्ण पणे “खलीस्थानवादी आतंकवाद्यांच्या” हातात गेला होता, लवकर कारवाई केल्या गेली नाही तर “वेगळ्या खलीस्थानच्या” घोषणे सोबत “पंजाब” भारताच्या हातातून निसटण्याची चिन्हे दिसायला लागली.


खरे तर तत्कालीन परिस्थितीत "पंजाब" मधील जनता, राजकारणातील वेगवेगळे गट, खुद्द पंजाब काँग्रेसमधील नेते "बिंद्रावाले" ला कंटाळले होते. त्या मुळे त्याच्यावर "कारवाई" करण्यास कोणी अडविले नसते, पण मुद्दा हा होता की जेव्हा कारवाई करायची होती तेव्हा "राज्य सरकारचे" हात इंदिरा गांधी यांनी बांधून ठेवले, "बिंद्रावाले" य "सुवर्ण मंदिरात" आश्रय घेत होता तेव्हाच त्याला "अटक" करणे गरजेचे होते, पण "सुवर्ण मंदिरात" आश्रय घेतल्यावर त्याच्यावर कारवाई करतांना पंजाब मधील राजकीय नेते आणि जनता यांच्या बरोबर चर्चा करता आली असती, पण इंदिरा गांधी यांनी तत्कालीन शीख राष्ट्रपती ग्यानिझेलसिंग यांनाही कोणतीही कल्पना न देता "सुवर्ण मंदिरात" लष्कर पाठविले आणि एका "जटिल धार्मिक विवाद" उभा केला.
शेवटी “बिन्द्रवाले” चा भस्मासुर आपल्यावर उलटलेला असल्याचे लक्षात आल्यावर आणि देशातील जनतेच्या दबावाखाली ३ जून १९८४ ला “ऑपरेशन ब्ल्यू स्टार” सुरु करण्यात आले जे ६ जून १९८४ पर्यंत चालले, “बिन्द्रावाले” मारल्या गेला. पण या कारवाईचे पडसाद अनुशासित “भारतीय सेनेत” पण उमटले, भारतीय सेनेतील शीख जवानांनी “बंड” पुकारले. भारतीय सेनेने वेळीच कारवाई करत त्या वर नियंत्रण मिळवले. पुढील अनेक वर्ष पंजाब “जळत” राहिला.


इंदिरा गांधी आणि कॉंग्रसच्या “राजकीय” महत्वाकांक्षेची जबरदस्त किंमत पंजाब आणि भारतातील सामान्य जनतेला द्यावी लागली. पाकीस्थान सारख्या शत्रूला भारतात “राजकीय आजारक” निर्माण करायची संधी तर या मुळे मिळालीच, सोबत “काश्मीर” प्रश्नाला नव्याने तापवायची संधी पण मिळाली. या सगळ्या “महाभारताची” परिणीती ३१ ओक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांच्या हत्येमध्ये झाली. ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या “फोडा आणि राज्य करा” या तत्वावर “राजकीय व्यवहार” करू पहाणाऱ्या राजकारणाचा हा दुखद अंत होता. पण अजूनही “कॉंग्रस” या सगळ्यातून काही शिकली असे राहुल गांधी यांच्या सध्याच्या राजकारणा कडे बघून वाटत नाही.  


टिप्पण्या

  1. काहीही करुन आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे हेच कॉंग्रेसचे पहिल्या पासूनच तत्व आहे आणि म्हणूनच मोदींना हटवण्यासाठी मदत करा असे पाकिस्तान कडे याचना करु शकतात. सत्तेच्या हावेतून कॉंग्रेसचे कोणीही नेता सुटलेला नाही अगदी नेहरु ते सोनिया पर्यंत. आता मिडिया विशेषतः सोशलमिडियामुळे यांच्या काळ्या कारवाया उघड्या पडताहेत तरीही यांच्या कारवाया कमी होत नाहीत मग जेंव्हा सरकारच्या पूर्ण ताब्यात असलेला रेडिओ आणि अनेक तांत्रिक मर्यादा असलेले प्रिंट मिडिया यातून यांच्या अनेक काळ्या कारवाया जनतेला कधीच कळल्या नाहीत.

    उत्तर द्याहटवा
  2. एकदम बरोबर!!सर यांनी सत्तेसाठी नेहमी देश सीताराम तिलांजली दिली आहे.!!!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा