स्वतःला "लिबरल" म्हणवून घेणारे "बिरबल" किती खालच्या स्तराला पोहचले आहे ह्याची कल्पना येत आहे. आपल्या तथाकथित "पुरोगामीत्वाचे" पुरावे देत बाकीच्यांच्या "असहिष्णुते" बद्दल गप्पा मारत, "विरोधी मत" व्यक्त करणाऱ्याला "भक्त", "IT सेल", "संघी", "ट्रोल" या शेमळत नावांनी चिडवायचे आणि "ब्लॉक" करायचे ही येथील "बुद्धिवादी" म्हणवऱ्या "डाव्या अतिरेक्यांची" पध्द्त.
हो "डाव्या अतिरेक्यांचीच" हे "बुद्धिवादी, स्वातंत्र्यप्रेमी, संविधानरक्षक" असल्याचा मुखवटा घालून फिरणारे "डावे अतिरेकीच". ज्या प्रमाणे "साधकाचा" वेष घेऊन खून करणारे "सनातनचे अतिरेकी" तशेच हे "डावे अतिरेकी" .
हे "डावे अतिरेकी" पण आपल्या समाजात खोल पर्यंत पसरले आहेत, अनेक स्वतःला कामगार-शेतकरी यांचे कैवारी म्हणून दाखवतात, अनेक स्वतःला मानवाधिकार रक्षक म्हणून दाखवतात, तर काही स्वतःला वेगवेगळ्या विषयातील अभ्यासक म्हणून समोर आणतात, समाज सुधारक, धर्म सुधारक, विद्वान ?? संपादक-पत्रकार, "चार्वाक" च्या नास्तिकवदाचे आजचे खरे वाहक म्हणून स्वतःला समोर आणणारे, समाजातील रंजल्या-गंजलेल्यांचे पद-दलित, आदिवासी यांचे कैवारी असल्याचे दाखवणाऱ्यांचे खरे रूप मात्र "जंगलातील माओवादी" हेच आहे.
महाराष्ट्रातील "एल्गार परिषद" आणि त्या नंतर झालेल्या "कोरेगाव-भीमा" च्या दंगली नंतर तुषार दामगुडे, अक्षय बिक्कड, स्मिता गायकवाड यांनी केलेल्या तक्रारी नंतर महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या तपासाने त्यांचा हा "बुद्धिवादी" बुरखा टराटरा फाटला आहे आणि आत असलेला खरा "अतिरेकी माओवादी" चेहरा जगासमोर येत आहे.
गेली अनेक वर्षे ही लोक या "मानवतावादी-समतावादी" बुरख्याच्या आड राहून देशातील लोकांना फसवत-घाबरवत आले, पण हा "बुरखा" फाटला आणि यांच्या विरुद्ध "व्यक्त" होणारे जनमत पाहता हे स्वतःच "सहिष्णुता आणि अभव्यक्ती स्वातंत्र्य" हे शब्द विसरले. आणि या "फेसबुक" वरील काही लोकांवर त्यांनी "रिपोर्ट" च्या "शस्त्राने" "अतिरेकी हल्ला" चढवायचे ठरवले. म्हणजे बघा जंगलात "माओवादी" बनून AK-47, 56 - बॉम्ब घेऊन आदिवासी-पोलीस यांचा आवाज दाबायचा, आणि शहरात "बुद्धिवादी" बनून "सोशल मीडिया" वरील विरोधी आवाज दाबायचा.
एकीकडे आमचा "माओवादाला" पाठिंबा नाही, आमचा काही संबंध नाही म्हणायचे आणि इथे मात्र जे जे या "माओवादी अतिरेक्यांविरुद्ध" कारवाई करतात, बोलतात, जागृती करतात त्यांना "त्रास" द्यायचा, त्यांचे खच्चीकरण करायचे मग ते कितीही "संवैधानिक" असो, "बुद्धिवादी" असो, "निष्पक्ष" असो, की "हिंदुत्ववादी", लोकतांत्रिक पद्धतीने निवडलेले सरकार असो, की कायदे रक्षणाची जवाबदारी असणारे पोलीस- न्यायपालिकेतील न्यायप्रिय व्यक्ती, यांच्या साठी "शत्रूच".
याच्या मागे जातांना मात्र एक लक्षात घ्या, हे आहे "अतिरेकीच", यांचा ना तुमच्या "लोकशाहीवर" विश्वास, ना तुमच्या "संविधानावर" विश्वास, ना "न्यायपालिकेवर" विश्वास, हे जे लोकशाहीचे गोडवे गात आहेत ते फक्त तुम्ही विरुद्ध जाल या "भीती" पोटी. कारण यांना जी "क्रांती" अपेक्षित आहे ती "रक्तरंजित" क्रांती आहे आणि यात "रक्त" तुमचे सांडणार आहे यांचे नाही, हे तर फक्त "सत्ता" हातात घेणार आणि मग "समता-मानवता" यांना हरताळ फसणार.
जागतिक इतिहास बघा डोळस पणे एकदा या "डाव्या अतिरेक्यांचा" मग तो लेनिन असो, स्टालिन असो, माओ असो, फिडेल कॅस्ट्रो असो, व्हिएतनाम असो, उत्तर कोरिया असो की कंबोडिया ह्यांनी जिथे राज्य केले तिथे मानवी हत्या, स्वातंत्र्याचा संकोच झालाच आहे. भारतात पण पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा इथे पण विरोधकांच्या "हत्या" हे या "डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांचे" व्यवच्छेदक लक्षण आहे.
अजून वेळ गेली नाहीये, आपण विवाद करू "समता की समरसता" आपण विवाद करू "हिंदू की वैदिक", आपण विवाद करू धार्मिक कट्टरता नक्की काय म्हणून पण हे सगळं "स्वातंत्र्य राहून" "संवैधानिक पद्धतीने" "लोकशाहीवर विश्वास ठेवून" "संविधानाला बांधील असलेल्या भारतीय न्याय व्यवस्था आणि संसदेत" हे विवाद करू.
पण या "डाव्या अतिरेकी लोकांवर" विश्वास टाकून यांच्या "सोनेरी पिंजऱ्यात" न अडकता. कारण या "डाव्या अतिरेक्यांची" जागा भारताच्या "संवैधानिक लोकशाहीत" फक्त तुरुंगात आहे, त्यांना तिथेच पाठवू.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा