इस्लाम मधील पंथीय आणि जातीय दरी


               पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी इंदौर येथे “दाउदी बोहरा” या “मुस्लीम” समाजाच्या एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली, तेथे त्यांनी या समाजा सोबत असलेल्या आपल्या जुन्या संबंधाला उजळा दिला आणि समस्त तथाकथित “पुरोगामी” “विवेकवादी” म्हणवणाऱ्या “कंपू” मध्ये “भूकंप” झाला. या निमित्ताने लगेच “२००२ गुजरात” ची टेप पुन्हा वाजायला लागली, काहींना हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीकरिता केलेली “नौटंकी” वाटली. तर “समाज माध्यमांवर” याच्या “ट्रोल सैनिकांनी” तर भा.ज.प. समर्थकांना “खतना” करण्याचा सल्ला पण दिला.

            या सगळ्या प्रकरणात मी वरील पोस्ट टाकली, आणि कुणा मुस्लिमांनी त्या वर प्रतिक्रिया द्यायच्या एवजी हे “ट्रोल सैनिकच” अंगावर आले, आणि मला प्रतिप्रश्न विचारू लागले कि, “बोहरा” मुस्लीम नाहीत काय??, ते “मशिदीत” जातात कि “वैदिक मंदिरात” ??


            खरे तर वरील पोस्ट मी “मुस्लीम” समाजाकडून त्या वर उत्तर येईल या अपेक्षेने टाकली होती. पण “मुस्लीम” समाजाकडून विचारलेल्या प्रश्ना व्यतिरिक्त “मोदी, फेकू, पाकीस्थान, हिंदू, आसमानता, वैदिक” असल्या फालतू गोष्टी ऐकाव्या लागल्या, पण मुळ प्रश्न बाजूलाच राहिला!
      
             या पेक्षा मजेदार गोष्ट म्हणजे “मुस्लीम” मित्रांनी या प्रश्नाला बगल दिली. पण आपले तथाकथित पुरोगामी, विवेकवादी हिंदू मित्र मात्र “मुस्लीम” कसे एक आहे, त्यांच्यात कशी एकी आहे, त्याच्यात कश्या पद्धतीने “समाज एक” आहे हे समजून देण्याचा प्रयत्न करत होते. त्या एवजी “हिंदू” मधील “जातीय उतरण” कशी या वर शेलक्या प्रतिक्रया देत होते.

             अर्थात “जय मिम” चा घोष करणारे आणि त्या “मिम” च्या “अंधळ्या प्रेमात” असलेल्या आणि स्वत: “धर्मा” विषयी अतिरिक्त विष पेरणीच्या कह्यात गेलेल्या या लोकांचा “मुस्लीम” धर्माचा अभ्यास इतका तोकडा असल्यावर, त्याच्यात वाढत जाणाऱ्या “जिहाद” चा अर्थ, त्याचे अंतिम ध्येय आणि त्या “जिहादची” येणारी शिकवण कुठून येते हे कळणे मुश्कील आहे.

              अश्या लोकांना सांगावेसे वाटते कि, “होय, जातीय उतरण हि फक्त “हिंदू” धर्मात नाही तर, “मुस्लीम” धर्मात पण आहे.” त्यातल्या त्यात “हिंदू” लोकांमधील हि “जातीय उतरण” न आवडणारे आणि ती मोडून काढायला उत्सुक अनेक “हिंदुत्ववादी” त्या वर काम करत आहे आणि त्यांना अपेक्षित “यश” पण मिळत आहे. पण दुर्दैवाने “७४” पंथ किंवा “फिरके” मध्ये “मुस्लीम” धर्म विभाजित आहे आणि “हिंदू एकता” सारख्या असल्या काही हालचाली “मुस्लीम धर्मात” तर नाहीच आहे, परंतु हे सगळ्या “पंथ” किंवा “फिरके” एकमेकांच्या विरुद्ध “धर्म युद्ध” पुकारून स्वतःला “खरे मुस्लीम” म्हणून घोषित करायला तयार आहे.

              विशेष बाब म्हणजे हे एकमेकांच्या “मशिदीत” जाऊन त्यांच्या “अल्लाह” ला साद पण घालू शकत नाही. त्यांना त्यांच्या त्यांच्या “फिर्क्याच्या” बनविलेल्या “विशेष” मशिदीत जाऊनच “नमाज अदा” करावी लागते.

आता त्यांच्या फार खोलात न जाता वेगवेगळ्या पंथ/जाती कोणत्या हे खाली देत आहे.

                          शिया आणि सुन्नी हा भेद तर जगात सगळ्यांना माहित आहे. मुख्यतः “अल्लाह” एक आहे या वर या दोघांचेही एकमत आहे. तसेच “पैगंबर मोहम्मद” त्या अल्लाहचे “दूत” असून, “कुराण” हा दिव्य ग्रंथ “अल्लाह” ने पाठविला आहे यावर पण शिया-सुन्नी यांचे एकमत आहे.

             पण “पैगंबर मोहम्मद” यांच्या मृत्यू नंतर त्यांचा उत्तराधिकारी नक्की कोण? या विषयी यांच्यात गंभीर मतभेद आहे. त्या नुसारच “पैगंबर मोहम्मद” आणि “कुराण” याच्या लावण्यात आलेल्या “अर्थात” पण मतभेद आहे. त्या मुळेच भारतात सगळ्यात गंभीर “धार्मिक विवाद” म्हणून माहित असलेल्या “बाबरी मशीद” प्रकरणात पण शिया आणि सुन्नी यांच्यात “मतभेद” आहेत.

सुन्नी

            जगतील मुस्लीम लोकसंख्येतील जवळ जवळ ८०% मुस्लीम “सुन्नी” आहेत. “सुन्नीचा” अर्थ म्हणजे ज्या पद्धतीने आणि नियमाने “पैगंबर मोहम्मद” जगले तीच पद्धत आणि नियमाने आपले जीवन व्यतीत करणे होय. यांच्या हिशोबाने “मोहम्मद पैगंबर” यांच्या मृत्यू नंतर त्यांचे सासरे हजरत अबू बकर हे त्यांचे उत्तराधिकारी बनले, ज्याला “खलिफा” हि उपाधी मिळाली. या नंतर हजरत उमर, हजरत उस्मान आणि हजरत अली हे “मुस्लीम नेता” बनले. या चौघांना खुलफा ए राशीदिन म्हणजेच योग्य दिशेने जाणारा असे म्हंटले जाते.

           पण या शिवाय पण “सुन्नी” मध्ये मुख्यतः ५ समुहात वाटल्या गेला आहे. या पाचही समूहांच्या “विश्वास आणि श्रद्धा” या मध्ये फरक नाहीये पण यांच्या नुसार यांच्या धार्मिक गुरूने म्हणजे “इमाम” यांनी सांगितलेला “कुराण” आणि “हदीस” याचा अर्थ खरा आहे.

          “सुन्नी” मुस्लीम मध्ये इस्लामी कायद्याचा अर्थ/व्याख्या सांगणाऱ्या मुख्यतः ४ शाळा आहे. याचे ४ “इमाम” आहेत, १) इमाम अबू हनिफा, २) इमाम शाफई ३) इमाम हंबल ४) इमाम मालिक

१) हनिफी – इमाम अबू हनिफीला मानणारे स्वतःला “हनिफी” म्हणवून घेतात. पण त्यांच्यातही २ गट पडले आहेत ते म्हणजे “देवबंद” आणि “बरेलवी”. देवबंद आणि बरेली ह्या उत्तर प्रदेशातील दोन जिल्ह्याच्या नावावर आहे. धार्मिक गुरु मौलाना अशरफ अली थानवी हे दारूल उलुम देवबंद मदरसा याच्याशी संबंधीत होते, तर आला हजरत अहमद रजा खां बरेलीशी संबंधीत होते. भारत, पाकीस्थान, बांगलादेश, अफगाण येथील अधिकांश मुस्लीम या दोन पंथाशी संबंधीत आहे. या दोन पंथाच्या विचारधारेत आणि धार्मिक मान्यतेत पण खूप अंतर आहे. थोडक्यात “बरेली” सुफी आणि मजार यांना मानतो तर “देवबंद” या दोघांना इस्लाम विरोधी मानत विरोध करतो.

२) मालिकी – सुन्नी लोकांचे दुसरे इमाम, इमाम मलिक यांच्या नावाने आहे. त्याचे पुस्तक “इमाम मोत्ता” प्रसिद्ध आहे. यांना मानणारे कमी यांचे अनुयायी पूर्व आशिया आणि आफ्रिकी देशात जास्त आहेत.

३) हंबली – इमाम हंबल यांच्या शिकवणूकीच्या रस्त्यावर जे चालतात ते स्वतःला “हंबली” म्हणवून घेतात. सौदी, कतर, कुवैत आणि काही आफ्रिकी देश येथे या पंथाचे लोक राहतात.

४) सल्फी, वहाबी, अहले हदीस – सुन्नी मुस्लिमांमध्ये एक मोठा समूह असा आहे कि तो कोणत्याही इमामाचे संपूर्णपणे अनुकरण न करता त्यांच्या काही खास शिकवणुकी, मार्गदर्शनाचेच अनुसरण करतो. इब्ने तैमिया आणि मोहम्मद बिन अब्दुल वहाब यांना या विचारधारेला मूळ मानल्या जाते. विशेषतः इस्लाम मधील सगळ्यात “कट्टर समूह” आहे आणि आपल्या “पेट्रो डॉलर” च्या सहाय्याने ते हि “कट्टरता” जगभरात पसरवत आहे, विशेषतः दक्षिण आशियाई देश जिथे गरीब मुस्लीम जास्त आहेत. सौदीचे शासक “वहाबी” विचारधारेचे आहे, तर अल कायदा चा संस्थापक ओसामा बिन लादेन “सल्फी” या विचारधारेचा होता.

५) सुन्नी बोहरा -   गुजरात, महाराष्ट्र आणि पाकीस्थान मधील सिंध प्रांतात “बोहरा” समाज पसरलेला आहे. शिया आणि सुन्नी या दोन्ही पंथात हा समाज पसरलेला आहे. प्रामुख्याने “व्यापारी” असल्यामुळे कट्टरतेत कमी आहे. “सुन्नी बोहरा” हनफी पंथाला मानत असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या शिया “दाउदी बोहरा” यांच्या अधिक जवळ आहे. पण इस्लामी जगतात यांचा “विरोध” होतो.

६) अहमदिया – “हनिफी” पंथाचा कायदा पालन करणारे काही मुस्लीम स्वतःला “अहमदिया” म्हणवून घेतात. याची स्थापना भारतातील पंजाब प्रांतातील कादियान येथे मिर्जा गुलाम अहमद यांनी केली. ते स्वतःला “नबी” म्हणवून घेत आणि “धर्म सुधारक” सुद्धा, या वर “मुस्लिम धर्मात” गंभीर मतभेद आहे आणि या मुळेच इतर मुस्लीम समाजात त्यांना “गैर मुस्लिमच” मानल्या जाते. भारत, पाकीस्थान आणि ब्रिटन मध्ये या पंथाची चांगलीच लोकसंख्या असून सुद्धा पाकिस्थानात यांना इस्लाम मध्ये काही स्थान नाही.

शिया

                         “शिया” मुस्लिमांचा धार्मिक विश्वास आणि श्रद्धा “सुन्नी” मुस्लिमांपेक्षा पूर्णतः वेगळ्या आहेत. पैगंबर मुहम्मद नंतर “खलिफा” नाही तर “इमाम” नियुक्त करण्याचे समर्थक होते. “शियाचे” म्हणणे आहे “पैगंबर मोहम्मद” त्याचा अस्सल उत्तराधिकारी त्यांचा जावई हजरत आली होते, आणि “मोहम्मद पैगंबर” यांनीही त्यांनाच आपले “वारस” घोषित केले होते, पण त्यांना फसवेगिरी करत अबू बकर यांना नेता बनवण्यात आले. शिया पहिल्या ३ खलीफांना आपला नेता मानत नाही तर “गासिब” म्हणतात, याचा अरबी अर्थ होतो “हडपणारा”. त्या मुळे जगभर “शिया” आणि “सुन्नी” यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरु असतो. पण “शिया” पण नंतर अनेक पंथात विभागल्या गेला आहे.



१) इस्ना अशरी – हा १२ इमामांना मानणारा पंथ आहे. जगातील “शियांपैकी” ७५% शिया या पंथाचे 
समर्थक आहे. यांचा “कलमा” सुन्निपेक्षा वेगळा आहे. यांचे पहिले इमाम हजरत आली आहे आणि 
शेवटचे इमाम महदी आहे. हे अल्लाह, कुरान, हदीस ला मानतात पण त्यालाच ज्याला त्यांच्या इमाम ने सांगितले आहे. इराण, इराक, भारत, पाकीस्थान आणि अनेक देशात ह्या पंथाचे लोक सापडतात.

२) जैदिया – “शिया” मधला हा दुसरा मोठा पंथ आहे आणि येमेन मध्ये यांची संख्या मोठी आहे. हे इन्सा अशरी च्या पहिल्या चार  इमामांना मानतात पण पाचवा आणि शेवटचा इमाम म्हणून हजरत अली यांचा मुलगा इमाम हुसेन यांचा नातू इमाम जैद बिन अली आहेत. म्हणून हे स्वतःला “जैदिया” म्हणवून घेतात. इमाम जैद बिन अली यांचे पुस्तक “मजमउल फिकह” याचे धार्मिक कायदे घेतलेले आहेत.

४) इस्माईली शिया – हे फक्त सात इमामांना मानतात. यांचे शेवटचे इमाम मोहम्मद बिन इस्माईल आहे, म्हणून हे “इस्माईली शिया”. यांचे भांडण “इस्ना अशरी” सोबत सातवे इमाम कोणाला मानायचे या करता होते, त्यात “इस्ना अशरी” यांनी मुसा काजिम यांना इमाम मानले आणि “इस्माईली शिया” यांनी इस्माईल बिन जाफर यांना आपले इमाम मानले आणि आपले रस्ते वेगवेगळे केले.

५) दाऊदी बोहरा – हेच ते “मुस्लीम” ज्यांच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले होते. दाऊदी बोहरा “इस्माईली शिया” चे सगळे नियम पाळतात, फक्त यांचे इमाम मात्र एकवीस आहेत. यांचे शेवटचे इमाम तैय्यब अबुल कासीम होते. त्या नंतर मात्र त्यांच्यात “अध्यात्मिक गुरु” अर्थात “दाई” ची परंपरा सुरु झाली. त्यांचे ५२ वे “दाई” सैय्याद्ना बुरहाद्दीन रब्बानी होते ज्यांचे २०१४ मध्ये मुंबई येथे निधन झाले. यांच्या गादी वर यांचे मुल उत्तराधिकारी आहेत. पण डोल मुलात भांडण झाल्यामुळे आता हे भांडण न्यायालयात आहे. गुजरात, महाराष्ट्र येथे यांची चांगलीच लोकसंख्या आहे. मुख्य: व्यापारी असल्यामुळे मितभाषी आणि सगळ्यांशी जमवून घेणारे असे असतात.

६) खोजा – गुजरात मधील एक मुस्लीम व्यापारी समूह स्वतः ला “खोजा” म्हणवून घेतो. हे पण “बोहरा” प्रमाणेच शिया आणि सुन्नी दोन्हीत आहेत. हे “इस्माईली शिया” चे पालन अधिकतर शिया करतात, पण काही “इस्ना अशरी” चे. हा पंथ महाराष्ट्र, गुजरात आणि आफ्रिका मध्ये आहे.

७) नुसैरी – जगातील वेगवेगळ्या भागात हा पंथ असला तरी, जगातील सगळ्यात विवादास्पद भूभागा वरील राष्ट्रपती या पंथाचा आहे ते म्हणजे “सिरीया” आणि राष्ट्रपती बशर अल असद. या पंथात पण “शिया सुन्नी” दोघेही आहेत मन जास्त संख्या शियांचीच आहे आणि सिरीया मध्ये जे गृहयुध्द सुरु आहे त्यातील एक “कोन” हा पण आहे.


                  हे सगळे मुस्लीम किंवा इस्लाम मधील वेगवेगळे पंथ आहेत हे इतकेच नाही तर अजून काही लहान लहान पंथ मिळून एकूण ७४ पंथ किंवा फिरके आहेत. भारतात जे मुस्लीम आपल्या आजूबाजूला दिसतात ते सगळे या पैकी कोणत्या ना कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत, सोबत शिया आणि सुन्नी हा भेद आहेच, महत्वाचे म्हणजे या सगळ्यांचा एकमेकांशी रक्तरंजित कलह आहे. वेळप्रसंगी प्रत्येक पंथ दुसर्याला “इस्लाम विरोधी” किंवा “काफिर” घोषित करायला आसुसलेले आहेत. संपूर्ण जग समजा “इस्लाम” मय झाले तरी खरा इस्लाम कोणाचा या वरून “इस्लामचा” शेवटचा बंद जिवंत असे पर्यंत लढाई सुरूच ठेवतील. सध्या तरी वर सांगितल्या प्रमाणे “सुन्नी” समुदायाची संख्या जगात जास्त आहे. त्यातही आपल्या “पेट्रो डॉलर” चा वापर करत “वहाबी” कट्टर विचारधारा जगभर पसरवत आहे.

