शहरी नक्षलवादाचा खरा चेहरा



                            

                           "शहरी नक्षलवादी" लोकांवर "कोरेगाव-भीमा" प्रकरणानंतर कारवाईचा वेग वाढत आहे, काल पुणे पोलिसांनी भारतातील पाच शहरात कारवाई करून वर्णन गोंसालविस, अरुण परेरा, गौतम नवलाखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव यांना अटक केली आणि या विरुद्ध कुप्रसिद्ध "अमेस्टी इंटरनॅशनल" या संस्थे सोबतच रामचंद्र गुहा, प्रशांत भूषण, अरुंधती रॉय यांनी विरोध केला, सोबतच भारतातील पत्रकार आणि वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या तर या विषयात सरकार विरोधात उभ्या ठाकल्या आहेत.

                              आज या विषयाची बातमी अगदी पहिल्या पानावर छापून त्याची रीतसर नोंद घेण्यास हे आपल्याला भाग पाडत आहे. पण यात गंमत अशी की काही दिवसांपूर्वी अटक झालेल्या नागपूरचे नक्षलवादी समर्थक वकील गडलिंग अटक झाल्यावर पुणे पोलीस आणि नागपूर पोलीस यांच्या हाती काही कागद पत्रे लागली होती. त्यात नागपूर येथे बंदिवासात असलेला अपंग नक्षलवादी समर्थक साईबाबा याला सोडवण्याची तयारी "पूर्ण" झाल्याचा उल्लेख होता.


                              पोलिसांनी एक महिन्यांपूर्वी हा कट समोर आणला. "कोरेगाव-भीमा" प्रकरणानंतर "शहरी नक्षल" अटक सत्र सुरू झाले नसते तर आज जेल मध्ये असलेला "साईबाबा" पण बाहेर येऊन "बुद्धिजीवी" म्हणून आपल्या डोक्यावर बसवल्या गेला असता.

                          पण यातील खरी "धोकादायक" बातमी अशी की, मुंबई उच्चन्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या साईबाबा ची केस सुरू आहे, महाराष्ट्र नक्षल विरोधी दल आणि नागपूर पोलीस यांनी जमा केलेल्या भक्कम पुराव्यांमुळे "साईबाबा" पुरता जखडल्या गेला विशेष म्हणजे सध्याचे "केंद्र आणि राज्य" सरकार पण या करता विशेष प्रयत्न करत आहे. शेवटी त्याच्या "अपंग" असल्याचा फायदा घेण्याचाही प्रयत्न अनेकदा नागपूर खंडपीठाने उधळून लावला.

                                   या सगळ्यावर उपाय म्हणून या "साईबाबा" च्या प्रकृती आणि अपंग असल्याचा फायदा घेत याची रवानगी "तेलंगणा" मधील कोणत्या तरी जेल मध्ये करत हा खटला पण तिथेच वर्ग करायचा आणि मग तेथून त्याला राजरोसपणे सोडवायचे अशी संपूर्ण योजना तयार होती, यात काही सरकारी अधिकारी, न्यायव्यवस्थेतील काही लोक आणि राजकीय नेते मंडळी मदत करणार होती. ही सगळी कागद पत्रे गडलिंग याला अटक केल्यावर हातात आली.

                               सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या "हिंदू दहशदवादाची" पाळेमुळे खनण्यात व्यस्त असलेल्या आपल्या राज्य वृत्तपत्र वाहिन्यांना ही माहिती हातात आलेली दिसत नाही, फक्त ABP माझा ने कुठल्यातरी बुलेटिन मध्ये 10 सेकंदाची ही बातमी दाखवली, राष्ट्रीय प्रसार माध्यमांनी तर याची साधी दखल पण घेतली नाही.

                               खरे तर सरकारी अधिकारी, न्यायव्यवस्था या दोन्ही ठिकाणची माणसे जर भक्कम पुरावे असलेल्या "साईबाबा" नावाच्या नक्षल्याला सोडवत असतील तर ही "कीड" भारतीय व्यवस्थेच्या किती आत पर्यंत लागली आहे याचा भयावह अंदाज आपल्याला येऊ शकतो.

                              काल अटक झालेल्या नक्षल समर्थक लोकांनाच्या मागे भारतीय प्रसार मध्यम "विधवा विलाप" करतांना दिसत आहे. काही "हिंदुत्व" वाद्यांना पकडल्यावर "न्यायी" झालेली व्यवस्था आज अचानक "अन्यायी" का झाली याची झलक आहे ही.

                        खरी भीती हीच आहे कि, "न्यायव्यवस्थे"  मधील काही लोक अश्या भारताच्या "संवैधानिक सर्वभौमीत्वावर" हल्ले करणार्यांच्या पाठी उभे राहत असतील तर हा प्रकार किती गंभीर आहे याची नोंद घ्यावी. "कोरेगाव-भीमा" प्रकारामुळे आपल्याला महाराष्ट्रातील "बी.जी. कोळसे-पाटील" यांच्या वक्तव्यांवरून हे प्रकरण किती गंभीर आहे हे कळेल. 

                               काही महिन्यांपूर्वीच भारताच्या मुख्य न्यायधीशांच्या विरोधात काही न्यायमूर्तींनी बंड पुकारून पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या नंतर एक डाव्या पक्षाच्या नेत्याने या बंड करणाऱ्या न्यायाधीशांपैकी एकाशी भेट घेत "संकेत" पायदळी तुडवले होते. यातूनच "न्यायव्यवस्थेतील" काही लोक कसे एका विचार्धारेसाठी काम करतात हे प्रकर्षाने समोर येते.

                               सरकार वर संस्थांचे "भगवाकरण" केल्याचा आरोप करत आहे. सरकार आमचे म्हणणे ऐकत नाही अशी ओरड असते. पण खरा प्रकार हा की या असल्या "नक्षल समर्थकांना" सरकारी संस्थे मध्ये पद देत "बुद्धिजीवी" बनवून आपल्यावर बसवत होते या देशविरोधी कारवाईत "काँग्रेस" चा फायदा होताच ना, यांनी कितीही दाखवले तरी भारतातील "डावे आणि काँग्रेस" यांची अभद्र युती आहेच आणि वेळोवेळी ती आपल्यासमोर आली आहे. हा "भगवकरणा" चा आरोप याच "बुद्धिजीवी" पदाला आणि त्या मुळे मिळणाऱ्या अधिकाराला मुकल्या गेल्याचे दुःख आहे बाकी काही नाही.

                           तर या "पुरोगामी बुद्धिजीवी" "कवी" "लेखक" अश्या मुखवट्यांना तुम्ही भुलू नका हे "शहरी नक्षलवादीच" आहे. जंगलातील नक्षलवादी एकवेळ परवडले ते सरळ गोळ्या तरी घालतात आणि मारतात त्या मुळे आपण पण त्यांना मारू शकतो, पण हे "शहरी नक्षलवादी" जे तुमच्या मनात "विष" कालवतात, समाजात तेढ तयार करतात आणि "बुद्धिजीवी" म्हणून तुमच्याच पैशाने चैन करतात. त्यांना तुम्ही काहीच करू शकत नाही.

टिप्पण्या