चर्च "मोदी सरकार" विरोधात आक्रमक का झाला ??

              



              साधारण गुजरात निवडणुकी पासून “राहुल गांधी’ थोडे अधिक रंगात आले होते, कधी नव्हे ते कॉंग्रेसचे युवराज गुजरात मधील प्रत्येक मंदिरात जाऊन दर्शन घेत होते आणि कॉंग्रेस पक्षाने त्यांना “जेनेऊधारी हिंदू” म्हणून प्रसिद्धी पण दिली होती. तसेच अजून एक मोठा बदल म्हणजे तो पर्यंत “समाज मध्यमा” वर फक्त भा.ज.प. वर टीका करणारे राहुल गांधी त्यांच्या tweeter हान्डेलवर आवर्जून #RSS/BJP असा hashtag लिहायला लागले. म्हणजे त्यांना भा.ज.प.ची ताकद नक्की कुठे आहे याचा अंदाच नक्कीच आला होता.

            पण या निवडणुकीत नेमका इतकाच बदल नाही झाला तर या निवडणुकीतून पहिल्यांदा चर्च उघडपणे “मोदी विरोधात” समोर आले, त्या नंतर लगेच दिल्लीतील आर्च बिशप यांनी देशात तथाकथित पणे असहिष्णुता कमी व्हावी म्हणून “प्रार्थना” करण्याचे लिखित आवाहन देशातील ख्रिस्ती समुद्याला केले आणि देशात खळबळ उडाली, सोबतच व्हाटीकन मधून पण या विषयावर सरकारशी चर्चा झाल्याचा दावा केल्या गेला.

              मग येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत हाच कित्ता चर्च कडून गिरवल्या गेला. मेघालय सारख्या ख्रिस्ती बहुल राज्यात तर उघड उघड भा.ज.ला. विरोध केल्या गेला. हे सगळे झाले का??

              मोदी सरकार ने NGO च्या बाहेरच्या मिळणाऱ्या पैशावर कायदेशीर अंकुश आणला. “हिंदुत्ववादी” सरकार आल्यामुळे चर्चचा “धर्मांतर” करण्याच्या मुख्य कामावर असर झाला होता. त्यातच अनेक NGO वर कारवाई झाल्याने आर्थिक चणचण पण चर्चला जाणवू लागली. त्यातच पहिले चर्चची जी प्रकरणे राजकीय लागेबांधे असल्याने चर्च च्या बाहेर जात नव्हती ती आता चव्हाट्यावर यायला लागल्यामुळे चर्चच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले जे चर्चला अजिबात नको आहे.

           चर्चने स्वत:च्या फायद्यासाठी भारत विरोधी शक्तींना पण मदत केली आहे, कधी सेवेच्या नावाने तर कधी धर्माच्या. ईशान्य भारतात फुटीर चळवळीला चर्च धर्माच्या नावाखाली प्रोत्साहन देत आले आहे. त्यातूनच मग ख्रिस्ती बहुल राज्य आहे म्हणून स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी कलशाला विरोध केल्या जातो.

           तीच अवस्था “नक्षल कारीडोर” म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रदेशात जिथे भारतीय प्रशासन, भारतीय सुरक्षाबल जीव मुठीत धरून काम करते, जिथे “हिदुत्ववादी” कार्यकर्त्यांचे खून हि खुप नगण्य गोष्ट असते तिथे मात्र चर्चचे “धर्मांतराचे” काम मात्र राजरोस पणे सुरु असते. “हिंदुत्ववाद्यांना” विरोध करतांना जे “डावे” धर्माला “अफूची गोळी” म्हणतात त्यांना जंगलात “धर्म वाढवणारा” पाद्री मात्र चालतो यातच सगळे गुपित आहे. उदाहरण म्हणून मी खाली काही २०१८ च्या काळातील घटना देत आहे त्या मुळे कुठल्या राज्यात कशी कारवाई सुरु आहे आणि त्यात कसा राजकीय हस्तक्षेप होतो हे लक्षात येईल.

    
          जून मध्ये झारखंड मधील कोचांग गावात पाच मुलींवर बलात्कार करण्यात आला. त्या भागात पसरत चाललेल्या "पत्थरगढी" चळवळीच्या लोकांनी हा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पण या प्रकरणाला खरी कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा "झारखंड पोलीस" या प्रकरणाची चौकशी करायला लागले आणि यात एका ख्रिशन पाद्री  याला अटक केली, झारखंड हे आदिवासी बहुल राज्य आहे आणि येथे ख्रिशन धर्माच्या प्रचाराचे काम पण एकदम जोमात असते. आदिवासी समाजाच्या या पाच मुली एका NGO च्या जनजागृतीच्या कामाकरिता या भागात आल्या होत्या, दोन नन आणि फादर अल्फास्नो असलेल्या एका मिशनरी शाळेच्या आवारात 300 लोकांसमोर ते हा सरकारी योजनेच्या जनजागृतीचे कार्यक्रम सादर करत होते आणि काही लोकांनी त्याचे अपहरण केले. आरोप असा आहे की, जेव्हा या अपहरण करणाऱ्या लोकांनी यांना पकडले तेव्हा नन च्या बदल्यात या फादरने आदिवासी असलेल्या पाच पोरींना समोर केले आणि स्वतः तेथून निघून गेले, इतकेच नाही तर या अपहरणाची माहिती पण त्यांनी पोलिसांना दिली नाही. अत्याचार करून झाल्यावर अपहरणकर्त्यांनी जेव्हा या पोरींना आणि त्याच्या तीन पुरुष साथीदारांना सोडले, तेव्हा रात्री या कश्या बश्या जवळील खुंटी गावात पोहचल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना पोलिसांना कळली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, पण फदरच्या अटकेने याला धार्मिक रंग चढला, आणि सध्या झारखंड येथे भा.ज.प. चे सरकार असल्यामुळे "अल्पसंख्यकांवरील अत्याचार" म्हणून पण याचा प्रचार होत आहे. मुख्य ज्या "पत्थरगढी" चळवळीचे नाव या प्रकरणात समोर आले, ही चळवळ पण वरून "स्वयंशासन" या गोंडस नावाखाली चालवून त्या गावात सरकारी लोकांना आणि भारतीय व्यवस्थेला विरोध करणारी डाव्यांनी चालवलेली नक्षलवादी चळवळी सारखीच आहे. या मुळे प्रकरणातील गुंतागुंत आणि आरोप प्रत्यारोप अजून तीक्ष्ण झालेत मुख्य म्हणजे अटक झालेल्या फादरचा या चळवळीला पाठिंबा असल्याचे पण समोर आले आहे. या प्रकरणावर अजून तरी चर्च ने मत प्रदर्शित केले नव्हते.

            जून महिन्यात झारखंडला ह्या घटना घडत असतांनाच तेथून दूर भारताच्या दक्षिण राज्य असलेल्या आणि चर्चाचा बऱ्या पैकी प्रभाव असणाऱ्या केरळ मध्ये एका नन ने बिशप मूलक्कल यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. 2014 ते 2016 असे तीन वर्षे या बिशप ने तिच्यावर अत्याचार केल्याचे तिने म्हंटले आहे. पण केरळ मधील सत्ताधारी आमदार पी.सी. जॉर्ज मात्र या ननलाच "वेश्या" म्हणून मोकळे झाले. केरळ मध्ये डाव्या पक्षाचे सरकार असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण न मिळता सरळ सरळ त्या ननवर नसते आरोप करत, जमीन आणि पैशाचे प्रलोभन दाखवत प्रकरण दाबायचा प्रयत्न सुरू आहे, बिशप ने स्वतः वरील आरोप धुडकवलेच, पण अजून केरळ पोलिसांनी त्यांना साधी अटक पण केली नाही, विशेष म्हणजे केरळ पोलिसांनी न्यायालयात बिशप विरुद्ध पुरावे असल्याचे कबूल केले होते. या प्रकरणात पीडित नन सोबत उभ्या राहिलेल्या इतर नन्सला मात्र तिच्या सोबत उभे राहण्यास मनाई केली आहे. लाजिरवाणी गोष्ट ही की पीडित नन ने चर्चला पत्र लिहून न्याय मागून सुद्धा चर्च मात्र या विषयावर "मूग गिळून" गप्प आहे. अजून पण त्या बिशप वर ना चर्च ने काही कारवाई केली, ना पोलिसांनी. या प्रकरणात अधोरेखित करण्याची गोष्ट ही की चर्चचे "बिशप" हे सरळ सरळ व्हॅटिकन सिटी ने नियुक्त केलेले पद आहे, या मुळे या प्रकरणातील गांभीर्य जास्त वाढते आहे.

          याच केरळ मध्ये 7 मे ला चार पद्र्याविरुद्ध एका विवाहिते कडून "बलात्काराची" केस नोंदवल्या गेली, या प्रकरणात पोलिसांनी चारही पाद्रीना अटक केली आहे. यात लक्षात घेण्या सारखी गोष्ट म्हणजे ख्रिश्चन धर्मा प्रमाणे आपण केलेले "पापाची" कबुली पाद्री समोर दिली तर आपण "पापमुक्त" होतो अशी "अंधश्रद्धा" आहे. अशाच एका "पापाच्या" मुक्ती साठी केलेल्या "कबुली" च्या आधारे या विवाहितेवर हा पाद्री अत्याचार करत होताच, पण याची माहिती इतर पाद्रीना देत त्यांना पण याने "मुक्तीचा मार्ग" दाखविला.  चर्च ने अजून या प्रकरणावर पण योग्य कारवाई केल्याचे निदर्शनात आले नाही.

           या घटना घडत असतांनाच उत्तर भागातील जम्मू काश्मीर राज्यात जम्मू मधील कठूवा गावात पण एक घटना उघडकीस आली. हो तेच कठूवा गाव ज्या मुळे एकाएकी "हिंदुस्थानात" राहणाऱ्या तमाम तथाकथित "बुद्धिवाद्यांना" हिंदुस्थानात राहण्याची "लाज" वाटायला लागली होती. त्याच कठूवा मधील एका चर्च मधील बाल वसतिगृहात तेथील आपल्या बायको सोबत राहणाऱ्या मूळच्या केरळी असलेल्या फादर अंथोनी नामक पाद्रीने 8 मुली आणि 12 मुलांवर "लैंगिक अत्याचार" केल्याचा आरोप झाला. जम्मू काश्मीर पोलिसाने त्याला तत्काळ अटक केली आहे. पण या प्रकरणावर चर्च मात्र चूप आहे. 

          व्हॅटिकन चर्च ने "संतपद" आणि "भारतरत्न" सन्मानित मदर टेरेसा यांच्या "मिशनरीज ऑफ चॅरिटी" या संस्थेच्या झारखंड राज्यातील रांची या शहरात असलेल्या आश्रमातून लहान मुले यांची विक्री होत असल्याचा आरोप झाला, झारखंड पोलिसांनी या प्रकरणी या संस्थेच्या दोन ननला अटक करण्यात आली आहे, याही प्रकरणात चर्च अजून चूप बसले आहे.

          या सगळ्यात महत्वाचे म्हणजे हि प्रकरणे काही “हिंदुत्ववाद्यांनी” किंवा “मोदी सरकारने” चर्चला त्रास द्यायच्या उद्येशाने उकरून काढलेली नाही, त्याच्याच धर्माच्या अनुनायांनी चर्च आणि चर्चच्या अधिकाऱ्यांवर केलेले आरोप आहेत. पण “मोदी सरकारच्या” प्रयत्नाने असेल आतापर्यंत “धर्माच्या” नावाने पिचलेल्या अनुनायांना आपल्यावरील अन्याय न्याय मार्गाने दूर होईल असे वाटत असेल आणि तेच नेमके चर्चला नको आहे.

         जरा आठवा गेले काही वर्षे “हिंदू” सण, श्रद्धा यांच्यावर प्रहार करणारा एक मोठा वर्ग प्रकर्षाने समोर आला होता. “अंधश्रद्धांना” विरोध करणे हे बरोबरच ह्याला हिंदू कधीही विरोध करत नाही, पण भारतात सगळ्या धर्मातील वेगवेगळ्या “अंधश्रद्धांवर” बोलायचे सोडून हिंदू धर्माच्या अंधश्रद्धांच्या आडून “श्रद्धांना” पण हात घालायला लागले. वासनांध धर्मगुरु सगळ्यात धर्मात असतात पण आता असे वाटते कि “हिंदू” धर्मातील भ्रष्ट धर्मगुरूवर मिडिया मुद्दाम जास्त प्रकाशझोत टाकत होते.

          चर्चची भारतीय मिडियावरील आणि राजकारणावरील पकड किती मजबूत आहे हे कळण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेचे उदाहरण समोर आहे. "इंडियन एक्सप्रेस" सारख्या समुहातील प्रसिद्ध आणि आघाडीचे मराठी वृत्तपत्र असलेले "लोकसत्ता" ला मदर टेरेसा यांच्या वरील निष्पक्ष पणे लिहलेला आणि त्या धर्माच्या "अंधश्रद्धे" वर प्रहार करणारा अग्रलेख महाराष्ट्रातील एक विद्वान संपादक श्री. कुबेर यांना माफी मागत विनाशर्त वापस घ्यावा लागला आणि इतर वेळेस "असहिष्णुता" आणि "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या" गप्पा मारणारे महाराष्ट्र आणि देशातील तथाकथित "विवेकवादी" शेपूट घालून बसले, या "गळचेपी" विरुद्ध कोणीही आवाज उठविला नाही. हि चर्च च्या पैशाची ताकद आहे. वरील चर्चच्या प्रकरणात एरवी छोट्या छोट्या गोष्टींवर "हिंदू" वर टीका करणारे आणि "हिदुस्थानात राहण्याची लाज" वाटणाऱ्या नट्या पण आता हातात "बोर्ड" घेऊन फोटो सोशल मिडिया वर टाकत नाहीये.  

           इतर धर्मातील हि प्रकरणे आता चव्हाट्यावर येत आहे म्हणजे २०१४-२०१८ च्या आधी अशी प्रकरणे झालीच नाही काय ? चर्च जे आजपर्यंत उघडपणे कधी राजकीय भूमिका घेत नव्हता तो आताच का अशी भूमिका तेही इतक्या आक्रमक पणे का घेत आहे? याचा विचार आता तुम्ही करायला हवा. बहुसंख्य “हिंदूच्या” आस्थेशी खेळणारे “हिंदूंमधील जयचंद” कोण हे पण ओळखा.....आणि पूर्ण विचार करून “नोटा” चा आधार घ्या.

टिप्पण्या