               हे झाले जागतिक इस्लाम बद्दल, पण भारतातील इस्लामने हे मुस्लीम धर्म प्रचारक सांगतात तसे "जाती भेद" नाहीत असे वाटते काय?? खरे सांगायचे तर हे काही खरे नाही भारतात इस्लाम मध्ये पण "जाती-भेद" आहेत. “बरेली” आणि “देवबंद” मध्ये त्या पद्धतीचा विचार करत तसे  नियम पण बनविले आहे. जे “हिंदू” धर्मातील जातिभेदाला कंटाळून “इस्लामी” झाले ते तिथे पण या “जातीतून” सुटले नाही हे वास्तव आहे. “सय्यद” जातीचा मौलवी हा “जुलाहा” जातीच्या मौलवी पेक्षा श्रेष्ठ आहे हे माहित आहे का? सय्यद, अशरफ, आजलफ, अरजल, कमीने हे भारतीय इस्लाम मधील जातीचेच प्रकार आहे. कुराण आणि हदीस मध्ये पैगंबर मुहम्मद यांनी कोतेही पंथ किंवा जाती यांचा विचार सांगितला नसला तरी, मानवी स्वभाव नुसार आणि प्रादेशिक परंपरा नुसार स्वतः चे श्रेष्ठत्व साबूत ठेवायला “इस्लाम” मध्ये पण “पंथ” आणि “जाती” व्यवस्था आली आहे. शिया - सुन्नी सोबतच जे वेगवेगळे पंथ आहेत त्यांच्या वेगवेगळी प्रार्थना स्थळे म्हणजेच “मशिदी” आहेत, तसेच भारतात कोणी कोणत्या रांगेत उभे राहून “नमाज” पठन करायचे त्याचे पण “जाती” नुसार नियमन आहे. बोलतांना इस्लामी अभ्यासक कितीही तोंड भरून “इस्लाम” मध्ये असलेल्या “समानतेवर” बोलत असले तरी ती मशिदीत एकत्र येणे या प्रकारातीलच आहे, पण कोण कोणत्या रांगेत उभा आहे त्यावरून त्याची समाजातील पत लगेच लक्षात येईल. तसेच सय्यद आणि अशरफ कधीही आजलफ आणि अरजल सोबत रोटी-बेटी व्यवहार करत नाही, कमीने तर दूरची गोष्ट. या प्रकारामुळेच काही मुस्लीम सामाजिक संघटना “दलित-मुस्लीम” आणि “OBC मुस्लीम” अशी सांगड घालत त्यांना “आरक्षणाची” मागणी करत आहेत हे सत्य तरी “मुस्लिमांच्या समानतेच्या” धोक्याला भाळलेल्या “हिंदूनी” करावी हि अपेक्षा. भारतातील कोणत्याही मुस्लीमला वरील पंथीय आणि जातीय भेदा विषयी विचारले तर तो कधीच कबूल करणार नाही उलट तो तुमच्या धर्मातील त्रुट्या दाखवत या प्रश्नालाच बगल देईल.

              हे सगळे वर सांगतांना “हिंदू” तील “जातीय भेद” चांगले आहे हे माझे मत नाही. पण जागतिक धार्मिक विचारात “उच्च नीच्च” भेद आहेत हे दाखवणे इतकाच प्रामाणिक प्रयत्न आहे. उलट “हिंदूंनी” या जाती भेदाला बर्यापैकी दूर करायचा प्रयत्न केला आणि करत आहे हि माझी भावना आहे. 

               पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “दाऊदी बोहरा” पंथाच्या कार्यक्रमाला लावलेली हजेरी त्याचं मुळे “मुस्लीम” समाजाच्या वेगवेगळ्या पक्षात असलेल्या धुरिणांना तसेच भारतीय मुस्लीम समाजात मौलवी बनून धार्मिक सत्तेचे लोणी खात असलेल्या उच्चजातीय मुस्लीमांना खुपत आहे. कारण या मुळे जशी हिंदू धर्मात त्यांनी भेदाभेदाची “भीती” दाखवत फुट पाडली तशीच “फुट” आता मोदी-शहा ची जोडी आपल्यामध्ये पाडेल अशी भीती त्यांच्या मनात आहे. त्याची चुणूक तुम्हाला तीन तलाक आणि राम मंदिर प्रश्नावर सुन्नी वक्फ बोर्ड आणि शिया वक्फ बोर्ड यांनी घेतलेली भूमिका परस्पर विरोधी कशी आहे हे दाखवून दिले आहेच.

             असे जर खरेच झाले तर तथाकथित “पुरोगाम्यांचे” हिंदू धर्माला खाली दाखवायचे धंदे तर बंद होतीलच, पण मुस्लिमात उभी फुट पडली तर ती “एक गठ्ठा मतपेठी” पण राहणार नाही हि भीती पाई या भेटीवर ते पण आक्रमक झाले आहे.

             तेव्हा डोळे उघडा आणि “जय मिम” च्या संमोहनातून बाहेर या आणि स्वतःच्या “धर्माला” सुंदर आणि आधुनिक कसे बनवता येईल याचा विचार करा, मंथन करा, “जातीय द्वेष” जो कोणत्याही कारणासाठी असो दूर ठेवा.                                       

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा